का असतो जीन्सला छोटा खिसा, ९० टक्के लोकांना चुकीची माहिती आहे…

आज आपण एका जीन्स पॅंटच्या विषयी जाणून घेणार आहोत, ज्याबद्दल ९० टक्के लोकांना चुकीची माहिती आहे. नेहमी असे बघण्यात आले आहे, की जीन्सच्या समोरच्या खिशाच्यावर एक छोटासा खिसा पण दिलेला असतो. हा का दिला जातो? काही लोक म्हणतात, की तो खिसा किल्ली, नाणी अशा लहान गोष्टी आहेत, ज्या सहज पडून गहाळ होऊ शकतात, त्या ठेवण्यासाठी दिलेला असतो. पण सत्य या सर्वाहून वेगळे आहे. चला तर मग जाणून घेऊया, काय आहे त्यामागचे कारण.

प्रथमतः जीन्सचा उपयोग सोन्याच्या खाणीत काम करणार्‍या मजुरांमार्फत केला जात होता. ते नेहमी निळ्या रंगाच्या जीन्स वापरत असत. कारण जीन्स मजबूत व खूप टिकणारी असल्यामुळे बराच काळ वापरता येते. मजुरांच्या पॅंटला बाजूचा खिसा हा छोटे घड्याळ ठेवण्यासाठी असे. कारण त्याकाळी आजच्यासारखे मोबाइल फोन नव्हते व हातात वापरायची घड्याळे पण नव्हती.

डेनीमच्या जीन्स प्रथम १८०० मध्ये मजुरांनी वापरायला सुरुवात केली. त्या शिवणारा शिंपी होता, जेकब डेविस. त्या मजबूत असल्याने खाणीत काम करणे सोपे जात असे. १९२० आणि १९३० मध्ये जीन्स पाश्चिमात्य पोशाख म्हणून प्रथम यूनायटेड स्टेट्समध्ये नावारूपाला आली. खाणी कामगार, गुराखी, आणि इतर पुरुष कामगार ती वापरू लागले, त्याचे कारण ती जास्त टिकवू होती. नंतर जीन्समध्ये अनेक बदल होत गेले.

१९३६ मध्ये लेवी स्ट्रॉस यांनी जीन्सला मागील खिशाची सुरुवात केली आणि आरेखकाची खूण (designer label) मागील बाजूस शिवली. खिशांना धातूची अत्याधुनिक बटणे आली व त्या जास्तच टिकाऊ बनत गेल्या. १९३० मध्ये वोगुए या मासिकाने आपले जीन्स परिधान केलेले पहिले मॉडेल मासिकात छापले. त्यात असेही लिहिले होते, की जीन्स महिलांसाठीसुद्धहा एक आधुनिक वस्त्र ठरू शकते.

तरुणांना तर ब्ल्यु जीन्सने खूपच प्रभावित केले. जेव्हा हॉलीवूड सिनेमातून जीन्स ही एक आधुनिक प्रतिष्ठा म्हणून वापरली जाऊ लागली , तेव्हा युवा पिढीने ही गोष्ट उचलुन धरली. नंतर, जेम्स डिन आणि मर्लोन ब्रँडो या फिल्म अभिनेत्यांचे अनुकरण युवा पिढी करू लागली. पण अमेरिकेमधल्या काही शाळांमधून यावर बंदी घालण्यात आली होती, कारण ब्ल्यु जीन्स ह्या फारच उत्श्रुंखल दिसतात असे त्यांचे म्हणणे होते.

१९६० च्या दशकात सुरू असलेला काउंटर-कल्चर डेनिमचा प्रभाव १९७० च्या दशकापर्यंत चालू राहिला. तर या दशकात डेनिम देखील नवीन, आणि सर्व अमेरिकन आधुनिकीकरणाचे प्रतीक म्हणून आला. चार्लीच्या एंजल्स अभिनेत्री फर्राह फॉसेट आणि मॉडेल लॉरेन हट्टन यांच्यासारख्या दशकाच्या सुंदर आणि तजेलदार दिसणार्‍या अभिनेत्रीने मादक रूपात मॉडेलिंग केले. दरम्यान, डेनिम स्कर्ट आणि डेनिम व्हेस्टेटही ७० च्या दशकातील लोकप्रिय फॅशन वस्तू बनल्या. तर अशी ही जीन्स आता तर तरुणाईची गरज झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *