विवाहित स्त्रियांनी कोणत्याही परिस्थितीत या पाच गोष्टीची चर्चा कोणाबरोबर ही करू नये….

नेहमी काही स्त्रिया लग्नानंतर आपल्या सौभाग्याच्या गोष्टी दुसर्‍या विवाहित स्त्रीबरोबर बोलतात. नेहमीच्या जीवनात आपल्या काही गोष्टी दुसर्‍यांबरोबर बोलतात, चर्चा करतात, ती खुप चांगली गोष्ट आहे, यात काही शंकाच नाही. परंतु, जेव्हा विषय निघतो, सौभाग्याशी निगडीत काही गोष्टीचा, ते मात्र कोणाबरोबर बोलणे चुकीचे आहे. जर तुम्ही सुद्धा असे करीत असाल, तर तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. म्हणुन आजपासूनच सावध व्हा. जर तुम्हाला माहीत नसतील या कोणत्या गोष्टी आहेत, ज्या दुसर्‍या विवाहित स्त्रीला सांगायच्या नाहीत, तिला वापरायला द्यायच्या नाहीत, तर काळजी करू नका. या लेखात आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊया त्याबद्दल अधिक माहिती…..

भांगातले कुंकू: हिंदु धर्मात विवाहित स्त्रियासाठी कुंकवाचे खुप महत्व आहे. कुंकू हे सौभाग्याची पहिली खुण आहे. पण काही वेळेस माहीत नसल्यामुळे, स्त्रिया दुसर्‍या विवाहित स्त्रीला आपल्या कुंकवाच्या कुयरीतले आपले कुंकू वापरायला देतात, असे करणे अनुचित आहे. कोणत्याही स्त्रीने आपले कुंकू दुसर्‍या स्त्रीला देऊ नये. असे केल्याने आपल्या सौभाग्यवर संकट येण्याची शक्यता असते. हं, जर तुम्हाला द्यायचेच असेल तर बाजारातुन नवी कुंकवाची डबी खरेदी करून देऊ शकता.

हातावरची मेंदी :आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया हातावर मेंदी लावतात. असे म्हणतात, मेंदी जितकी गडद रंगेल, तेवढेच जास्त पतीचे प्रेम तुमच्यावर असते. त्याशिवाय, ती किती दिवस तुमच्या हातावर टिकुन राहाते, त्याने सुद्धहा तुमच्यातल्या गहिर्‍या प्रेमाची साक्ष मिळते. पण जर तुम्ही दुसर्‍या स्त्रीला आपण आपल्यासाठी आणलेली मेंदी विभागुन दिलीत, तर तुमच्या पतीच्या प्रेमाचे पण असेच विभाजन होईल, म्हणुन अशी चुक कधीच करू नका.

लग्नासाठी खास खरेदी केलेले कपडे: आपल्या लग्नाच्या दिवशी परिधान केलेली ओढणी व लग्नासाठी खास खरेदी केलेले कपडे स्त्रियांसाठी सगळ्यात मौल्यवान असतात. ते पण आपण कोणाला वापरायला किंवा परिधान करायला देऊ नये, असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो व तुमचे सौभाग्य विभागले जाऊ शकते. बांगड्या कोणाला वापरायला देऊ नका: स्त्रियांना कपड्यांबरोबर मिळत्या जुळत्या रंगाच्या बांगड्या घालण्याची खुप हौस असते. कितीतरी वेळा बांगड्यांच्या हव्यासामुळे त्या एकमेकींच्या बांगड्या वापरतात. पण असे करणे खुपच अशुभ मानले जाते. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात कडवटपणा येऊ शकतो.

कपाळावरची टिकली किंवा बिंदी: कपाळावर लावलेली टिकली किंवा बिंदी सौभाग्याच्या सोळा शृंगारापैकी एक आहे. सौभाग्याची खुणेमध्ये टिकलीला खुप महत्वाचे स्थान आहे. कपाळावर चंद्राप्रमाणे चमकणारी टिकली किंवा बिंदी सौभाग्यवतीच्या सौंदर्याची शोभा वाढवते. पण चुकून सुद्धा आपली टिकली किंवा बिंदी दुसर्‍या स्त्रीला वापरायला देऊ नका.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *