हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत ६ भिकारी, यांची कमाई जाणल्यावर तुमचे होशच उडतील….

जेव्हा आपण रस्त्यावर, मंदिरात, किंवा चौकात भिकारी बघतो, तेव्हा त्यांची दया येऊन आपण त्यांच्या वाडग्यात २ किंवा ४ रुपये टाकतो. आपल्या सर्वांना असे वाटते, की हे भिकारी खूपच गरीब असतात आणि खूपच खडतर जीवन जगतात. परंतु, ही गोष्ट सर्व भिकर्‍यांच्या बाबतीत खरी नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, की भारतात असे काही भिकारी आहेत, जे भीक मागण्याचे काम अतिशय व्यावसायिक पद्धतीने करतात आणि त्यातील काही लोकांनी तर इतकी जास्त संपत्ति व पैसा जमा केला आहे, जी नौकरी करणार्‍या लोकांकडे सुद्धहा नसेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कितीतरी मोठ्या शहरात भीक मागायचा व्यवसाय अतिशय पद्धतशीरपणे चालतो. इथे या भिकार्‍यांचा एक व्यवस्थापक असतो, जो शहरातील सर्व भिकार्‍यांचे व्यवस्थापन करतो. हे भिकारी जितके पैसे कमावतात, त्यातील काही हिस्सा त्याच्याकडे पण जातो.

भिकारी.. कानावर हा शब्द पडताच काहीशा हीन भावनेने आपण त्या व्यक्तीकडे पाहत असतो. रस्त्यावरून जाताना कळकट कपड्यातील भिकारी पाहिल्यानंतर अनेकजण त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुढे जातात. मात्र अनेकजण दयेच्या भावनेने त्यांना मदत करत असतात. भीक मागणे हा अनेक जणांच्या उदरनिर्वाहाचा मार्ग असतो. पण केवळ उदरनिर्वाहाएवढेच हे मर्यादीत नाही. भीक मागण्याची एक इंडस्ट्री आजच्या घडीला चालत असल्याचे म्हटले जाते. काही चित्रपटांतही हा संपूर्ण गोरखधंदा कसा चालतो हे आपण पाहिले आहे. पण त्याचवेळी भीक मागूण अनेक जण लक्षाधीश अगदी अब्जाधीशही झाले आहेत, असे म्हटले तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. चला, तर मग आज तुम्हाला अशा काही भिकार्‍यांची ओळख करून देतो, ज्यांच्याकडे स्वत:ची अपार्टमेंट, कितीतरी मालमत्ता, आणि बँकेत खूप पैसे जमा आहेत. परंतु, यानंतर सुद्धहा ते हेच काम करीत आहेत, जे त्यांनी खूप वर्षापूर्वी सुरू केले होते.

भरत जैन: ५१ वर्षाचे भरत हे भारतातील सगळ्यात श्रीमंत भिकारी आहेत. ते जास्त करून मुंबईमधील विलेपार्ले या विभागात भीक मागण्याचे काम करतात. भरत जैन जवळ मुंबईसारख्या महागड्या शहरात २ अपार्टमेंट आहेत. या प्रत्येक अपार्टमेंटची किंमत ७० लाख रुपये आहे. म्हणजेच, दोन अपार्टमेंट मिळून १ करोड ४० लाखाची आहेत. त्याचबरोबर, भरतचे एक जूसचे दूकान पण आहे. ज्यातून त्यांना दर महिना १० हजार एवढे भाडे येते. कारण ते दुकान त्यांनी भाड्यावर दिले आहे. ते पूर्ण वेळासाठी व्यवसायिक भिकारी आहेत. आणि दर महिना जवळ जवळ ६० हजार रुपये कमावतात. भरत यांना पिता, पत्नी, भाऊ आणि दोन मुले आहेत. त्यांची मुले शाळेत शिकत आहेत.

कृष्ण कुमार गीते: कृष्ण मुंबईच्या चर्निरोड या विभागात भीक मागतात. आपल्या भीक मागून मिळवलेल्या पैशातून त्यांनी मुंबईतील नालासोपारा येथे १ फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटची किंमत १० लाख रुपये आहे. ते येथे आपल्या भावाबरोबर राहातात.

सार्वितीया देवी : पटना येथील अशोक सिनेमाच्या पाठी राहणारी सार्वितीया देवी भारतातील सगळ्यात जास्त प्रख्यात भिकारी आहे. तिच्या मिळकतीचा तुम्ही अंदाज नाही करू शकत. या गोष्टीवरून अंदाज करा, की तर दर वर्षी इन्शुरेंस प्रीमियम चे ३६००० रुपये भरते. तिने आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात करून दिले आहे. भीक मागण्यासाठी ती देशभरात प्रवास करते. ती स्वत:च्या पैशाने कितीतरी तीर्थक्षेत्र फिरली आहे.

संभाजी काळे: यांच्याजवळ, सोलापूर येथे दोन घरे आहेत आणि एक फ्लॅट आहे. याशिवाय, ते बँकेत पण बचत करत असतात. संभाजी काळे हे भारतातील आणखी एक श्रीमंत भिकारी आहे. दररोज सुमारे एक हजार रुपये उत्पन्न मिळवून, मुंबईतील खार प्रदेशात भीक मागणाऱ्या व्यक्तीने दोन घरं खरेदी केली यात काही आश्चर्य नाही. त्यांच्याकडे सोलापुरात (महाराष्ट्र) भूमीचा तुकडा देखील आहे आणि वेगवेगळ्या उद्यमांमध्ये त्याने काही गुंतवणूक केली आहे. चार जणांच्या कुटुंबासह काळे यांच्याकडे खर्च वाचवण्यासाठी लाखो रुपयांची बँक बचतही आहे.

लक्ष्मी दास: लक्ष्मी कलकत्ता मध्ये १९६४ पासून भीक मागायचे काम करते आहे. त्या वेळेस तीचे वय फक्त १६ वर्षे होते. इतकी वर्षे भीक मागितल्यानंतर तिने खूप पैसे जमा केले आहेत. त्यामुळे तिच्या बँकेतील खात्यात खूप मोठी रक्कम जमा आहे.

मस्सू मलाना: हा भिकारी घरातून छान कपडे घालून निघतो. मग तो एक रिक्शात बसतो आणि आपल्या भीक मागण्याच्या जागेवर जातो. तिथे तो त्याचे कपडे बदलतो आणि एका नौकारदार माणसाप्रमाणे ८ ते १० तास भीक मागतो. रात्री तो परत कपडे बदलतो व रिक्षात बसून आपल्या घरी परत येतो.

Leave a Reply

Your email address will not be published.