भारतात क्रिकेट आणि फिल्मस सगळ्यात जास्त चालतात. या दोन्ही क्षेत्रातील लोकांची समाजात खुप चर्चा होते. या दोन्ही क्षेत्रातील लोकांमध्ये असलेले नातेसंबंध खुपच प्रसिद्ध असतात. मग ते प्रेमप्रकरण असुदे किंवा मैत्री असुदे, त्याच्या बातम्या मात्र जरूर बनतात. नेहमीच असे पाहिले गेले आहे, की सिनेमाशी जोडलेले कलाकार किंवा इतर लोक आपल्या आवडीच्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला मैदानात प्रेक्षक म्हणुन जरूर उपस्थित असतात.
क्रिकेट आणि बॉलीवुडच्या अशा कितीतरी जोड्या आहेत, ज्या खुपच प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांची प्रेमप्रकरणे पण गाजली आहेत. कोणाला एकमेकांचे प्रेम मिळाले, पण कोणी असेही अभागी ठरले, ज्यांना त्यांचे प्रेम मिळालेच नाही, आणि ते बॉलीवुड आणि क्रिकेट यांच्या मिलापाला लग्नापर्यंत नाही नेऊ शकले. परंतु, जेव्हा केव्हा क्रिकेट आणि बॉलीवुड या जोड्यांबद्दल बोलले जाते, तेव्हा सगळ्यात पहिले नाव येते ते म्हणजे, मंसूर अली खान पटौदी आणि शर्मिला टैगोर. आत्ता मात्र विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे नाव खुपच चर्चेत आहे. आज आम्ही एका अशा जोडीबद्दल बोलणार आहोत, जे विवाह बंधनापर्यंत नाही पोहोचू शकले, पण चर्चेत मात्र कायम राहिले. ती जोडी आहे, पुर्वीचा तेज गोलंदाज जहीर खान आणि अभिनेत्री ईशा शेरवानी यांची.
बॉलीवुड अभिनेत्री ईशा शेरवानी वर जडला होता जीव जहीर खान यांचा :
आपण सर्वच जाणतो, की आत्ता जहीर खान ने ‘चक दे इंडिया’ गर्ल सागरिका घाटगेशी लग्न केले आहे. पण अशी एक वेळ होती, की जेव्हा जहीरचे हृदय ईशा शेरवानीसाठी धकधक करायचे. ही गोष्ट आहे, २००५ सालची. दोघांची पहिली भेट २००५ या वर्षी तेव्हा झाली होती, जेव्हा जहीर ऑस्ट्रेलियाहून परत येत होते. संघाच्या एका कार्यक्रमात ईशानी डांस केला होता. त्याच वेळेस दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले.
तुम्हाला सांगतो, कि ईशा शेरवानी हीने सुभाष घईची फिल्म ‘किस्ना: द वॉरीयर पोएट’ या सिनेमाद्वारे पदार्पण केले होते. त्यानंतर, ती ‘लक बाय.चान्स’ आणि अजय देवगन बरोबर ‘यू मी और हम” मध्ये दिसली होती. जेव्हा ईशा जहीरबरोबर प्रेमात होती, तेव्हा कितीतरी वेळा स्टेडियममध्ये जहीर खानला प्रोत्साहन देताना पाहिले गेले आहे. ते दोघेही ८ वर्षे लिव इन रिलेशनशिप मध्ये राहिले. २०११ मध्ये एक अशी वेळ आली, जेव्हा त्या दोघांबद्दल जोरदार चर्चा होत होती, की जहीर खान आणि ईशा शेरवानी लग्न करणार आहेत. परंतु, त्याच वेळी दोघांचे ब्रेकअप झाले. दोघेही एकमेकांवर खुप प्रेम करीत होते, परंतु दोघांचे नाते विवाहापर्यंत नाही पोहोचु शकले. आत्तासुद्धा जहीर खान आणि ईशा एकमेकांशी मैत्री टिकवून आहेत.