तोंडली भाजी खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का? चौथा फायदा तर खूपच उपयुक्त

तोंडली एक प्रकारची भाजी आहे, ज्याला आयुर्वेदात बिंबी फळ म्हणून ओळखतात. या भाजीची शेती प्रथम आफ्रिकेच्या उष्ण कटिबंधीय क्षेत्रात केली गेली. तिचा उपयोग भाजीसाठी केला गेला. त्यानंतर आशिया खंडातील कितीतरी भागांमध्ये तोंडली कच्ची किंवा शिजवून खायला सुरुवात झाली. तोंडली आकाराने अंडाकृती असतात व बोराप्रमाणे दिसतात. ती १२ ते ६० मिलिमीटर इतक्या लांबीची असतात. ही स्वादाला खूप छान लागतात. या भाजीत बरीचशी पोषकतत्व व खनिज असतात, जी आपल्या तब्येतीसाठी खूप लाभदायक असतात. चला तर मग विस्ताराने जाणून घेऊया, तोंडल्याच्या सेवनाचे फायदे व नुकसान काय होतात ते.

तोंडल्याची पौष्टिक तत्व: तोंडल्यात बरेच पोषकतत्व व खनिज असतात. यात मोठ्या प्रमाणात फायबर, आयर्न, विटामीन बी १, विटामीन बी २, थायमिन, कॅल्शियम, पोटेशियम असते.

तोंडल्याचे हे फायदे आहेत: पचंनासाठी फायदेशीर: पाचनसंस्था मजबूत करण्यासाठी तोंडल्याचे सेवन जरूरी आहे. यात चांगल्या प्रमाणात फायबर असल्यामुळे ते अन्नपचन करायला मदत करते. फायबर शरीरातील मळ एकत्रित करतो, त्यामुळे “बवासिर” सारख्या आजारापासून आपला बचाव होतो. हल्ली बरेच लोक, जंक फूडचे सेवन करतात, त्यामुळे त्यांच्या अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. म्हणून जास्त फास्ट फूड खाऊ नका. आपल्या आहारात तोंडल्याचा समावेश जरूर करा.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी: बरेचसे लोक आपला लठ्ठपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय करतात. पण आपले वजन कमी करण्यात अपयशी ठरतात. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल, तर तोंडली आपल्या जेवणात समाविष्ट करा. यात असेलेले फायबर तुमचे वजन कमी करायला मदत करते. जेवणात तोंडली समाविष्ट केल्यामुळे हळूहळू वजन कमी होऊन नियंत्रणात राहते.

मधुमेह नियंत्रित ठेवायला: मधुमेहानी त्रस्त असलेल्या लोकांनी तोंडल्याची भाजी जेवणात जरूर घेतली पाहिजे. तोंडली वाढलेली रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते आणि साखर नियंत्रणात राहते. पण जर तुमची साखर अगोदरच नियंत्रणात असेल, तर मात्र तोंडली वारंवार खाऊ नयेत. त्याने तुमची साखर कमी होऊ शकते.

चयापचयाची क्रिया व्यवस्थित ठेवायला: चयापचयाची क्रिया ही माणसाच्या अन्नपचंनासाठी अत्यंत महत्वपूर्ण क्रिया आहे. जसे की तुम्हाला माहीत आहे, की तोंडल्यामध्ये मैग्नेशियाम, थायमिन उत्पन्न होते, जे परिवर्तीत होऊन त्याचे ग्लुकोज बनते. ऊर्जा शरीरासाठी खूप जरूरी आहे, ज्यामुळे काम करण्यास आळस न येता, उत्साह वाढतो. काही शास्त्रज्ञानच्या मते तोंडली शरीरात लाल रक्तपेशी तयार करतात. कारण थायमिन आणि विटामीन बी१ हे ऊर्जा वाढवतात आणि चयापचयाची क्रिया व्यवस्थित होते.

किडनीस्टोन मध्ये फायदेशीर: किडनीस्टोनचा आजार खूप क्लेशकारक असतो. तुम्हाला सुरूवातीला त्याची लक्षणे दिसू लागली, तर आपल्या रोजच्या जेवणात तोंडल्याचा समावेश जरूर करा.

नुकसान: जर तुमच्यावर कोणत्याही प्रकारची सर्जरी होणार असेल, तर मात्र तोंडली सेवन करू नका, कारण ही शरीरातील रक्तशर्करा कमी करतात. कोणत्याही गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही उत्तमच कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे एखादा सल्ला किंवा उपाय हा सर्वांसाठी लागू होईल असे नसते. त्यामुळे लेखातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्या शिवाय कोणतेही पाऊल उचलू नये.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *