सकाळच्या नाश्तामध्ये पोहे खात असाल तर ही माहिती अवश्य वाचा….

“पोहा” हा असा एक शब्द आहे, ज्याचे नाव काढले की तोंडाला पाणी सुटते. लहानांपासून मोठयांपर्यंत ह्याचे पदार्थ सर्वांना आवडतात. पोहे फक्त उत्तर भारतातच पसंत केले जातात असे नाही, तर दक्षिण भारत आणि भारताच्या इतर सर्व प्रांतात पोहे चविने खाल्ले जातात. स्वस्त आणि चवीला मस्त असा हा खाद्यपदार्थ आहे. परंतु, आपण पोहयांचे सेवन जर सकाळी ब्रेकफास्टला केले, तर ते शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. पण हल्ली मुलांना पोहे हा प्रकार फारसा आवडत नाही. त्यांना वेगवेगळ्या पाश्चिमात्य पदार्थांची चटक लागली आहे. त्यांना ब्रेकफास्टमध्ये, पास्ता, पिझ्झा, नुडल्स असे पदार्थ आवडू लागले आहेत.

ब्रेड हा तर हल्ली घराघरात खाल्ला जातो. पण तो मैद्यापासून तयार करतात, त्यामुळे तो जास्त प्रमाणात खाणे शरीराला नुकसांन करणारे आहे. म्हणून लहान मुलांना आपणच सवय लावली पाहिजे आपले भारतीय पदार्थ खाण्याची, कारण त्यांना आपल्या भारतीय पदार्थांची महती कळली नाहीये. ती सांगण्याचा आज आमचा प्रयत्न आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला सकाळी ब्रेकफास्टला पोहे खाण्याचे फायदे सांगतो:

अतिशय हलका पदार्थ: सकाळी ब्रेकफास्टला पोहे खाणे खूपच फायदेशीर आहे. पोहे अतिशय हलका असा खाद्यपदार्थ आहे. हा तांदूळापासून बनवला जातो. पोहे दोन प्रकारचे असतात. एक जाडे व दुसरे पातळ पोहे. त्यामुळे तो लवकर पचतो आणि ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते पण जड नाही होत. पोहयांचे अनेक प्रकारही करता येतात. जसे की, शिजवून बटाटा, कांदा घालून केलेले पोहे, पोह्याची कटलेट, आप्पे, धिरडी, उतप्पे व चिवडा जो दिवाळीतील पदार्थसुद्धहा आहे.

गावाकडील महिला याचे पापड देखील बनवितात. पूर्वीपासून ज्यांची तांदूळाची शेती आहे, त्यांच्याकडे पोहे हे गिरणीत दळून आणले जातात व सणासुदीला घरच्या पोहयांचे प्रकार केले जातात. शिवाय चिवड्यासारखा पदार्थ मुलांना खाऊच्या डब्यात पण देता येतो. सकाळी ब्रेकफास्टला खाल्लेले खाद्यपदार्थ पौष्टिक आणि खूप वेळ शरीराला ऊर्जा देणारे असले पाहिजेत. पोहयात हे सर्व गुणधर्म असतात, म्हणून सकाळी ब्रेकफास्टला पोहे खाणे खूप लाभदायक असते.

शरीरासाठी फायदेशीर: पोहयांमध्ये जास्त प्रमाणात आर्यन असते. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाले, तर पोहे आपल्या शरीरातील आर्यनची कमी पूर्ण करण्यास समर्थ आहेत. पोहयांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असल्याने शरीराला ते पोहयातुन मिळते आणि जर तुम्ही खूप लवकर थकत असाल, तर जरूर आपल्या ब्रेकफास्टमध्ये पोहयाचा समावेश करा. पोहे तुम्हाला भरपूर प्रमाणात ऊर्जा देतात आणि तुमच्या शरीरातील कार्बोहायड्रेटची कमी भरून काढतात.

तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खाल्ल्याने ती दूर होते. पोह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. गर्भवती महिलांनी तसेच लहान मुलांनी पोहे खाल्ले पाहिजे ज्यामुळे त्यांना हिमोग्लोबिन मिळेल. हा लेख तुम्हाला आवडला तर लाइक करायला मात्र विसरू नका. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.