प्रेम ही मानवी जीवनातील सर्वात सुंदर भावना आहे. मुलगा, असो किंवा मुलगी पहिले प्रेम हे व्यक्तीच्या जीवनात खूप महत्वाचे आहे. जीवनात बर्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्याला समोरची व्यक्ती आपल्या वरती प्रेम करते का मैत्रीच्या भावनेने बघते हेच कळत नाही. आणि विशेष म्हणजे प्रेम हे नेहमी मैत्री पासूनच सुरू होते. असे मानले जाते की जेव्हा एखादी मुलगी एखाद्यावर प्रेम करते तेव्हा ती मुलाला समजावे म्हणून काही हावभाव करते. म्हणून आज आम्ही तुम्हाला मुलीबद्दलच्या अशा काही दृश्यांविषयी सांगणार आहोत, ज्यामुळे समोरच्या मुलीकडून तसे होत असेल तर हे स्पष्ट होते की मुलीचे देखील आपल्यावर प्रेम आहे.
मुलगी तुम्हाला रोज गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज स्वतःहून करत असेल म्हणजे भाव देत असेल. “जीएफ आहे का?” असं विचारून “तुला कशी जीएफ हवीय?” असं विचारत “मला ना केअरिंग गाय हवाय” असं न विचारताच तुम्हाला सांगत असेल. तुम्हाला तुमच्या सेल्फीज मागत असेल किंवा न विचारता ही तुम्हाला तिच्या सेल्फीज पाठवत असेल. ती मुलगी तुमची चूक असताना ही, स्वतःहून सॉरी म्हणेल. जर समोरच्या मुलीला तुम्ही आवडत असाल तर ती तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघेल व या दरम्यान होठांवरती एक छोटीसी स्माईल नक्की देईल. आणि वारंवार तुमच्याकडे पाहणे हा तिचा इशारा असेल की तिला तुम्ही खूप आवडत आहे. आणि तुम्ही दिसताच तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल. “चल ना भेटू” असं ती स्वतःहून विचारेल, तुम्ही म्हणाल तिथे भेटायला येईल.
जेव्हा एखाद्या मुलीला तुम्ही आवडत असाल, तेव्हा ती तुमच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला काय आवडते आणि तुम्हाला काय आवडत नाही, याबद्दल तुम्हाला नक्कीच विचारेल. जेव्हा एखाद्या मुलीला तुम्ही आवडत असाल, तेव्हा ती तुम्हाला तुमच्या जुन्या मैत्रिणीबद्दल (girlfriend) नक्की विचारेल, ती नेहमी तुम्हाला असा प्रश्न विचारेल की तुमची कोणी मैत्रीण (girlfriend) आहे का, याचा अर्थ असा आहे की मुलगी तुमच्या आयुष्यात येऊ इच्छित आहे.
जेव्हा जेव्हा एखादी मुलगी आपल्याशी लखलखीत होते, ती आपल्या डोळ्यांकडे पाहून आपले केस ठीक करते, आपल्या कानातले किंवा कानाला वारंवार स्पर्श करेल आणि किंवा आपल्या ओठांना चर्वण करेल. जर एखादी मुलगी तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती जास्तीत जास्त वेळ तुम्हाला न्याहाळण्यात घालवते.सतत तुमच्या आसपास रहायचा प्रयत्न करते.अगदी अंधारात,गोंगाटात आणि गर्दीतही ती तुम्हाला शोधून काढते आणि एकटक पाहात राहते.कदाचित ती तुम्हाला पाहताना ‘आपण त्याच्याबरोबर फार रोमॅंटीक वेळ घालवतोय’ या आशयाचे दीवास्वप्न पाहत असाव्यात..!
जेव्हा एखाद्या मुलीला तुम्ही आवडत असाल, तेव्हा ती मुलगी तुमच्या सोबत बोलण्यासाठी वारंवार नवनवीन बहाणे बनवेल आणि विनाकारण मज्जा मस्ती करत तुमच्याशी बोलण्याचे वेगवेगळे निमित्त बनवेल. जेव्हा ती तुम्हाला अन्य मुलीबरोबर बोलताना बघेल तेव्हा ती तुमच्यवरती खूप रागवेल. आणि या गोष्टींचा अर्थ असा आहे की ती मुलगी तुमच्यावर खूप प्रेम करते. ती मुलगी, तिच्या मैत्रिणीचे सगळे गॉसिप तुम्हाला सांगत असेल. “तुला लॉंग ड्राइव्ह आवडतं का?” याचा भावार्थ “आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ” असा होतो, एखादा मुलगा आवडत असेल तरच ती मुलगी असा प्रश्न त्याला विचारेल. तुम्ही मेसेज केला आणि पाऊण सेकंदात जर तिच्याकडून रिप्लाय येत असेल तर समजून घ्या.. आता चिंता मिटली, ही मुलगी पटली!!
मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.