या 2 रुपयांच्या पानांचे आरोग्यदायी फायदे वाचून चकित व्याल!

 विड्याचे पान तुम्हाला प्रत्येक गल्लीच्या नाक्यावर मिळतील. असे तर ही पाने लोक मुखशुद्धीसाठी खातात. उत्तर भारतामध्ये जेवल्यावर ह्या पानांचा खाण्यासाठी उपयोग केला जातो. पूजेसाठी या पानांचा उपयोग केला जातो. तुम्हाला माहीत आहे का, या हृदयाच्या आकाराच्या पानांमध्ये खूप आजारांचे उपाय लपलेले आहेत. या पानांमध्ये बरेचसे औषधी गुणधर्म आहेत. ती तुमची रोगप्रतिकारक शक्ति वाढवते आणि अनेक आजारांपासून तुम्हाला दूर ठेवते.

बद्धकोष्टता: जर आपण विड्याचे पान चावून दररोज खाल्ली, तर बद्धकोष्टतेचा त्रास तुम्हाला होणार नाही. पानांच्या वरती एरंडेल तेल लावले, तर हा त्रास कायमचा नाहीसा होईल.

खोकला: घरात जर कोणाला खोकल्याचा त्रास असेल, तर ३ ग्लास पाण्यात १० ते १५ पाने घालून ते पाणी उकळा. जो पर्यन्त पाणी १/३ होत नाही तोपर्यंत उकळा आणि खोकला झालेल्या व्यक्तिला ते दिवसातून २ ते ३ वेळा प्यायला द्या, खोकला एकदम बरा होईल.

पाचनक्रिया : असे तर आपण ही पाने सुपारी किंवा गोड बडीशेप या बरोबर खातो, जे मुखशुद्धीचे काम करते. पण ही पाने जर तुम्ही अशीच चावून खाल्लित, तर ती तुमच्या तोंडात लाळ उत्पन्न करतात आणि तुमची पाचनक्रिया सुधारायला मदत करतात.

शरीराला येणारी दुर्गंधी: ४ ते ५ पाने घेऊन ती २ कप पाण्यात उकळून घ्यावी. जेव्हा पाणी उकळून एक कप राहील, तेव्हा ते पाणी दुपारी कधीही प्यावे. हे पाणी तुमच्या शरीराची दुर्गंधी कमी करण्यास मदत करेल.

भाजल्यावर:  विड्याचे पान वाटून जिथे भाजले असेल किंवा जखम झाली असेल, तिथे तो लेप लावावा. २० मिनिटांनी काढून टाकावा. भाजलेले बरे होते किंवा जखम बरी होते. तसेच मध लावल्याने पण फायदा होतो. दातांमधून रक्त येत असेल तर: ४ ते ५ पाने घेऊन ती पाण्यात उकळून त्याने गुळण्या केल्या तर दातांमधून येणारे रक्त थांबते.

कोणत्याही गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही उत्तमच कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे एखादा सल्ला किंवा उपाय हा सर्वांसाठी लागू होईल असे नसते. त्यामुळे लेखातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्या शिवाय कोणतेही पाऊल उचलू नये.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *