तुम्हाला क्वचितच माहिती असेल की जमिनीवर बसून जेवल्यामुळे बदलू शकते तुमचे जीवन, हे आहेत फायदे…

आजकाल लोक टेबलवर बसून, सोफ्यावर बसून, किंवा अगदी आरामात झोपून टीव्ही बघता बघता जेवतात. पण ही पद्धत खूप चुकीची आहे आणि आजकाल तीच प्रचलित झाली आहे. टीव्ही बघता बघता आपण काय खातो, किती खातो इकडे आपले लक्षच नसते. त्याचा परिणाम, लहान थोर सगळ्यांनाच भोगावा लागतो. लट्ठपणा ही आजची मोठी समस्या आहे. त्यामुळे आपण वेगवेगळ्या रोगांना आमंत्रण देत असतो, जसे मधुमेह, उच्च रक्तदाब.

आजकाल, आपण खाली पंगतीत बसून जेवायचे तर विसरूनच गेलो आहोत. आजच्या आधुनिक युगात, लग्नामध्ये तर बुफे पद्धत आहे. हातात ताटे घेऊन कुठेतरी उभे राहून जेवायचे. भोजनाचा खरा आस्वाद तर त्यामुळे मिळतच नाही. उलट, रांगा असल्यामुळे परत काही घ्यायला लागू नये, त्यामुळे आपण जास्तच अन्न ताटात वाढून आणतो, त्यामुळे अन्नाचा अपव्यय होतो व खाल्ले ही जास्त जाते. पण याकडे कोणी लक्ष देत नाही. हल्ली कोणालाच जमिनीवर बसून जेवण्याची सवयच राहिली नाही.

पण, मित्रांनो, जमिनीवर बसून जेवण्यात एक वेगळीच मजा आहे, ते ही जर कुटुंब सोबत असेल तर फारच उत्तम. जमिनीवर बसून जेवणे म्हणजे एक प्रकारचा योगा आहे. त्यांचे खूप आणि आश्चर्यकारक फायदे आहेत, ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग, माहिती करून घेऊया, जमिनीवर बसून जेवण्याचे काय काय फायदे आहेत?

जमिनीवर बसल्यामुळे आपल्या शरीरातील भोजन पचनाच्या शक्तीला मदत होते आणि भोजन अगदी सहज पचते. भोजनाचा आस्वाद सुद्धहा व्यवस्थित घेता येतो, हे त्यामागचे मुख्य कारण आहे. जमिनीवर बसून भोजनाचा एक फायदा असाही आहे, की आपल्या पाठीच्या मणक्याचे हाड मजबूत होते व पाठीचे जर काही दुखणे असेल तर ते नक्कीच कमी व्हायला मदत होते. त्यामुळे माणसाचे आयुष्य वाढते.

जमिनीवर बसून शांत मनस्थितीत भोजन केल्याने, आपल्या शरीराचे रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते, ज्यामुळे हृदयाच्या संबंधित असलेल्या कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागत नाही. तुम्ही पाहिले असेलच गावातील लोक नेहमीच जमिनीवर बसून जेवतात. म्हणूनच अधिकाधिक गावातील लोकाना कधीही हृदयासंबंधित तक्रारीना तोंड द्यावे लागत नाही. त्यांना हृदयाचे आजार कधीच होत नाहीत.

जमिनीवर आपण जर मांडी घालून बसलो, ज्याला आपण सुखासन म्हणतो, तर या स्थितीत आपले डोके शांत राहते आणि भोजन पचण्यासाठी पण याचा खूप फायदा होतो, आणि शरीराला समाधांनाची अनुभूति होते. आपण जेवणाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो. जेव्हा तुम्ही मांडी घालून बसता, तेव्हा त्या स्थितीत पाठीचा मागचा भाग आणि कमरेला जोर पडतो. त्यामुळे भोजन सहजपणे पचते.

Leave a Reply

Your email address will not be published.