खास महिलांसाठी, तुमच्यावर जर का असा प्रसंग आला तर काय कराल ?

ती वीसीतलीच असेल दिसायला चारचौघात उठून दिसेल अशी, तिथे बराच वेळ वाट बघत उभी होती. तिला लांब जायचं होतं पण वाहनच मिळत नव्हतं, पावसाचे पण लक्षण दिसत होते, एखादी दुसरी सर येऊन गेली होती, आणि आपलं कामही चोख बजावलं होतं त्या सरीने, तिला भिजवण्याचं, कशीबशी तिथे आलेली ती रिक्षा तो रिक्षावाला तयार झाला यायला. तिने जायचं ठिकाण सांगितल्यावर मात्र खुळखुळ करायला लागला. खूप लांब जायचं होतं तिला शेवटी प्रतीच्या भाड्याची बोली ठरली आणि एकदाच तो तयार झाला पण जाण्यापूर्वी एक फोन करतो म्हणाला आणि फोन झाल्यावर लगेच निघाला.

ती दिसायला सुंदर तरुण वेळ संध्याकाळची अंधार दाटत चाललेला त्यात पावसाची हजेरी थोडी भिजलेली होती. ती पांढरे कपडे तिच्या अंगाला चिकटले होते आणि शरीराची सौंटपूर्ण वळण अधिकच उठून दिसत होती. रिक्षावाला तिच्याकडे अधून-मधून पहात होता त्याची नजर टोचत होती. ती पण  काय करणार घरी तर जायचे होतं उशीर होत होता, किती वेळ वाहनाची वाट बघत थांबणार जे होईल ते होऊ दे बघू देव आहे, पाठीराखा सांभाळीन ती असा विचार करून बसली होती, तिच्याकडे रिक्षावाला अधून-मधून बघत होता, ती लगेच नजर वळुन घ्यायची. आता रिक्षा सुसाट निघाली होती मुख्य रस्त्याला संपून आड्या रस्त्याला लागली होती. आता रिक्षा पुढच्या वळणावर थांबली एक माणूस थांबला होता तिथे रिक्षावाला बोलला मॅडम मित्रच आहे माझा, त्यालाही तुमच्या पुढच्या गावाला जायचे आहे, आता अशा वेळी त्याला गाडी मिळणार नाही येउदे त्याला बसेल तो इथे माझ्याजवळ, तो रिक्षात बसला ड्रायव्हर च्या बाजूला, आता एकाचे दोघे झाले होते.

त्यांची नजर देखील कळतं होती नंतर आलेल्या रिक्षावाल्यांचा तो मित्र खूपच पिऊन आला होता, तू तर नुसता वाईट नजरेने बघत होता आता पुढे काय घडेल या भीतीने तिचा उर धपापत होता, आता त्या दोघांच्या वागण्याची झिटाळी आली होती . तिच्याकडे पाहतच अचकट, विचकट, बोलत होते. पण त्यांच्याकडे ती ढुंकूनही पाहत नव्हती त्यांचे बोलणे आपल्याला समजतच नाही, असं दाखवत होती तरी मनातून ढासावलीस होती.

तिचं गाव लांबच होत पण पुढच्या वळणातून आत मध्ये गेलो तर लवकरच पोहोचू शकणार होती ती घरी, पण जाताना रस्ता अधिक सुनसान होता मशानातून जात होता तो रस्ता, तिने त्यास रस्त्यातून रिक्षा नेण्यास सांगितल्यावर या दोघांच्या चालीरीतीने पल्लवी हेसावली होती. आता रस्ता अधिकच अंधारा आणि सुनसान होता, मशान जवळ होता आणि थोडा पुढे गेल्यावर रिक्षा मशानाजवळून जाणार होती. मशान जवळ आला आणि थांबा ती बोलली, ओ मॅडम येथे कुठे थांबते मशान आहे ना, तुमचं गाव अजून पुढे आहे ना, नाही… मला इथेच उतरायचे आहे, इथेच आहे माझे घर…. ते बघा समोर… एका कबरीकडे बोट दाखवत ती म्हणाली, चल येतोस माझ्या घरी चाय प्यायला आणि ती हसली… ओ मॅडम आता त्याची बोबडी वळली, दुसऱ्यांची नशा खाड्कन उतरली. काहीतरीच काय बोलताय आणि ती जेमतेम रिक्षातून उतरते पैसे द्यायला पर्समध्ये हात घालते. तोच त्याने रिक्षा सोसाट पळवली.  रिक्षेवाला पैसे घ्यायला देखील थांबला नाही. ही वळली आणि स्मशानाच्या वाटेवरून जाऊ लागली पायवाट संपल्यावर तीच गाव येणार होतं आणि घर देखील.

लेखक :  विवेक माधव

मित्रांनो लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि तुम्हाला लेख कसा वाटला ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा..फोटो प्रतिकात्मक आहे…. 

Leave a Reply

Your email address will not be published.