घरात पैसे टिकत नसतील तर गणपती बाप्पांच्या समोर ठेवा ही 1 वस्तू, वर्षभर पैसा कमी पडणार नाही….

मित्रांनो भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात येणारी चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी, या गणेश चतुर्थीला बाप्पाचे आपल्या घरात आगमन झाले आहे. या दिवशी आपण श्री गणेशाची स्थापना आपल्या घरामध्ये केली आहे. म्हणून आपण हा एक छोटासा उपाय करून आपल्या घरातील गरिबी, कंगाली, दारिद्र्य, या गोष्टी दूर करू शकतो. विशेष करून जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, मोठ्या प्रमाणात धन हाणी होत असेल. म्हणजे काय तर कोणत्याना कोणत्या कारणाने पैसा घराबाहेर जात असतील किंवा खर्च होत असतील, मग आजारपण असेल किंवा कोणतेही कारण असेल ज्यामध्ये तुमचा निश्फल पैसा खर्च होतो.

तर मित्रांनो अशा वेळी या गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्थी पर्यंत कोणत्याही दिवशी आपण हा एक उपाय करू शकता. म्हणजे काय तर गणपती बसल्या नंतर ते गणपती उठे पर्यंत म्हणजे गणपतीचे विसर्जन होई पर्यंत कोणत्याही दिवशी करण्यासारखा हा एक छोटासा उपाय आहे. तुम्ही गणपती बसवलेला असेल किंवा नसेल तरी सुद्धा आपल्याला हा उपाय करता येतो.

मित्रांनो तसे तर गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये अनेक प्रकारची सामग्री वापरली जाते मग त्यामध्ये कपूर असेल, श्रीफळ असेल, दुर्वा, असतील, फुले, धूप-दीप, अत्तर, पानाचा विडा, दोरा, मोदक, किंवा मिठाई, वस्त्र उपवस्त्र, फळे, गुलाल, हळद कुंकू, सुपारी, अशा अनेक वस्तूंचा अशा अनेक प्रकारच्या सामग्रीचा वापर आपण श्री गणेशाच्या पूजेमध्ये करत असतो. अशा प्रकारे प्रत्येक भक्त आपल्या गणपती बाप्पाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतात.

पण धन प्राप्ती साठी किंवा धन हानी टाळण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा यामध्ये आपण गणेशाच्या चरणी ११ रुपये अवश्य ठेवा. होय हा उपाय दिसायला अत्यंत साधा सोपा वाटतो मात्र आमची विनंती आहे की, एकदा हा उपाय करून पहा, आणि हा उपाय करताना आम्ही काही नियम सांगणार आहोत त्या नियमांचे देखील पालन देखील तुम्ही अवश्य करा. तुम्हाला दिसून येईल की, श्री गणेशाच्या कृपेने आपली धनसमस्या नकक्क दुरू झालेल्या आहेत.

एक लक्षात घ्या की आपण जे ११ रुपये अर्पण करणार आहोत, त्यामध्ये एक रुपयांचा कॉइन हा अवश्य ठेवायला हवा म्हणजे एक रुपयांचा कॉइन हा असायलाच हवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी २१ रुपये किंवा ५१ रुपये किंवा १०१ रुपये श्री गणेशाच्या चरणी ठेवा. आणि जो पर्यंत गणपती विसर्जन होत नाही. तो पर्यंत हे पैसे त्याच ठिकाणी ठेवा. आणि नंतर श्री गणेशाची विधिवत पूजा करायची आहे. ज्या व्यक्तींना शक्य असेल त्या व्यक्तींनी श्री गणेश स्तोत्रांचा पाठ, अगदी दररोज नित्य नियमाने करा. गणेश स्तोत्रांचा पाठ केल्याने आपण जो उपाय करत आहोत, त्या उपयाची फळ प्राप्ती आपल्याला शिग्र होते.

मित्रांनी हा उपाय याच ठिकाणी संपलेला नाही. जेव्हा आपण श्री गणपती बाप्पाचे विसर्जन करू तेव्हा हे ठेवलेले ११ रुपये किंवा तुम्ही जितके पैसे ठेवले असतील ते पैसे त्या ठिकाणावरून उचलुन आपल्या धन ठेवण्याच्या जागी ठेवायचे आहेत. आणि त्या वेळी श्री गणेशाना वंदन करून आपल्या जीवनातील धन समस्या दूर करण्याची विनंती करायची आहे. नंतर ते पैसे आपले धन ठेवण्याची जी जागा असते किंवा आपल्या पाकिटमध्ये ११ रुपये किंवा जेवढे पैसे ठेवले असतील ते सर्व पैसे ठेवायचे आहेत. आणि नंतर संपूर्ण वर्षभर या पैशातील एक ही रुपया खर्च करायचा नाही. किंवा हे पैसे कोणत्याही अस्वच्छ ठिकाणी ठेवले जाणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची आहे.

नंतर या पुढे जेव्हा जेव्हा संकष्ट चतुर्थी येते तेव्हा हे पैसे अगदी सकाळी सकाळी अंघोळ केल्यानंतर श्री गणेशाच्या पूजेमध्ये त्यांच्या चरणी ठेवायचे आहेत व हे असे पूर्ण वर्षभर करायचे आहे. नंतर गणेशाची विधिवत पूजा करायची आहे आणि ही पूजा पूर्ण झाल्यानंतर हे पैसे पुन्हा एकदा त्या ठिकाणाहुन आपल्या हातात घेऊन श्री गणेशाला प्रार्थना करायची आहे की, आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहुदेत, पैसा येऊदे आणि नंतर हे पैसे आपण पुन्हा मूळ जागी ठेवायचे आहेत. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.