परिवाराला नव्हते नाते मंजूर- ह्या ५ बॉलीवूड अभिनेत्रींनी केले पळून जाऊन लग्न- ४ थी आहे सलमान खानची अभिनेत्री….

तसे तर पळून जाऊन लग्न बॉलीवूडमध्ये खूपच कमी अभिनेत्यांनी केले आहे, पण यामध्ये काही खास अभिनेते आहेत, ज्यांनी पळून जाऊन लग्न केले आहे. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड मधील ५ अशा जोड्यांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, कोण आहेत ह्या जोड्या?

सैफ अली खान आणि अमृता सिंह: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान तेव्हा फक्त २१ वर्षाचे होते, आणि बॉलीवूडमध्ये आपले करियर बनवायच्या प्रयत्नात होते. परंतु, तेव्हा त्यांच्यापेक्षा मोठी व बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असेलेली अभिनेत्री अमृता सिंह हिच्यावर त्यांचे प्रेम बसले आणि दोघांनी लग्न करायचे ठरवले. पण त्यांचा परिवार या नात्याच्या विरूद्ध होता. म्हणून, दोघांना १९९१ मध्ये पळून जाऊन लग्न करावे लागले.

आमीर खान आणि रीना दत्ता: बॉलीवूडचे आमीर खान आणि त्यांची पहिली पत्नी रीना दत्ता ह्याचा घटस्फोट झाला आहे आणि आता किरण राव ही आमीर खानची आत्ताची पत्नी आहे. तुमच्या माहितीसाठी, रीना दत्ता आमीर खानच्या शेजारी राहात असे. एक वेळ अशी आली, की हे दोघेही एकमेकाच्या प्रेमात वेडे झाले होते व त्यांनी लग्न करायचे ठरवले. त्यांचा धर्म वेगळा असल्यामुळे घरातील लोकांनी परवानगी दिली नाही. या दोघांनी १९९६ मध्ये घरातून पळून जाऊन गुपचुप लग्न केले. तुमच्या माहितीसाठी, २००२ मध्ये आमीर खानने रीना दत्ताला घटस्फोट दिला.

शशि कपूर आणि जेनिफर केंडल: आपल्या काळातील शशि कपूर आणि जेनिफर केंडल यांचे काही मुलाखतीतच प्रेम जमले. परंतु, जेनिफरच्या वडिलांना हे नाते बिलकुल मंजूर नव्हते. म्हणून १९५८ मध्ये दोघांनी पळून जाऊन लग्न केले.

भाग्यश्री आणि हिमालय दासानी: फिल्म “मैने प्यार कीया” ची अभिनेत्री भाग्यश्रीचे वय फक्त २१ वर्षे होते, जेव्हा तिने हिमालय बरोबर लग्न केले. हे दोघेही शाळेपासूनच एकमेकांच्या प्रेमात होते. म्हणून हिमालयने जेव्हा शाळेच्या सहलीच्या वेळी भाग्यश्रीला प्रपोज केले, तेव्हाच भाग्यश्रीने त्याला लगेच हो म्हटले भाग्यश्री पटवर्धन ही एका मराठी सांगली येथे राहणार्‍या कुटुंबातील मुलगी आहे आणि तिचे वडील सांगली येथील राजा आहेत, आणि म्हणूनच त्यांना हे नाते अजिबात मान्य नव्हते. म्हणूनच, या दोन्ही प्रेमिकांनी घरून पळून जाऊन लग्न केले.

शक्ति कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे: बॉलीवूडमधील प्रसिद्ध खलनायक शक्ति कपुर यांनी पद्मिनी कोल्हापुरेची बहीण शिवांगी कोल्हापुरे हिच्याशी लग्न केले आहे. असे समजते, की शिवांगीच्या घरातील लोक या लग्नाला नकार देत होते. त्यांना हे लग्न मान्य नव्हते. परंतु, शक्ति कपूर बरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी घरातून पळून आली आणि दोघांनी लग्न केले. आता ते खूप खुश आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *