घराचे किचन हे समृद्धीचे प्रतीक आहे. कारण इथूनच सगळ्याचे मन व आत्मा तृप्त होण्याचे कार्य चालते, वास्तुशास्त्रनुसार किचन मधील सर्व वस्तू योग्य प्रमाणात भरलेल्या असणे खूप आवश्यक आहे. आपल्या घरात नेहमी भरभराट राहावी, घर नेहमी भरलेले रहावे, यासाठी आपल्या किचनमधील काही वस्तू कधीच संपू देऊ नये, त्या थोड्याश्या शिल्लक आहे,त्यापूर्वीच या वस्तू घरात आणून ठेवाव्यात. तर त्या वस्तू कोणकोणत्या आहे, हे मी तुम्हाला आज सांगणार, चला तर पाहूयात त्या वस्तू ज्यांना घरात संपू देऊ नये, घरात नेहमी त्या भरलेल्याच असाव्यात.
त्यातील सर्वात पहिली वस्तू म्हणजे मीठ, घरातले मीठ कधीही संपू देऊ नये, व कोणी शेजारीपाजारी मीठ मागितल्यास ही मीठ देऊ नये, घरातील मीठ संपले तर घरावर करणी तंत्र-मंत्र होऊ शकतात. आणि जर शेजारीपाजारी मीठ दिले तर एखादी वाईट बातमी कानावर पडू शकते, तसेच मीठ कोणाच्या तळहातावर मीठ ठेवू नये, घरात जर भाजीत मीठ कमी असेल, आणि कोणी मीठ मागितले तर कधीही प्रत्यक्ष हातात देऊ नये, हातावर मीठ दिल्यास किंवा घेतलास वाईट बातमी ऐकायला मिळू शकते . त्याशिवाय असेही म्हटले जाते कि जर घरातील मीठ संपले अचानक कोणी पाहुणे आले तर वेळ प्रसंगी त्यांना काय द्याल, घरात जर मीठ असेल तर आपण पटकन काहीही बनवून त्यांना देऊ शकतो, असे ग्रामीण भागात सांगितले जाते.
दुसरी वस्तू म्हणजे हळद, घरातील कोणत्याही शुभकार्यात सर्वप्रथम हळदीचा वापर केला जातो. लग्नातही आधी हळद लावली जाते, देवा नाही आधी हळद मग कुंकू लावले जाते, म्हणजेच हळदीचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे, हे आपल्या लक्षात आलेच असेल. किचन मधील जर हळद संपली तर याचा अर्थ असा होतो, तर तुम्हाला आता कोणतीही चांगली बातमी ऐकायला मिळणार नाही. कारण हळद म्हणजे शुभ जर तुम्हाला वाटत असेल शुभ बातम्या आपल्याला नेहमी ऐकायला मिळाव्यात, तर डब्यातील हळद शिल्लक असेल तेव्हाच हळदीचे दुसरे पाकीट घरात आणून ठेवावे.
तिसरी वस्तू म्हणजे दुध….. असे म्हणतात की घरातमध्ये दुधाच्या भांड्यामध्ये नेहमी दूध शिल्लक असावे ते मोकळे ठेवू नये, म्हणजे ते घर भरल्या गोकुळासारख्या असते. कितीतरी व्यक्ती घरात पाहुणे आले की, दुध घ्यायला दुकानावर जातात, तर असे जावे लागू नये कारण आपली संस्कृती अशी आहे की, अतिथी देवो भव, अथितीला आपण भगवंताचे रूप मानतो, म्हणून जर घरात पाहुणे आले असतील आणि त्यांना चहा, कॉफी साठी दूध नसेल, तर तो भगवंताचा निरादर समजला जातो. म्हणून भगवंताची प्रसन्नता व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी घरातील दूध कधीही संपू देऊ नये, त्याशिवाय दूध कधीही उघडे ठेवू नये, फ्रीजमध्ये ठेवलेले ही दूध नेहमी झाकून ठेवावे, नाहीतर घरात वास्तुदोष निर्माण होतात, तर मित्रांनो घरातील दूध कधीही संपू देऊ नये दूध संपण्यापूर्वीच घरात दूध एक्सट्रा दूध मांगून ठेवावे.
चौथी वस्तू म्हणजे पीठ घरातील पीठही कधीच संपू देऊ नये, व थोडेसे पीठ शिल्लक असेल त्यापूर्वीच पिठाची सोय करावी, घरातले पीठ संपणे म्हणजे आपल्या अपमानाची सुरुवात होणे होय. यामुळे आपला घरात किंवा समाजात आपल्याला अपमानित होवे लागते, तसेच गहू संपल्यास मानसिक ताण तणावाचा सामना करावा लागतो. आणि पाचवी वस्तू म्हणजे तांदूळ घरातील तांदूळही कधीच संपूर्ण संपू देऊ नये, ऐक वाटी तांदूळ शिल्लक असताना, लगेच तांदुळाचे पॅकेट, केव्हा गृनी आणून ठेवावी, घरातील तांदूळ ऐकही दाना शिल्लक न राहणे याचा अर्थ असा होतो. कि घरातील सुख संपदा निघून जाणे होय, घरात जर सुख व समाधान हवे असेल तर घरातील तांदळाचा डब्बा नेहमी भारलेलाच असावा, तर मित्रांनो या पाच वस्तू आहे, यांना आपल्या घरातून कधीच संपूर्ण संपू देऊ नये, त्यापूर्वीच त्यांचा प्रबंध करावा.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.