फक्त कष्ट करून कोणी श्रीमंत होत नाही , त्यासाठी या ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा….

नमस्कार मित्रांनो आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, राशींवर नाही. रास तर राम आणि रावणाची पण एक होती. परंतु फळ मात्र त्यांच्या कर्माप्रमाणेच मिळाले. कोणाचीही सद्याची परिस्थिती बघून त्याच्या भविष्याचा उपहास करू नये. कारण काळात एवढी ताकद आहे की वेळ आल्यास कोळशाचे ही हिऱ्यात रूपांतर होते. श्रीमंतांच्या घरावर बसलेला कावळा सुद्धा सर्वाना मोर वाटतो. तर गरीब आणि उपाशी मुलगा सर्वाना चोर वाटतो. माणसांच्या चांगल्या पणा ची चर्चा होत असेल, तर सर्व जण गप्प बसतात. पण जर त्याच्या दुर्गुणांवर चर्चा होत असेल तर मुखी व्यक्ती सुद्धा बोलू लागते.

“जे पाण्याने अंघोळ करतात ते कधीही यशस्वी होत नाहीत, तर जे घामाने अंघोळ करतात ते जीवनात खरे यशस्वी होतात”. जीवनात जर पुढे जायचे असेल तर बहिरे व्हा.. कारण लोकांचे बोलणे ऐकालं तर तुमचे मनोबल कमी होईल. व तुम्ही कधीही मोठे होऊ शकणार नाही. कधीही आपली तुलना इतरांशी करू नये. कारण सूर्य व चंद्र दोन्ही चमकतात पण आपल्या आपल्या वेळेवर…

जीवनात अश्या व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत… एक म्हणजे जे विचार करतात पण आमलात आणत नाहीत.. दुसरे म्हणजे जे करतात पण त्याचे विचार करत नाहीत.. तुम्ही जर पळण्याचे साहस करणार नाही तर तुम्ही कोणत्याही स्पर्धेत यश मिळवू शकत नाही. एका व्यक्तीने चाणक्यांना विचारले जर आपले नशीब आधीच लिहिले गेले असेल तर प्रयत्न करून काय उपयोग..तेव्हा आचार्य यांनी खूप चांगले उत्तर दिले की जर नशीबात असेच लिहिले गेले असेल की प्रयत्न केल्यावरच मिळणार आहे, तर फुंकर मारून दिवा विजवू शकतो. पण एखाद्याचे नशीब आपण फुंकर मारून विजवू शकत नाही.

भविष्य काळाबद्धल चिंता करू नये व भूतकाळाबद्धल विचार करू नये. कारण याचा आता सद्य स्थितीत काहीच उपयोग नाही. वर्तमान काळात जगा आजचा दिवस चालला तो खरा. व्यक्ती आपल्या कार्याने मोठा बनतो. त्याच्या जन्माने नाही. आपल्याला काय करायचे आहे हे इतरांना सांगू नये. हे रहस्यच ठेवावे व आपले कार्य करत राहावे. जीवनात जर सफल व्हायचे असेल तर चांगल्या मित्रांची गरज असते. पण जर जास्त सफल व्हायचे असेल तर चांगल्या शत्रूंची गरज असते.

उत्पन्न कमी असेल तर खर्च नियंत्रणात ठेवा व संपुर्ण माहिती नसेल तर बोलण्यावर नियंत्रण ठेवा. चुकीच्या ठिकाणी जाणाऱ्या गर्दीपेक्षा एकटे योग्य ठिकाणी जाणे कधीही योग्य आहे. कोणतेही काम करायचे असेल तर आपण यशस्वी होऊ की नाही याचा विचार करू नये. ज्या व्यक्ती प्रामाणिक पणे काम करतात ते नेहमी आनंदी असतात. नेहमीत पणे अभ्यास न केल्यास ज्ञान ही कमी होते. जीवनाच्या शर्यतीत जे तुम्हाला हरवू शकत नाहीत ते तुमचे मनोबल खचवून मागे वडण्याचा प्रयत्न करतात.

कोणतेही नवीन काम सुरू करण्या अगोदर या काही गोष्टीकडे लक्ष देण्यास आचार्य चाणक्य सांगतात..कोणतेही कार्य सुरू करण्याअगोदर सकारात्मक विचार ठेवा. कारण नकारात्मक विचाराने सुरू झालेल काम कधीही पूर्ण होत नाही. आपले कार्य सुरू करण्या अगोदर ते कोणत्या ठिकणी करावे व कोणत्या वेळेस सुरुवात करावी हे आधी ठरवावे. तुम्हाला कोण मदत करू शकते याचा ही विचार करावा. जे काम तुम्ही करणार आहात ते काम तुमच्यासाठी योग्य आहे का हे पहा नाहीतर दुसरे काम निवडा आणि त्यात यशस्वी व्हा..

चाणक्यांच्या मते जे लोक तिखट आणि वाईट शब्द वापरतात ते कधीही धंदा करू शकत नाहीत. जर आपल्याला जोतिष शास्त्रावर विश्वास असेल तर तुमच्या जोतिषला विचारून मग सुरुवात करा. आपण जे काही कार्य करणार आहोत ते आपल्या जोडीदाराला आवश्य सांगा. म्हणजे त्यात तुम्हाला त्यांची साथ मिळेल. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.