आपल्या जीवनात सतत अशा काही घटना घडत असतात, तर काही घटना अशाही होतात, ज्या आपल्याला अत्यंत त्रासदायक होतात. तर आपल्याला सांगतो, की काही वेळा आपल्या जीवनात ज्या घटना घडतात त्या निवारण करण्यामागे माणसे लागतात. या पृथ्वीवर प्रत्येक माणसाच्या जीवनात सुख आणि दु:ख येत जात असतात आणि ही एक सामान्य गोष्ट आहे, ज्याच्यामुळे माणूस संघर्ष करण्यास शिकतो. सुख आणि दु;ख याचे स्वत:चे असे काही अस्तित्व नसते. याला काही सुनिश्चित, ठोस ,सर्वसामान्य असा आधारही नसतो. सुख-दु:ख माणसाच्या अनुभवाचा परिणाम असतो. सुख-दु:खाचा संबंध मनुष्याच्या भावनिक स्थितीवर असतो. जसा माणसाच्या भावनांचा उद्रेक असतो, त्याप्रमाणात त्याला सुख-दु:खाचा अनुभव येत असतो.
सर्वांची इछा असते की, महालक्ष्मीचे शुभ आगमन त्यांच्या घरात व्हावे. यासाठी मनुष्य अनेक पद्धतीचे उपायही करतात परंतु, या सर्वांशिवाय काही संकेतांचे वर्णन केले गेले आहे, ज्यामुळे आपल्याला नक्कीच माहिती होते की, आपल्या घरी माता लक्ष्मी प्रवेश करणार आहे किंवा नाही, आणि आपला शुभकाळ सुरू होणार आहे. आजकालच्या डिजिटल युगात लोक घरात आणि खिशात रोख रक्कम ठेवण्याऐवजी डेबिट आणि क्रेडिट कार्ड ठेवतात, त्यामुळे अशा घरी धनाच्या स्वरुपात लक्ष्मीचा प्रवेश होऊ शकत नाही. हो, आपल्याला माहीत आहे का, आपल्या जीवनात जर सुख म्हणजेच चांगल्या वेळेची सुरुवात होणार आहे, तर अशावेळी त्याचे काही संकेत मिळत असतात. आज आम्ही आपल्याला त्या तीन संकेतांच्याबाबत सांगणार आहोत, ज्यामुळे समजून घ्या, की तुमचा शुभकाळ सुरू होणार आहे. तर चला जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत:
सर्वात पहिले तुम्हाला सांगायचे आहे की, जर तुमच्या कोणाच्या घरात चिमणीचे घरटे असेल, आणि त्या घरट्यात चिमणीने पिल्लांना जन्म दिला असेल, तर समजून जा, की हा खूपच चांगला शुभशकून आहे. एवढेच नाही, तर हा या गोष्टीचा संकेत आहे, की तुम्हाला चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. खरे तर, चिमणीचे घरटे घरात असण्याने घरात आनंद निर्माण होतो. याशिवाय, जर तुम्हाला कोणत्याही दिवशी सकाळी सकाळी मांजरीची अनेक पिल्ले एकाच वेळी दिसली, तर समजून जा की, हा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे आणि तुमच्या घरात आनंद येण्याचे संकेत आहेत. असे झाले तर, तुमच्या घरात समृद्धिची वाढ होणार आहे. तुम्हाला हे सांगणे जरूरी आहे, की जर तुमच्या घरात कधीतरी मुंग्यांची रांग दिसली तर समजून जा, हा पण तुमच्यासाठी एक शुभसंकेत आहे. आपल्याला येणार्या काळात धनवृद्धी व ऐश्वर्य प्राप्त होणार आहे.
घरातील नारळ आपोआप तडकने :घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असले आणि त्याला आपोआप तडा गेल्यास असे समजावे की घरातील नाकरात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही. घराजवळ आपोआप तुळस उगवणे : तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर हा शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे. आपोआप दुर्वा उगवणे : आपण ज्या दुर्वा श्री गणेशांना अर्पण करतो त्या दुर्वा जर आपल्या बागेमध्ये उगवल्यास समजावे की आता घरामध्ये कोणत्याही कामात अडथळा येणार नाही.
प्रवास करताना दिसणारे शुभ संकेत : प्रवास करताना देखील काही शुभ संकेत असतात पण ते आपल्या लक्षात येत नाहीत कधी जर प्रवासाला निघालात आणि उजव्या बाजूने माकड, कुत्रा किंवा साप दिसला तर तो आर्थिक फायदा होण्याचा संकेत मनाला जातो. स्वप्नात हिरवा निसर्ग दिसणे : हिरवा निसर्ग डोळे भरून पाहायला कोणालाही आवडेल, पण हाच निसर्ग जर स्वप्नात दिसला म्हणजे स्वप्नात एखादे नैसर्गिक चित्र दिसले तरी देखील ते शुभ मानले जाते. त्यातूनही हा हिरवेगार पणा जर पाण्याच्या ठिकाणी दिसला तर ते त्याहूनही चांगले मानले जाते.
मित्रांनो तर हे आहेत काही शुभ संकेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.