घातक चित्रपटात सनी देओलची हिरोईन होती ही अभिनेत्री, आता त्यांची हालत पाहून विश्वास बसणार नाही…

नेहमीच बॉलीवुडमध्ये काम करणार्‍या अभिनेत्री कैमेराच्या प्रकाशझोतापासून दूर राहायचा प्रयत्न करतात. त्याच्याबद्दल आपल्याला काही कळत नाही. आज आम्ही तुम्हाला एका अशाच अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, ज्या अभिनेत्रीने कधीकाळी सनी देओल बरोबर फिल्ममधून खूप उत्तम अभिनय केला आहे, परंतु आज असे जीवन जगत आहे, की तुमचा विश्वास नाही बसणार. आम्ही बोलत आहोत, ८०च्या दशकात कितीतरी हीट फिल्म्स देणारी सुंदर व गुणी अभिनेत्री मिनाक्षी शिषाद्री जी आता बॉलीवुड आणि सिनेमे यापासून खूप दूर गेली आहे.

ती सार्वजनिक ठिकाणी पार्ट्यांमध्ये पण खूप कमी दिसते. अशातच, काही दिवसांपुर्वी तिची एक छबी सोशल मीडियावर दिसली, जी बघून प्रत्येकजण अचंबित झाला. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की तिच्यासोबत सिनेमात काम केलेले प्रसिद्ध अभिनेता पण मीनाक्षीला ओळखु शकले नाहीत. अशी बातमी येते आहे, की वाढत्या वयाचा परिणाम तिच्या शरीरावर दिसतो आहे. मीनाक्षी पहिल्यापेक्षा खुपच बदलली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता ऋषि कपूरने तिची छबी बघून विचारले होते, तुम्ही हिला ओळखता का? मी तर नाही ओळखले. त्यानंतर मीनाक्षीबद्दलची चर्चा जोरात सुरू झाली. बॉलीवुडच्या या अभिनेत्रीने तिच्या जमान्यात सगळ्याच मोठ्या अभिनेत्यांबरोबर काम केले होते.

१९८१ मध्ये “मिस इंडिया” बनलेल्या मीनाक्षीच्या फिल्मी करियरची सुरुवात हिंदी फिल्म “पेंटर बाबू” ने झाली, ज्यात तिच्याबरोबर मनोज कुमारचा भाऊ राजीव गोस्वामी होते. त्यानंतर, सिल्वर स्क्रीनवर जादू करण्याची जी कला मीनाक्षीने आपलीशी केली, तिने लोकांना आपल्या अभिनयाने घायाळ केले. हीरो, मेरी जंग, विजय, शहंशाह, घायल, दामिनी एवं डुएट अशा उत्तम व लाजवाब फिल्मसनी तिला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.

१५ वर्षाच्या करियरमध्ये तिने जवळ जवळ ८० फिल्ममध्ये काम केले. २२ जून १९९० साली आलेली फिल्म “घायल” जी एक ब्लॉकबस्टर फिल्म म्हणून प्रसिद्ध झाली. या फिल्मच्या वेळेस फिल्मचे डायरेक्टर राजकुमार संतोषी यांना फिल्मची हिरोइन मीनाक्षीबद्दल प्रेम वाटू लागले.

मीनाक्षीनी मात्र राजकुमार संतोषीच्या प्रेमाला कबुल केले नाही. १९९६ साली आलेली फिल्म घातक मीनाक्षीची शेवटची आठवणीतील फिल्म राहिली. या फिल्मच्या दरम्यान मीनाक्षी पहिल्यांदा प्रेमात पडली आणि मीनाक्षी फिल्मी झगमगत्या दुंनियेपासून दूर झाली. तिने फिल्म मध्ये काम करणे सोडले. १९९५ साली मीनाक्षीने अमेरिकेत राहणार्‍या इनवेस्टमेंट बैंकर हरीश मायर यांच्याबरोबर लग्न केले. हे दोघे फिल्म पार्टीत भेटले होते. प्रेम जमले आणि दोघांनी गुपचूप लग्न केले. आज मीनाक्षीला दोन मुले आहेत व ती आपल्या परिवाराबरोबर खुश आहे.आज मीनाक्षी अमेरिकेत एक डान्सिंग स्कूल चालवत आहे व आपले स्वप्न पूर्ण करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.