विवाहित महिलांनी कधीही घालू नयेत या 3 वस्तू, भोगावे लागतात वाईट परिणाम….

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वास्तु शास्त्राचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच मनुष्य जेव्हा शुभकार्य करतो, ते तो वास्तु शास्त्रानुसार करतो. हो, खरंच. जसे शुभकार्य करण्याआधी योग्य वेळ आणि योग्य दिवस हे जाणून घेतल्यानंतरच ते काम केले जाते. थोडक्यात सांगायचे तर आपल्या भारत देशात कुठलेच शुभकार्य वास्तु शास्त्राशिवाय पूर्ण होत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो की जर कुठलेही काम वास्तु शास्त्रानुसार केले तर भविष्यात त्या कार्यसंदर्भात कुठलीच समस्या येत नाही.
सुवासिनींच्या बाबतीत वास्तुशास्त्रात बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, सुवासिनींनी त्याचा विचार केला पाहिजे. पण आजच्या काळात खूप कमी लोकं या गोष्टींवर विश्वास ठेवतात. जिथे एकीकडे मुली प्रत्येक गोष्टीत खूप पुढे निघून गेल्या आहेत, तिथे सुवासिनी पण आजकालच्या फैशनप्रमाणे पेहराव करतात. आजच्या काळात सुवासिनी अशा गोष्टी घालतात की त्यामुळे त्यांच्यात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. सोप्या भाषेत सांगायचे तर सुवासिनींनी फैशन जरुर करावी पण आपल्या संस्कृती आणि वास्तुशास्त्राचे भान ठेवून.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की बरेचदा सुवासिनी अशा गोष्टीही घालतात की ज्यामुळे त्यांचे नाते तुटू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या सुवासिनींनी चुकूनही घालू नये. ही माहिती लक्षपूर्वक वाचा, भविष्यात ही तुम्हाला उपयोगी ठरेल. चला तर मग! याबाबत विस्ताराने जाणून घेऊ या.

काळ्या रंगाच्या बांगड्यां: सुवासिनींनी चुकूनही टाळल्या रंगाच्या बांगड्या घालू नये. कारण असे केल्याने तुमच्यावर शनी देवाचा कोप होऊ शकतो. तुमचे वैवाहिक जीवनही खराब होऊ शकते. घरातही नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो. एवढेच नाही तर तुमच्या मुलांवर देखील संकटं येऊ शकतात. म्हणून चुकूनही काळ्या बांगड्या घालू नये.

पायामध्ये सोन्याचे तत्व : आजकाल खूप बायका आपल्या पायात सोन्याचे पैंजण आणि जोडवी घालतात. खरं सांगायचं तर सुवासिनींसाठी हे अशुभ मानले जाते. याचं कारण म्हणजे पायात सोनं घातल्याने देव कुबेर नाराज होतात. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात गरीबी येऊ शकते. यामुळे तुमच्या नवऱ्याची प्रगती होणे थांबते आणि आर्थिक संकटही येऊ शकते. म्हणून सुवासिनींनी पायात नेहमीच चांदीचे तत्व घातले पाहिजे.

पांढऱ्या रंगाची साडी: सुवासिनींनी चुकूनही फक्त पांढरी साडी घालू नये. मात्र आजकाल बायकांना पांढऱ्या साड्या निःसंकोचपणे घालतात. यामुळे त्यांच्या जीवनात अनेक संकट येतात. नीट ऐका, पांढरी साडी घातल्याने सुवासिनींचा पतिव्रता धर्म नष्ट होतो. यामुळे आपल्या दांपत्य जीवनात नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो. इतकंच नाही तर तुमच्या नवऱ्याच्या आयुष्यावर संकट येऊ शकते. म्हणून सुवासिनींनी चुकूनही फक्त पांढऱ्या रंगाची साडी परिधान करुन नये. जर तुम्हाला पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे असतील तर अशी वस्त्रे परिधान करा ज्यात आणखी काही रंग असावेत, पूर्णपणे पांढरा रंगाचा कपडा कधीही घालू नका.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published.