हिंदू धर्मात साप हा एक दैवी प्राणी मानला जातो, म्हणूनच आपल्या देशात सापांची अनेक प्राचीन मंदिरे अस्तित्त्वात आहेत. प्रत्येक वर्षी नागपंचमीनिमित्त सर्व नाग मंदिरांमध्ये, भाविकांची गर्दी असते. तर प्रत्येक घरात नागांची पूजा केली जाते. सापाची भिती प्रत्येकाच्या मनात घर करून असते. सर्प मित्र सोडले तर सापासोबत कोणी पंगा घेत नाही. साप दिसला तर अंगाला काटा येतो. सध्या सर्प दंशामुळे प्रत्येक वर्षी हजारो लोक मृ त्यु मु खी पडत आहेत. विकासाच्या नावाखाली होत असलेली जंगल तोड यामुळे साप माणवाच्या वस्तीमध्ये आसरा शोधत आहेत. यामुळे अनेक विषारी साप माणसाच्या वस्तीमध्ये पाहायला मिळत आहेत. वस्तीमध्ये आढणारे प्रत्येक साप विषारी नसतात. मात्र सापाची अनामीक भिती प्रत्येकाच्या मनात असल्यामुळे भितीपोटी साप चाऊन मरणारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
जे साप विषारी असतात, त्यांच्या विषाच्या एका थेंबामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडू शकतात. विष शरीरात भिनल्यानंतर, उपचार वेळेवर न झाल्यामुळे अनेक लोक मृ त्यु मु खी पडल्याची उदाहरणे आपल्या आजू-बाजूला पहायला मिळतात. सापाचे विष शरीरामध्ये पेसरण्या पासून थांबवण्यासाठी, पीडिताला शक्य तितक्या लवकर डॉक्टरकडे घेऊन जावे. तुम्हाला तर माहीतच आहे की साप विनाकारण कोणत्याही मनुष्याला चावत नाही म्हणून शास्त्रात अशी 8 कारणे देण्यात आली आहेत, ज्यामुळे साप माणसाला चावू शकतो, तर चला जाणून घेऊ ही कोणती कारणे आहेत.
जर आपल्या कळत नकळत एखादा साप पाया खाली आला आणि जर साप आपला पाय त्याच्यावर पडला तर तो साप त्वरित दंश करतो. जर एखाद्या व्यक्तीने सापाच्या पिलाला मारण्याचा प्रयत्न केला किंवा कोणतीही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर तो साप आपल्या पिलाचे रक्षण करण्यासाठी देखील चावू शकतो. जर एखाद्या व्यक्तीने सापाला इजा केली असेल तर त्यास मारण्याचा प्रयत्न केला असेल तर आपला जीव वाचवण्यासाठी साप चावू शकतो.
जेव्हा साप उन्मादी म्हणजे पिसाळलेला असतो तेव्हा तो कोणत्याही वेळी कोणत्याही व्यक्तीस चावू शकतो. नाग – नागिनीच्या प्रणय प्रसंगाच्यावेळी जर कोणी व्यत्यय आणला तर साप त्यांना छेडणारांना दंश करू शकतो . हा प्रणय सुरू असताना नेहमी दूर उभे रहावे . जर एखादा साप भुकेला असेल तर तो कोणत्याही प्राण्याला चावू शकतो. साप हे भित्रे प्राणी आहेत. या भीतीमुळे अनेक वेळा साप माणसाला चावतो. सापाला विनाकारण छेडले किंवा मारण्याचा प्रयत्न केला तर साप चावा घेऊ शकतो.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.