या ५ प्रसंगी, नवरा बायकोने एकमेकांशी बोलले पाहिजे खोटे.. नाहीतर होईल…..

हे तर सर्वच जाणतात, की पति पत्नीच्या नात्यात खोटेपणाला जागा नाही. वैवाहिक जीवनात बोलले गेलेले एक खोटे तुमचे नाते तुटायचे कारण बनु शकते. एक वैवाहिक जोडप्याने एकमेकांशी खरे बोलणे हे त्यांचे नाते दृढ व मजबूत करते. परंतु, काही वेळेस परिस्थिति अशी असते, जेव्हा खरे बोलण्याऐवजी खोटे बोलण्याची जरूर पडते. कारण त्यावेळी, आपल्या नात्यासाठी तेच जरूरीचे असते. तर चला मग जाणून घेऊया, आजच्या या लेखात काय खास आहे ते:

भांडण संपवण्यासाठी : कितीतरी वेळा, जोडीदार काही कारणाने दडपणाखाली असतो, अशा वेळी, अगदी छोट्या गोष्टीवरून भांडण करणे हा मनुष्य स्वभाव आहे. अशा वेळी, आपण माघार घेऊन त्यांना म्हटले पाहिजे, “माझीच चूक होती, माफ करा”. यामुळे वाद व भांडण वाढण्यापासून आपण थांबवू शकतो. एवढेच नाही, जेव्हा ते नंतर शांत होतील, तेव्हा त्यांना स्वत:लाच त्यांची चूक कळून येईल. मित्र आणि परिवारावरुन : कितीतरी वेळा, असे बघण्यात येते की, पति पत्नीला एकमेकांचे मित्र किंवा परिवारातील मित्र किंवा नातलग पसंत पडत नाहीत. कितीतरी वेळा, ते त्यांच्याशी बोलणे पण पसंत करीत नाहीत. पण त्यांची उपस्थिती जर तुमच्या जोडीदाराला खुश करत असेल, तर तुम्हाला पण त्यांची थोडी थोडी प्रशंसा केली पाहिजे. त्यांच्याशी थोडेफार जुळवून घेतले पाहिजे.

जोडीदार काहीतरी नवीन करत असेल: जेव्हा पण आपला जोडीदार काहीतरी नवीन करत असेल, तेव्हा तुम्ही त्याची स्तुति केली पाहिजे. जर काही नवीन खाद्यपदार्थ केला, तर त्याची प्रशंसा केली पाहिजे, असे नाही की तुम्हाला आवडले नाही, तर लगेच नाव ठेवायला सुरुवात करू नका. नंतर, समजुदारपणे तो पदार्थ जास्त चांगला कसा होईल याच्याबद्दल तुम्ही बोलु शकता. भेटवस्तू मिळाल्यावर : काही वेळेला पति पत्नी एकमेकांसाठी काही भेटवस्तू घेऊन येतात. अशावेळी, जरी एखादी भेटवस्तू नाही आवडली, तरी ती स्वीकारा, त्याबाबतचे दोष काढू नका. खुशीत त्याचा स्वीकार करा आणि आपल्या जोडीदाराच्या भावनांची कदर करा.

मन दुखावले जाऊ नये यासाठी: असे होऊ शकते, की आपली काहीतरी गोष्ट आपल्या जोडीदाराला दडपण आणणारी असू शकते, तर हेच योग्य होईल, की या बाबतीत आपण त्याच्याशी खोटे बोलावे, किंवा काहीतरी सूचक बोलून त्याला कल्पना द्यावी, ज्यावरून तो स्वत:च समजून जाईल. जर, तुम्हाला वाटत असेल, की नंतर खरे समजल्यावर, जोडीदार जास्त दुखावला जाईल, तर, मात्र आपल्याला त्याच्याशी खरे बोलले पाहिजे व आपल्या मनातील गोष्ट त्याला सांगून, त्याच्या मनातील संदेह काढून टाकला पाहिजे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.