तुम्हाला माहिती आहे का, आचार्य चाणक्यजीनी आपल्याला वाईट बनायला सांगितले आहे. त्यांनी वाईट व्हा असे का सांगितले आहे? कोणत्या परिस्थितीत असे सांगितले आहे? या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचत राहा. आपली शिक्षिका, आपले आई-वडील आपल्याला हेच शिकवत आले आहेत, की नेहमी चांगले वागत राहा, कोणी वाईट वागले, तरी तुम्ही त्याच्याशी चांगलेच वागा, कारण तुम्ही पण वाईट वागलात, तर तुमच्यात व त्याच्यात काय फरक राहिला. नेहमी सज्जन पुरुष बनून राहा. नेहमी चांगले कर्म करीत रहा.
परंतु, दुसरे तुम्ही हे पण ऐकले असेल, जेव्हा साध्या मार्गाने काम होत नाही, तेव्हा वाकड्या मार्गाने जाऊन आपले काम करावे लागते. (एक म्हण आहे- जब सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है). जंगलात सुद्धा सरळ वृक्ष नेहमी लवकर कापले जातात, आणि शहाण्याला शब्दाचा मार, पण वेड्याला काठीचा मार द्यावा लागतो. मग तुम्ही पण विचारात पडलात ना, आपण कोणता मार्ग स्वीकारायचा, साधा मार्ग की वाकडा मार्ग?
दोनही बाजू आपआपल्या ठिकाणी योग्य आहेत. खूप चांगले वागणे पण बरोबर नाही, व खूप वाईट वागणे पण योग्य नाही. एवढे चांगले पण बनू नका, की लोक आपला पुरेपूर फायदा घेतील व आपल्याला गुळाप्रमाणे चघळून खातील व इतके वाईट पण होऊ नका, की कडूनिंबाप्रमाणे तुम्हाला खाऊ शकणार नाहीत. चांगले पण व्हा व वाईट पण व्हा. खूप चांगले वागलात, तर लोक तुम्हाला वाईट वागायला भाग पडतील, मग आपण स्वत:च का थोडे वाईट वागू नये. का आपण आपले काम सोडून इतरांची कामे करावी. आपण आपला चांगलेपणा सोडून, आपले हित सोडून दुसर्यांचे हित करत राहायचे. शेवटी आपल्याला हेच ऐकायचे आहे, की तू असाच आहेस, आणि तू तसाच आहेस, तू माझ्यासाठी काहीच केले नाहीयेस.
तुम्ही भलेही कोणासाठी हजारो कामे करा, पण जर तुम्ही एखादे काम नाही केलेत, तर तो व्यक्ति तुम्हाला ऐकवेल, की तू माझ्यासाठी काहीच करत नाहीस, तू माझा मित्र नाहीस. तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाला तो विसरेल आणि तुम्ही न केलेल्या कामाला पक्के लक्षात ठेवेल. जग खूप वाईट आहे, चांगले बनायला जाल तर फसाल. प्रथम स्वत:चा विचार करा, स्वत:चे भले करा. अशा योग्यतेचे बना की, तुम्ही दुसर्याची मदत करू शकाल व नंतरच कोणाचीही मदत करा. स्वत:ला इज्जत न देता, स्वाभिमान न बाळगता, स्वत:चे हित न बघता, दुंनियेला बदलायला जाऊ नका.
थोडे समजून घ्या, विचार करणे जरूरी आहे, खूप चांगले पण नको व खूप वाईट नको असे बना. नेहमी काळाप्रमाणे बदलत रहा. आशा आहे, तुम्हाला हा लेख पसंत पडला असेल.