तुमच्या तंदुरुस्तीचा खजाना – जाणून घ्या मखाना खाण्याचे फायदे

मखाना, ज्याला इंग्लिशमध्ये फॉक्स-नटच्या नावाने ओळखले जाते. हे खूपच पौष्टिक असतात, ज्याचे आपल्या शरीराला खुप फायदे होतात. नेहमी नवरात्रिच्या दिवसात महिला मखान्यांना जास्त पसंती देतात. बाजारात मिळणार्‍या इतर ड्राई-फ्रूट्स जसे बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू आणि किशमिश यांच्या फायद्याबद्दल आपण खुप काही ऐकले असेल, परंतु, पौष्टिक तत्व असलेले ‘मखाने’ पण इतर ड्राई-फ्रूट्सपेक्षा जराही कमी नाहीयेत.

तुम्हाला माहीत असेल की, मखानेचा उपयोग खाण्याव्यतिरिक्त पूजेत पण केला जातो. भारतात प्राचीन काळापासून व्रत व धार्मिक उत्सवात यांचा उपयोग केला गेला आहे. जर यात असेलेले पोषक घटकांबद्दल बोलायचे झाले, तर त्यामध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, कैल्शियम, फाइबर, मैग्नीशियम, पोटेशियम, फास्फोरस, आयरन व झिंक जास्त प्रमाणात आढळले आहे. या सर्व पोषक घटकांची आपल्या शरीराला खूपच आवश्यकता असते. म्हणूनच या सर्वांची पुर्तता करण्यासाठी आपण रोज एक मुठ मखाना जरूर खा.

आज आम्ही तुम्हाला मखाना खाण्यामुळे होणारे फायदे विस्ताराने सांगणार आहोत. या सर्व फायद्यानबद्दल जाणून तुम्ही पण तुमच्या आहारात मखाने जरूर समाविष्ट कराल. तुम्ही मखान्याची खीर व भाजी अगदी सहजपणे बनवू शकता. तर चला जाणून घेऊया मखाना खाण्याचे फायदे..

सांधेदुखीपासून मुक्ती: तुम्ही जाणता की, आपल्या हाडांसाठी कैल्शियम खूपच जरूरी असते. कैल्शियमयुक्त मखाने खाल्याने तुम्हाला सांधेदुखी पासून आराम मिळेल. जर तुम्ही सांधेदुखी व छोट्या गाठी या रोगापासुन हैराण असाल, तर काही दिवस मखाने खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. २. रक्तदाबावर नियंत्रित करते: आजकाल खुप लोक उच्च रक्तदाबाच्या त्रासाने पीडित असतात आणि या रोगापासुन सुटका व्हावी असे त्यांना वाटत असते. जर तुम्ही पण त्यांच्यापैकी एक असाल, तर आजच मखाने खायला सुरुवात करा. कारण यामध्ये सोडियमचे प्रमाण खूपच कमी असते आणि पोटेशियम भरपूर प्रमाणात आढळले आहे. ज्यामुळे उच्च रक्तदाबापासुन आपल्याला आराम मिळतो. ते शरीराच्या रक्तदाबाची पातळी नियंत्रित करते.

३ ताणतणाव कमी करण्यास मदत : मानसिक तणाव दूर करण्यासाठी आपण मखाने खाऊ शकता. ते ताणतणाव आणि अनिद्रा ह्या दोन समस्याना दूर करणारे अन्न आहे. हे आपण रात्री झोपायच्या आधी दुधाबरोबर खाऊ शकतो. याच्या सेवनाने आपणास चांगली झोप येईल. मखाना आपल्या झोपेसंबंधीच्या सर्व समस्या दूर करेल. ४. किडनीला मजबूत बनवतो: यात गोडपणा बर्‍याच प्रमाणात कमी असल्यामुळे तो स्प्लीनला डिटॉक्‍सीफाइड करतो.

किडनीला मजबुत बनवण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी मखाण्याचे नियमित सेवन करणे फायदेशीर आहे. फुल मखान्यामध्ये एस्‍ट्रीजन गुण पण असतात, ज्यामुळे बद्धकोष्ट यापासून आराम पडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *