लग्नासाठी मुलगा बघायला आल्यावर मुलींनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये नाहीतर….

ही गोष्ट ऐकायला तुम्हाला जरा चमत्कारिक वाटेल, पण हेच खरे आहे की मुलाच्या मनात मुलगी बघायला जाताना कितीतरी प्रश्न असतात. अशा काही गोष्टी असतात, जे ते चारचौघात बोलू शकत नाहीत, पण मनातल्या मनात खूप गोष्टी लक्षात घेऊन ठेवतात. ते कोणत्या गोष्टी लक्षात घेतात ते जाणून घेऊया

तुमचा हजरजबाबीपणा: तुमचा हजरजबाबीपणा, तुमचे हावभाव, तुमच्या कपड्यांची आवड व निवड, एवढेच नाही, तर तुमची केसरचना याकडे पण त्यांचे लक्ष असते. तर तुम्हाला सुद्धहा लग्नासाठी कोणी मुलगा बघायला येणार असेल, तर विश्वास ठेवा, हा लेख तुमच्या खूपच उपयोगी पडेल याची खात्री बाळगा.

या बाबतीत काही दुमत नाही, की पहिल्यांदा मुलगी बघायला आल्यावर, तिला बघितल्यावर, मुलगासुद्धहा मुलींनप्रमाणे खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने बघतो. ही गोष्ट तुम्हाला रूचणार नाही, पण हे सत्य आहे. मुलाच्या मनात अनेक प्रश्न असतात. काही अशा गोष्टी असतात, ज्या गोष्टी मुलगे सर्वांसमक्ष बोलू शकत नाहीत, परंतु मनातल्या मनात ते अनेक गोष्टींची नोंद करत असतात. आज आम्ही तुम्हाला जर लग्नासाठी मुलगा तुम्हाला बघायला येत असेल, तर मुलगा मुलींच्या कोणत्या गोष्टींची नोंद करीत असतो, ते सांगणार आहोत:

ऊंची: मुलगा सगळ्यात पहिले मुलीची ऊंची किती आहे ते बघतो. पहिल्या भेटीत मुलाचे पहिले लक्ष मुलीच्या उंचीकडे जाते. उंच आणि ठेंगण्या मुलींपासून मुलगे दूर पळतात. याचा हा ही अर्थ नाही, की त्यांना उंच किंवा ठेंगणी मुलगी पसंत नाही. त्यांच्या स्वत:च्या उंचीवर हे अवलंबून असते.

हास्य: एक मनमोहक हास्य कोणाचेही हृदय जिंकून घेते. ज्या मुली हसतमुख असतात, त्यांना खूपच आकर्षक मानले जाते. अशा मुलींकडे मुलगे जास्त आकर्षित होतात. पण हास्याबरोबर तुम्ही तुमच्या एकूण दिसण्याकडे पण लक्ष केन्द्रित करा. असे नको व्हायला, की तुम्ही काहीतरी खाल्लेले असेल, आणि तुम्ही हसलात, तर तुमच्या दातात अन्नकण अडकलेले दिसतील. यामुळे, सगळेच बिघडू शकते. यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींकडे मुलांचे खूप लक्ष असते.

डोळे: मुलाला भेटण्यापूर्वी आपल्या डोळ्यांकडे जरूर लक्ष द्या. काही वेळेस असे होते की, मुली खूप छान तयार होतात, पण त्यांचे त्यांच्या डोळ्याकडे लक्ष जात नाही. तुम्ही जरूर लक्ष द्या, तुमचे डोळ्यातील काजळ किंवा तुम्ही लावलेला लायनर पसरला नाही ना. तुमच्या डोळ्याच्या पापण्या स्वछ आहेत ना? कारण मुलगा बोलताना तुमच्या चेहर्‍याकडे बघून थेट बोलत असतो, त्यामुळे ते त्याच्या सहज लक्षात येऊ शकते.

तुमचा ड्रेसिंग सेन्स: मुलाला प्रथम भेटताना, तुमच्या ड्रेसिंग सेन्सवर जरूर ध्यान द्या. असे व्हायला नको, की त्याला आकर्षित करण्यासाठी तुम्ही खूपच हॉट पेहेराव केला आहे. अशा वेळी तुमचे नाते जमण्याऐवजी बिघडू शकते. कपड्यांची निवड करताना रंगसंगतीकडे जरूर लक्ष द्या. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.