“पाणी” हे आपले जीवन आहे. एका शोधत असे आढळले आहे, की शरीर ७० टक्के पाण्याने बनलेले आहे. पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. मग ते तुम्ही गरम पाणी प्या, किंवा कोमट प्या. शक्यतो, फ्रीजचे थंडगार पाणी पिऊ नये, त्यांने तुमची हाडे ठिसुल होतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की पाणी पिण्याने नुकसान पण होऊ शकते. दिवसात कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी पिणे हे शरीरसाठी उत्तम असते. पण त्यापेक्षा अधिक पाणी पिणे हे शरीरसाठी नुकसानकारक असते. आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असल्याने आपल्याला अधिक पाण्याची जरूरी नसते. तेवढेच पाणी प्यायला पाहिजे, जितकी आपल्याला तहान लागली असेल.
शरीरावर सूज येणे : बहुतेक लोक जेवणानंतर पाणी पिणे पसंत करतात. यामुळे शरीराचे संतुलन व्यवस्थित राहते आणि जेवण पचायला मदत होते. पण तुम्हाला कधी जाणवले आहे का, की जास्त पाणी प्यायल्यामुळे पोटाला तडस लागते आणि पोट फुगल्यासारखे वाटते. जास्त पाणी प्यायल्यामुळे शरीरातील सोडियमच स्तर कमी होतो, व शरीराला सूज येऊ लागते. शरीरात सोडियमचा स्तर १३५ मिलीमीटर प्रति लीटरच असला पाहिजे. तो जर वाढला, तर तुम्हाला सूज, ओकारी येणे, मळमळ वाटणे, जास्त लघवी होणे आणि डोकेदुखी या समस्यांना तोंड द्यावे लागते.
जेवल्यानंतर बरेच लोक पाणी पिणे पसंत करतात. जेवणानंतर पाणी पिणे ही आपली सवय बनून गेली आहे. चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, काही वेळा पाणी माणसासाठी नुकसांनकारक ठरू शकते. जसे की जेवणानंतर पाणी पिणे. आज आम्ही तुम्हाला जेवणानंतर पाणी प्यायल्याने काय होते, हे विस्ताराने सांगणार आहोत. चला तर मग समजून घेऊया-
चुकूनसुद्धहा जेवणानंतर पाणी प्यायचे नाही, तसेच जेवायच्या आधी नाही, जेवताना नाही तसेच जेवणानंतर पण पाणी पिणे चुकीचे आहे. जेवल्यानंतर जवळ जवळ एक तासानंतर पाणी प्यायला पाहिजे, कारण जेवण पचायला जवळ जवळ दोन तास लागतात, आणि तेव्हा शरीरात जेवण पचत असते. तेव्हा शरीरात द्रव घन पदार्थांचे काही कार्य नसते, अशावेळेस जर आपण पाणी प्यायले, तर ते सर्व कार्य किंवा क्रिया बिघडते व जेवण पचायला खूप वेळ लागतो. त्यामुळे आपली पचनक्रिया बिघडते.
आपले शरीर चांगल्या रीतीने पैक्रियास पैक्राटिक रस तयार करू शकत नाही. ज्यामुळे, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, शरीरात चरबी वाढणे, गॅस, बवासिर, पचंनाच्या तक्रारी, खाज, खुजली, त्वचारोग, फोड येणे, मुहासे यासारख्या रोगांना तोंड द्यावे लागते. डॉक्टर सुद्धहा जेवल्यानंतर एक तासाने पाणी पिण्याचा सल्ला देतात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.