साडी नेसल्यावर मुलींचे सौन्दर्य दुप्पटीने का खुलते ? गुपित जाणल्यावर दंगच व्हाल….

मित्रांनो, जसे तुम्हा सर्वांना माहीतच आहे, की साडी आपल्या भारतातील सगळ्यात जास्त मान्यताप्राप्त वस्त्र आहे. या साडीचा उपयोग महिला मागील काही वर्षांपासुन करीत आल्या आहेत. साडी हे एक असे वस्त्र आहे, जे फक्त भारतातच नाही, तर पूर्ण जगाला माहीत आहे. परंतु, साडी सगळ्यात जास्त भारतातच नेसली जाते. जर तुम्ही बारकाईने लक्षात घेतले असेल, तर साडी नेसल्यावर कोणत्याही मुलीची किंवा महिलेचे सौन्दर्य दुपटीने खुलते. जर एखादी मुलगी दिसायला अगदी सर्वसामान्य असेल, तर ती सुध्हा साडी नेसल्यावर खुपच आकर्षक दिसायला लागते. या गोष्टीचा आपण स्वत: अनुभव घेऊ शकता. तुम्ही कोणतीही सर्वसामान्य दिसणारी मुलगी घ्या, व तिला साडी नेसवुन तयार करा, मग बघा, तिचे सौन्दर्य कसे निखरून येते ते आणि ती किती सुंदर दिसते ते.

नेहमीच, जेव्हा मुलीचे लग्न ठरवत असतात, तेव्हा सुध्हा मुलाला मुलीचा साडीतला फोटो पाठवला जातो. यामागे सुध्हा हाच उद्देश असतो. कितीतरी वेळा, आपण ऐकले असेल, मुली लग्नानंतर खुपच सुंदर दिसायला लागतात. यातसुध्हा जास्त प्रमाणात साडीच कारणीभुत आहे. कारण, जास्त करून, लग्नानंतर मुली साडी नेसणे पसंत करतात. मुलगी, काळी, गोरी, जाडी, बारीक, उंच किंवा बुटकी जेव्हा ती साडी नेसते, तेव्हा तिच्या आकर्षक दिसण्यात भर पडते. फक्त, तुम्हाला साडी नेसण्याची व्यवस्थित पद्धत माहीत असली पाहिजे. तुम्ही साडी नेसून ती कशी सावरता व कशा वावरता, हे पण खुपच महत्वाचे आहे. आता हे तर आपल्याला माहीत झाले आहे, की मुली साडी नेसल्यावर खुपच सुंदर व आकर्षक दिसतात. पण तुम्ही कधीही या मागचे कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? मग चला, आज आम्ही याचे खरे कारण सांगतो ….

यामुळे साडी नेसल्यावर मुली खूप सुंदर दिसतात:

जेव्हा कोणी मुलगी किंवा महिला, साडी नेसते तेव्हा तिच्या शरीराच्या अवयवांचा आकार जास्त प्रमाणबद्ध दिसतो. त्यामुळे तिच्या आकर्षणात भर पडते. या शिवाय साडी नेसल्यावर मुली शालीन व सोज्वळ दिसतात. त्या थोड्या प्रगल्भही वाटतात. साडीवर जास्त करून लांब केसांची वेणी किंवा मोकळे केस छान दिसतात. जेव्हा कोणी मुलगी साडी नेसते, तेव्हा ती जरा जास्त शृंगार करते. त्याबरोबरच ती हातात बांगड्या किंवा कंगन घालते. त्याचबरोबर गळ्यात एखादा नेकलेस घालते. या सर्वांमुळे ती परिपुर्ण व आकर्षक दिसते.

म्हणूनच, आपल्याला आपल्या या भारतीय वस्त्र (साडी) परीधानावर गर्व केला पाहिजे. त्याचबरोबर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आपण साडीला कसे नेसतो व सांभाळतो, आपला शृंगार कसा आहे आणि आपली चालण्याची पद्धत यावर आपली सुंदरता व आकर्षकता अवलंबून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.