मिस इंडिया राहिली आहे परेश रावल यांची पत्नी आज पण दिसते खूपच सुंदर….

बॉलीवूडमध्ये परेश रावल हे नाव कोणी ओळखत नाही असे होऊ शकत नाही. ते नेहमीच मुख्य भूमिकेत दिसले आहेत. बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, पण परेश रावल यांची भूमिका नेहमीच लोकप्रिय झाली आहे. परेश रावल यांनी आपल्या करियरमध्ये बोलीवूडच्या अनेक फिल्म्समध्ये काम केले आहे. त्या सर्व फिल्म्स लोकप्रिय झाल्या आहेत आणि आता परेश रावल एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखले जातात. त्यांची “हेरा फेरी” मधील “बाबूभैय्या” ही भूमिका तर प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत.

पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत, ज्यानी त्यांच्या काळात “मिस इंडिया” हा किताब पटकावला आहे. परेश रावल यांच्या पत्नीचे नाव डॉ. स्वरूप संपत असे आहे. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९५८ ला झाला होता. स्वरूप संपत ह्या एक भारतीय अभिनेत्री आहेत, आणि त्यांनी “नरम गरम” आणि “नाखुदा” यासारख्या फिल्म्समध्ये काम केले होते. तसेच त्यांनी टीव्ही मालिका “ये जो है जिंदगी” या मालिकेत उत्तम काम केले होते. स्वरूप यांनी आपले शिक्षण वोर्केस्टोर यूनिवर्सिटीतून पूर्ण केले आणि त्यांनी पीएचडी केली आहे. त्या गुजराती परिवारात जन्मल्या आणि त्यांच्यावर गुजरातीचा पगडा आहे. कॉलेज शिक्षण घेत असतानाच त्यांनी गुजराती नाटकातून कामे करायला सुरुवात केली होती.

स्वरूप संपत या बॉलीवूडच्या अभिनेत्रीसुद्धहा आहेत. स्वरूप संपत १९७९चा “मिस इंडिया” हा किताब जिंकलेल्या आहेत. त्या अभिनेत्री, मॉडेल आणि निर्मात्या आहेत. स्वरूप संपत यांनी फिल्म्स व्यतिरिक्त टीव्हीच्या धारावाहिकेत काम केले आहे.

परेश रावल आणि स्वरूप संपत हे दोघेही नाटकाचे शौकीन आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. परेश रावल यांनी स्वरूप संपतला प्रथम कॉलेजमध्ये असताना पाहिले. त्यांनी लगेचच आपल्या मित्राला सांगितले की, मी याच मुलीशी लग्न करणार. त्यांच्या पहिल्या भेटीच्या आठवणी सांगताना स्वरूप म्हणतात:

त्यावेळी मी गुलाबी साडी परिधान केली होती आणि मी माझ्याकडे असलेले काही महत्वाचे पेपर्स वाचत होते, तेवढ्यात परेश माझ्याजवळ आले, व मला म्हणाले, मी तुझ्याशी लग्न करणार आहे. पण नंतर मात्र वर्षभर ते माझ्याशी या विषयावर काहीही बोलले नाहीत. पण त्यांच्या नाटकातल्या अभिनयाने मी पण त्यांच्या प्रेमात पडले.

परेश रावल यांच्याबरोबर लग्न केल्यानंतर त्यांना २ मुलगे आहेत. त्यांची नावे अनुक्रमे रुद्र आणि आदित्य रावल अशी आहेत. तुम्ही त्यांच्या पत्नी आणि परेश रावल याबद्दल आपली मते देऊ शकता, त्यासाठी आम्हाला लाइक करून व कमेन्ट बॉक्स मध्ये तुमचे मत टाकू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *