मित्रांनो, बॉलीवुड एक अशी इंडस्ट्री आहे, ज्याची सुंदरता व झगमगाट सर्वांनाच आवडतो. ही बॉलीवुडची दुनियां बाहेरून खुप ग्लेमरस दिसते. खासकरुन, या बॉलीवुड सिनेमात काम करणारे अभिनेता व अभिनेत्री यांचे सर्वच लोक चाहते असतात. जर आपण बॉलीवुड अभिनेत्रीविषयी बोललो तर, त्यांच्या सुंदर दिसण्यावर सौंदर्यावर तर सगळेच फिदा असतात. जिथे एका बाजूला मुली या अभिनेत्रींसारखे सौदर्य असावे अशी स्वप्न बघतात, तर दुसरीकडे, मुलगे त्यांच्या सौंदर्यावर खुश असतात. परंतु, तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल, की बॉलीवुडमध्ये अभिनेत्री किंवा स्टार बनण्यापूर्वी काही अभिनेत्री अजिबात आकर्षक दिसत नव्हत्या व त्यांच्यातल्या काही तर अगदीच सुमार रूपाच्या होत्या. काही खुप जाड्या होत्या, तर काही काळ्या होत्या, तर काहीकडे व्यक्तिमत्व व रूपं दोन्हीही नव्हते.
परंतु, आपल्या दिसण्याच्या कारणाने या अभिनेत्रिनी हार नाही मानली आणि आपली स्वप्ने पुरी करण्याची धडपड केली. त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले व आज त्यांनी उच्च ध्येय गाठले आहे आणि जेव्हा तुम्ही सफल होता, तेव्हा तुमच्या जीवनात पैसा पण भरपूर येतो. या पैशामुळे एक अगदी सुमार असेलेली व्यक्तिसुद्धा उत्तम व्यक्तिमत्व बनवू शकते. बास, असेच काहीसे घडले या अभिनेत्रीनबरोबर. तर चला जाणून घेऊया, त्यांची विस्तृत माहिती …
दीपिका पादुकोण:
दीपिका बॉलीवुडची सगळ्यात मादक अभिनेत्री मानली जाते. जर दीपिकाला वर्तमानकाळातील सर्वोत्कृष्ट बॉलीवुड अभिनेत्री म्हटले, तर अजिबात अतिशयोक्ति होणार नाही. दीपिका आज सगळ्यात जास्त मानधन घेणार्या अभिनेत्रीनपैकि एक आहे. परंतु, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की, एक वेळ अशीही होती, की दीपिका खूपच सावळ्या रंगाची व जाडी होती. तिचा चेहरा तेव्हा जराही आकर्षक नव्हता, ज्याचे आज चाहते वेडे आहेत. परंतु, दीपिकाला आपले स्वप्न पुर्ण करायचे होते, त्यामुळे तिने तिच्या सतेज चेहर्यासाठी खुप प्रयत्न केले व तिला आज त्याचे फळ मिळाले आहे.
काजोल:
काजोलनी जेव्हा बॉलीवुड मध्ये पाऊल ठेवले, तेव्हा ती कशी दिसत होती, हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. परंतु, काजोलच्या सामान्य चेहर्यानेसुद्धहा तिचे सिनेमे उत्तम चालले आणि ती प्रेक्षकांमध्ये खुपच लोकप्रिय झाली होती. खासकरून, शाहरुख़ खान बरोबरच्या केलेल्या फिल्म्समध्ये लोकांनी या जोडीला खुप पसंत केले. परंतु, गेल्या काही वर्षात, कोजोलच्या दिसण्यात खुप फरक पडला आहे. खासकरून तिचा रंग पाहिल्यापेक्षा खुप उजळला आहे. असे म्हटले जाते, की काजोलने गोरे दिसण्यासाठी काही खास प्रकारची लेजर सर्जरी करून घेतली आहे. परंतु, या गोष्टी अजून स्पष्ट झालेल्या नाहीत. पण आता तिचा चेहरा गोरा व खुप आकर्षक दिसतो यात शंका नाही.
विद्या बालन
विद्या बालन बॉलिवूडमधील एक चर्चित अभिनेत्री आहे. डर्टी पिक्चर चित्रपटात तिचा हॉट अवतार पाहून लोकांनी दाताखाली बोट चावली होती. पण आपणास आश्चर्य वाटेल की चित्रपटात येण्यापूर्वी विद्या बालन एक बहीणजी प्रकारची मुलगी दिसायची. कदाचित तिच्याकडे कोणताही मुलगा आकर्षित झाला नसेल. परंतु जर आपण सध्याच्या स्थितीबद्दल बोललो तर प्रत्येकजण तरूणापासून वृद्धापर्यंत विद्याच्या सौंदर्यावर मरतो.