नवरा बायको ने या 4 गोष्टी चुकूनसुद्धा करू नयेत नाहीतर….

असं म्हणतात नवरा बायकोचे नाते हे पवित्र नातं आहे. जेव्हा दोन व्यक्ती लग्न करतात, तेव्हा फक्त त्यांची शरीरे वेगळे असतात, आणि आत्मा मात्र एकच असतो. परंतु आज या धावपळीच्या जगात या सर्व गोष्टी फक्त पुराणातली वांगी म्हणून राहिली आहेत, आज स्त्री, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे चालली आहे. आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आजकाल नवरा-बायको दोघेही नोकरी करत असल्यामुळे दोघेपण स्वावलंबी झाले आहेत. एका बाजूला या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असताना, नवरा बायकोमध्ये असलेले प्रेम ते मात्र कुठेतरी मेकॅनिकल होत चालले आहे. आजचे प्रेम फक्त फेसबुक आणि व्हाट्सअपवर लोकांना दाखवण्यासाठी चांगले फोटो काढायचे, एवढ्यापुरतेच मर्यादित झाले आहे, पण पडद्यामागे वास्तव तर वेगळीच असते. आजकाल घटस्फोटाचे वाद प्रचंड वाढले आहेत, खरं तर एकमेकाच्या बद्दलची आपुलकी, प्रेम, आदर, कमी होत चालला आहे. तसे पाहायला गेले तर कारणे खूप आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला चार मुख्य कारणे सांगणार आहोत.

पहिले कारण म्हणजे अपेक्षांचा भडिमार…. आज छोट्या छोट्या कारणावरून जी नवरा बायको मध्ये भांडणे होतात, त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, एकमेकांकडून ठेवलेले अनावश्यक अपेक्षा.. त्याने मला फोनच केला नाही, त्याने माझ्या मेसेजला रिप्लाय दिला नाही, तो वेळेवर घरीच येत नाही, तो मला बाहेर कुठे फिरायला घेऊनच जात नाही, तो मला कधीही नवीन ड्रेस किंवा साडी घेऊनच येत नाही, किंवा तिने सकाळी इतक्यात वाजता उठले पाहिजे?, तिने हाच ड्रेस घातला पाहिजे, तिने मला जेवण वेळेवर दिले पाहिजे, दरवेळी तिने मला फोन केला पाहिजे, मित्रांनो तुम्हीच सांगा या असल्या प्रकारच्या अनावश्यक अपेक्षा आपण ठेवल्या तर आपला संसार कसा सुखी होईल. आता तुम्ही म्हणाल आपल्याच माणसांकडून अपेक्षा ठेवणार, बरोबर आहे, अपेक्षा ठेवा पण आग्रह धरू नका, की त्या पूर्णच झाल्या पाहिजेत. जिथे आग्रह निर्माण होतो तिथे वादाला सुरुवात होते, त्यापेक्षा एकमेकांना समजून घ्या, इथे नवरा आणि बायकोने दोघांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, की आपण अनावश्यक अपेक्षा तर ठेवत नाही ना….

दुसरे कारण तुझी चूक आहे आणि माझे बरोबर आहे, मित्रांनो विचार करा जेव्हा नवरा बायको प्रत्येक वेळेस दोघे पण हाच दृष्टिकोन ठेवतील की, नेहमी माझेच बरोबर आहे, तुझे चुकीचे आहे. तेव्हा कसा निर्णय होईल?, पण आजकाल या दोघांचे अहंकार एवढे मोठे झाले आहेत की, कोणच माघार घ्यायला तयार नसते. पण एक लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर आयुष्य घालवायचे असते. त्यामुळे एकमेकांना माफ करायला शिकता आले पाहिजे, समोरचा माणूसच आहे ना देव नाही तो चुका करणारच मात्र त्या चुका आपल्याला पोटात घालता आल्या पाहिजेत, एकमेकांचे दुर्गुण स्वीकार करता आले पाहिजेत, मला माहिती आहे ह्या गोष्टी बोलायला सोप्या आहेत पण करायला अवघड, पण आयुष्य सुखाने आणि आनंदाने जगायचे असेल तर हे करावंच लागेल. नाहीतर आयुष्य कधी निघून जाईल समजणार पण नाही त्यामुळे नवरा-बायकोमधले प्रेम टिकवायचे असेल, तर दोघांनी तडजोड करायला शिकले पाहिजे…….

तिसरे कारण एकमेकांची काळजी न घेणे, अनेक वेळा असे होते आपण एकत्र राहत असताना आपण ऐकमेकांची काळजी घेत नाही, असे वाटते घरातच आहे ना याच्यासाठी किंवा याच्यासाठी काय करायचे, आता जे हवं ते मिळालेले आहे. त्याला खुश करून काय होणार आहे, हे कुठे घराबाहेर जाणार आहे, आपल्याकडेच तर राहणार आहे, परंतु असे नाही तो तुमचा जीवनसाथी आहे. तो तुमच्या बरोबर आयुष्य काढणार आहे, त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे. त्याच्या तब्बेतेची, त्याच्या इच्छा, आकांक्षाची काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे, नवराबायकोच्या नात्यामध्ये जेव्हा ऐकमेकांबद्दल काळजी नसते. तेव्हा तिथे एकमेकांबद्दल आदर राहतं नाही आणि मंग भांडणे चालू होतात, कारण दोघांचे म्हणणे असे असते की, तो माझ्यासाठी काही करतच नाही, तेव्हा मी कशाला काय करू त्यामुळे ही भांडणे कधीच संपत नाहीत, त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला गृहीत धरण्याची चूक अजिबात करू नका…. जसे तुम्ही स्वतःच्या सुखाला महत्व देता स्वतःच्या इच्छांना महत्त्व देता तेवढेच महत्त्व तुम्हाला जोडीदाराच्या सुखाला सुद्धा देता आले पाहिजे

चौथे कारण जे सर्वात महत्त्वाचे आहे, जे आज-काल खूप वाढत चालले आहे. ते म्हणजे एकमेकांचा विश्वास घात करणे, ते मग कोणत्याही मार्गाने असू दे खोटे बोलून असुदे, किंवा दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवणे असू दे, जेव्हा नवरा-बायकोमध्ये विश्वासघात येतो तेव्हा ते नाते असणे नसणे यात काही फरक नसतो. विश्वास घात हे एक प्रकारचे विश आहे, जे नवरा- बायकोच्या पवित्र नात्याला मारून टाकते. त्याचा आत्माच निघून जातो. जे नवरा-बायको एकमेकांबरोबर विश्वास घात करतात ते फक्त एकमेकांचा विश्वासघात करत नाहीत तर ते आपल्या पूर्ण परिवाराचा विश्वासघात करतात, याने फक्त एकाचे आयुष्य बरबाद होत नाही. मुलांचे आयुष्य बरबाद होते, आई-वडिलांचे आयुष्यभर बरबाद होते, त्यामुळे नवरा-बायकोने एकमेकांबरोबर कधीच विश्वास घात करू नये, काही गोष्टी खटकत असतील तर मोकळेपणाने बोला. मी तर म्हणेल विचार जुळत नसतील तर समजूतिने वेगळे व्हा, कारण ते विश्वासघात करण्यापेक्षा कितीतरी चांगले आहे. पण विश्वासधात नावाचा साप तुमच्या आयुष्यात येऊ देऊ नका..

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.