पायाला भेगा पडणे, टाचा उलणे यावर घरगुती रामबाण उपाय रात्रीत मिळेल आराम….

भेगाळलेल्या रखरखीत टाचा मऊ करण्यासाठीचा एक घरगुती उपाय, पुरुषांच्या तुलनेत महिलांना टाचा उकलण्याची समस्या जास्त प्रमाणात बघायला मिळते. याशिवाय ग्रामीण भागात, आणि ज्या व्यक्तीच्या मातीशी थेट संपर्क येतो अशा व्यक्तींच्या टाचा रखरखीत होऊन भेगा पडू लागतात. पाय कोरडे पडून रखरखीत व्हायला सुरुवात झाल्यावर आपण पायांची टाचांची पाहिजे तेवढी काळजी घेत नाही. जेव्हा टाचांना भेगा पडू लागतात, टाचा वेदना करू लागतात, त्यावेळी आपल्याला या वेदना नसाव्यात वाटतात. तुम्हाला या उकललेल्या टाचांच्या वेदनांकडून सुटका करून घ्यायची असेल तर असा हा उपाय करा, काही दिवसातच तुमचे पाय मुलायम दिसू लागतील. चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा. ]

भेगाळलेल्या टाचा मऊ करण्यासाठी आजचा उपाय बनवण्यासाठी, आपण सर्वप्रथम घेणार आहोत हे व्हॅसलिन…. आपण एक चमचा या प्रमाणात मध्ये घ्यायचा, रखरखीत भेगाळलेली त्वचा मुलायम करण्यासाठी, हे व्हॅसलीन पेट्रोलियम जेली उपयुक्त आहे. तुम्ही तुमच्याकडील कोणतीही पेट्रोलियम जेली वापरू शकता, यानंतरचा दुसरा घटक म्हणजे, खोबरे तेल…. खोबरेल तेलाची मालिश त्वचेला मॉईशचराईज करून त्वचेचे पोषण करते. आपण येथे एक चमचा एवढे खोबरे तेल वापरायचे आहे. यानंतरचा शेवटचा आणि महत्त्वाचा तिसरा घटक म्हणजे लिंबू, लिंबाचा साधारण एक चमचा एवढा रस पण घ्यायचा आहे. आता हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे.

लिंबाच्या रसाने त्वचेवरील डे स्क्रीन सेल्स निघून जातात. यामध्ये व्हिटॅमिन सी, हीलिंग प्रॉपर्टीझ पायाच्या भेगा कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. खोबरेल तेल घेताना ते सुगंध विरहित, आणि शुद्ध असलेलेच वापरायचे आहे. हे तिन्ही घटक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपला हा उपाय तयार झाला. ही क्रिया तुम्ही एका आठवड्यासाठी देखील बनवून स्टोअर करून ठेवू शकता. जेणेकरून याचा नियमित वापर करणे शक्य होईल. या साठी या प्रमाणात सामग्री वाढून ही क्रीम बनवून ठेवावी. दुसऱ्या आठवण्यासाठी पुन्हा नवीन क्रीम बनवायची आहे.

दररोज रात्री झोपण्यापूर्वी ही क्रीम टाचांना आणि संपूर्ण पायाला चोळावी, आणि  ५ ते १० मिनिटे मालिश करावी व यानंतर सॉक्स घालून पाय झाकून घ्यावे. जर तुम्ही सलग दोन आठवडे तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या पायांच्या टाचा पूर्णपणे बऱ्या झालेल्या तुम्हाला दिसतील. पायांना भेगा पुन्हा होऊच नये. म्हणून नियमितपणे तळपायाची खोबरेल तेलाने मालिश करावी, आणि कोणतेही काम करताना जिथे पाण्याचा संपर्क येणार नाही, अशा वेळी पायामध्ये सॉक्स आठवणीने घालावे.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.