आळशीपणावर कशी मात कराल…..नक्की वाचा ५ सोपे मार्ग…

पहिली गोष्ट आहे आयुष्यात मोठे ध्येय ठेवा, मोठे लक्ष ठेवा. मित्रानो माणसे आळशी का बनतात? कारण त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठे करण्यासाठी ध्येयच नसतात. ध्येय हीन मनुष्याचे आयुष्य कुत्र्यासारखे असते. जो कुत्रा कोणतीही गाडी आली की त्याच्या मागे पळत सुटतो. तो कुत्रा त्या गाडी मागे दम लागेपर्यंत पळतो, आणि मग शांत बसतो. परत काही वेळाने दुसरी गाडी आली की त्याच्या मागे पळतो. तो कुत्रा का पळतो, कशामुळे पळतो हे त्याला सुद्धा माहीत नसते.

ज्या माणसाच्या आयुष्यात ध्येय नसतात त्याच्याबरोबर सुद्धा असेच चालले असते. त्याला तुम्ही प्रश्न विचारला ना तू का जगतो? ते उत्तर देतील सगळे जगतात म्हणून मी जगतो. त्याला विचारा तुला आयुष्यात काय करायचे आहे? तो उत्तर देईल जे सगळे करतील तेच मी करेन. म्हणून मित्रानो लक्षात ठेवा माणूस सुस्त आणि आळशी तेव्हाच होतो जेव्हा त्याच्या आयुष्यात मोठे ध्येय नसतात.

मोठे लक्ष नसतात. जे त्यांना काम करण्यासाठी प्रेरीत करतील. ज्या माणसाच्या आयुष्यात ध्येय असतात ना तो माणूस तुम्हाला कधीच सुस्त दिसणार नाही. तो अक्षरश्या त्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी झपाटलेला असतो. त्याला दिवसातले 24 तास सुद्धा कमी पडतात. कारण त्याला आयुष्यात काहीतरी मोठे मिळवायचे असते. म्हणून तुम्हाला आळस पूर्णपणे घालवायचा असेल तर पुढच्या एक वर्षाचे पाच वर्षांचे 10 वर्षाचे ध्येय आजच लिहून ठेवा. आणि ते पूर्ण करण्यासाठी कामाला लागा.

दुसरे आहे पौष्टिक अन्न खाणे : मित्रानो तुम्ही जर तळलेले मसाले दार पदार्थ खात असाल तर तुमची इच्छा नसताना देखील तुम्हाला आळस येईल. कधीतरी मज्जा म्हणून हे खाणे ठीक आहे. पण अश्या पदार्थांचे सेवन सातत्याने होत असेल तर मग तुम्ही सुस्त व्हाल. म्हणून आळस घालवण्यासाठी तुम्ही खात काय हे खूप महत्वाचे आहे. जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या,फळे,ड्रायफूड्स,ह्या गोष्टींवर तुम्ही भर दिला तर तुम्ही नेहमी उत्साही आणि ऊर्जेने भरलेलं असाल.

तिसरे आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला काय करायचे आहे याची यादी बनवा.. मित्रानो तुम्हाला आळस घालवायचा असेल तर रोज सकाळी तुम्हाला दिवस भरात काय काय करायचे आहे याची यादी बनविली पाहिजे. याने एक प्रकारचे तुम्हाला दिवस भरात काय करायचे आहे याची स्पष्टता येईल. यादी मध्ये भरमसाठ गोष्टी टाकत बसू नका. पण जा महत्वाच्या आहेत आणि त्या केल्याचं पाहिजेत अश्या पाच ते सहा गोष्टी लिहा. आणि मग एक एक करून ती कामे पूर्ण करा. लक्षात ठेवा 90% कामे तुम्ही झोपायच्या आधी पूर्ण केली पाहिजे. असे केल्याने तुमचा मेंदू सतत ऍक्टिव्ह राहील.

चौथे आहे चांगल्या लोकांच्या संगतीत राहा…मित्रांनो तुम्ही हुशार आणि मेहनती लोकांच्या संगतीत आळशी राहूच शकत नाही. लहान मूल असतात ती सकाळी उटण्याचा कंटाळा करतात. पण त्याच मुलांना तुम्ही होस्टेल मध्ये टाकले तर बरोबर सकाळी लवकर उठतात. कारण त्यांना होस्टेल मध्ये मिळालेली संगत. असे म्हणतात “जशी तुमची संगत, तशी आपल्या जीवनाला रंगात” तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिस मध्ये तुम्ही अश्या लोकांच्या संगतीत रहा जे हुशार आहेत ज्यांना आयुष्यात मोठे काहीतरी मिळवायचे आहे. म्हणून आळस तुम्हाला घालवायचा असेल तर चांगल्या लोकांच्या संगतीत राहा.

पाचवे आहे कोणताही नवीन बदल हळूहळू करा..मित्रांनो काही लोक अशी जोशील असतात की त्यांनी एखादा मोठीवेशनल विडिओ पाहिला एखादे प्रेरणादायी व्याख्यान ऐकले की त्यांना खूप जोश येतो. ते रोज सकाळी 8 वाजता उठत असतील तर ते ठरवतात की दुसऱ्या दिवशीपासून ते पाच वाजता उठतील. दुसऱ्या दिवशी उठतात खरे 5 वाजता पण परत तिसऱ्या दिवशी जसे आहे तसे.

म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात नवीन बदल करायचा असेल तर तो हळूहळू करा. म्हणजे आठ वाजता उठत असाल तर मग एक आठवडा 7 वाजता उठा नंतर पुढला आठवडा साडे सहा आणि असे करत करत पुढे जा. नाहीतर एकदम मोठे बदल करायला जाल. तर तुम्हाला आळस येईल, कंटाळा येईल. मित्रानो हे होते ते पाच मार्ग याचा अवलंब तुम्ही केला तर तुम्हाला आळस कधीच येणार नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.