कानातील मळ मिनिटात काढण्याचा यापेक्षा चांगला उपाय कोणताच नाही, तुम्ही पण जाणून घ्या…

आपल्याकडे प्रदूषणाची समस्या खूप मोठी आहे. असंख्य गाड्या, ट्रॅफिक, धुळीचे लोट यामुळे प्रदूषण वाढते आहे. ती उडालेली धूळ एकतर तुमच्या चेहर्‍यावर बसते, तुमच्या कानात जाऊन मळ तयार करते. आता हा मळ काढायचा कसा, साधे खोबरेल तेल घातले तर तो चिकट होऊन निघत नाही. पूर्वीच्या काळी लोक समुद्र फेस कानात घालत असत, त्यामुळे फसफस होऊन मळ निघत असे. आता तो कुठेही मिळत नाही व ती पद्धत जुनी झाली. मग काय उपाय करावा, हा साधारण प्रश्न पडतो. म्हणूनच, आम्ही तुमच्या या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगणार आहोत. पण हा लेख वाचलात तर कळेल तुम्हाला, वाचा मग:

आज आम्ही तुम्हाला कानात जमा झालेला मळ काढण्याचा अगदी चांगला व सोपा उपाय सांगणार आहोत. जर तुम्हीसुद्धहा कानात जमलेल्या मळ साफ करण्याच्या बाबतीत हैराण असाल, तर हा लेख केवळ तुमच्यासाठी आहे.

तुम्हाला हा उपाय करण्यासाठी दोन वस्तूंची जरूर लागणार आहे. यात पहिले आहे, मोहरीचे तेल आणि दुसरे आहे ईयर क्लीनर. ह्या दोन्ही वस्तु तुम्हाला सहज बाजारात मिळतील व त्या तशा खूप महाग पण नाहीत. हा उपाय करताना, तुम्हाला कानात प्रथम २ थेंब मोहरीच्या तेलाचे टाकायचे आहेत. आता तुम्हाला १५ मिनिटे थांबायचे आहे. कानात मोहरीचे तेल टाकून १५ मिनिटे झाली, की मोहरीचे तेल व मळ एकत्र तुमच्या कानात जमा व्हायला लागते. आता तुमच्या कानातील मळ बाहेर येऊ शकतो. पण घाई करू नका. थोडा वेळ जाऊ द्या.

१५ मिनिटांनी तुम्ही कानात ईयर क्लीनर अत्यंत काळजीपूर्वक घाला आणि हळू हळू मळ काढायला सुरुवात करा. ईयर क्लीनर जास्त आतपर्यंत टाकायचे नाहीये नाहीतर तुमच्या कानाला इजा होऊ शकते.

तुमच्यापैकी काही लोकांना हा उपाय माहीत असेल, तर काही लोकांना या बाबतीत काहीच माहिती नसेल. पण ज्या लोकांना हा उपाय माहीत नाहीये, त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण इलाज असू शकतो. मोहरीच्या तेलामुळे कानातील मळ ईयर क्लीनरला सहजपणे चिकटतो आणि आपण सहजतेने कानातील मळ काढू शकतो. पण हा उपाय करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.