तुळशी जवळ कधीही ठेऊ नका या 5 वस्तू घरात येईल गरीबी आणि माता लक्ष्मी….

मित्रांनो प्रत्येक हिंदू धर्मियांच्या घरासमोर किंवा घरामध्ये तुळशीचे रोपटे असायलाच हवे. कारण तुळशीमुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, व ती ऊर्जा आपले भाग्य, आपले नशीब बनवते, आपल्या घरावर जे काही संकटे येणार असतात ती सर्व संकटे तुळस स्वतःवरती घेते. मित्रांनो तुळशीचे खूप मोठ महत्व आहे. ज्योतिशास्त्र असुदया, वास्तुशात्र, असुदया, किंवा भारतीय पुराण असूदया प्रत्येकामध्ये तुळशीचे वर्णन आले आहे. आपल्या घरामध्ये पैसा खेळता राहण्यासाठी, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर असणे खूप आवश्यक असते. आणि माता लक्ष्मीला घरामध्ये स्थिर करण्याचे काम हे तुळस करत असते.

मात्र अश्या या तुळशी च्या रोपट्याजवळ किंवा मात्र तुळशीच्या वृंदावनाजवळ या वस्तू चुकूनही ठेऊ नका, किंवा तुळशीच्या बाबतीत या चुका होण्यापासून टाळा. आणि ज्या ठिकाणी या चुका होतात त्या ठिकाणी माता तुळशी वास करत नाही आणि परिणामी अश्या घरातुन माता लक्ष्मी सुद्धा निघून जाते. आणि मग त्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होते, गरिबीभी निर्माण होते, त्या घरातील व्यक्तींचे जे भाग्य आहे, नशीब आहे, ते त्याना साथ देईनास होते. तर चला त्या गोष्टीविषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

पहली गोष्ट शिवलिंग…. बऱ्याच ठिकाणी आपण असे पाहतो की तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंग ठेवलेल असते. बऱ्याच जणांना असे वाटते की शिवलिंग ठेवल्याने त्यांना फायदा होईल घरासाठी ते खूप शुभकारक ठरेलं, मात्र लक्षात ठेवा कधीही चुकून देखील कोणत्याही तुळशीमध्ये शिवलिंग ठेवू नका, तुम्ही जे पाहिलेलं आणि ऐकले आहे ते शिवलिंग नाही तो शालिग्रॅम आहे. मित्रांनो तुळशीमध्ये आपण शिवलिंगाची स्थापना बंद करा, शालीग्राम आणि शिवलिंग हे दिसायला अगदी सारखे असतात मात्र मित्रांनो शालिग्राम हे भगवान विष्णूच रूप आहे तर शिवलिंग हे महेश म्हणजे शिवशंभू महादेवाचं रूप आहे आणि आपल्याला माहित असेल तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते, भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी शालिग्राम स्थापना करा. त्याने आपल्याला खूप सारे फायदे होतील मात्र शिवलिंग ठेऊ नका, त्याचे खूप नकारात्मक परिणाम आपल्या घरावरती निर्माण होतात, आपल्या नशिबामध्ये दुर्भाग्य निर्माण होतो. मित्रांनो दुसरी गोष्ट गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो हा तुळशीच्या जवळ लावू नका.

बऱ्याच जणांचे असं होते की चौकट असते म्हणून ऐखादा गणपतीचा फोटो लावलेला असतो, आणि मग अगदी जवळ त्या ठिकाणी तुळशीचं रोपटं लावल असत, तर तुम्हाला सांगू इच्छितो की अशाप्रकारची चूक तुम्ही चुकूनही करू नका, कारण गणपती म्हणजे गणपती बाप्पांनी तुळशी मातेला श्राप दिला होता कि, ‘तू माझ्या जवळ कधीही येऊ शकणार नाही’ मित्रांनो ती कथा अत्यन्त मोठी आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगत बसणार नाही मात्र लक्षात ठेवा कि गणपती मध्ये आणि माता तुळशीमध्ये कमीत कमी दोन हातांच अंतर नक्की ठेवा.

मित्रांनो तिसरी गोष्ट… आपण बरेचदा असे करतो की, आपल्या घरातील जो कचरा असतो तो कचर गोळा करून त्या दाराजवळ आणून ठेवतो. किंवा बरेचदा असे होते कि, आपल्या अंगणामध्ये जे तुळशी वृंदावन असते ते आपल्या दरवाजाच्या समोर असते आणि मग सगळा कचरा गोळा करून आपण त्या वृंदावणाजवळ तुळशीजवळ नेऊन साठवतो आणि नंतर तो गोळा करून टाकला जातो, तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुळशी वृंदावणाजवळ कधीही कचरा साठवू नका ही ऐक अत्यंत चुकीची गोष्ट आहे. किंवा तुळशीजवळ कचरा पडू देऊ नका, तुळशीजवळ जितकी स्वच्छता आपल्याला राखता येईल तितकी राखा, आपण जितके साकविकता राहू तितका जास्त फायदा आपल्याला होईल. आणि जर तुळशिजवळ कचरा साठल्याने तिथे एक प्रकारची नाकरात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मग माता तुळशी असो किंवा अन्य कोणतेही देवता असो त्यांना अस्वछता अजिबात आवडत नाही आणि म्हणून अशा ठिकाणी माता तुळशी जास्त वेळ राहतं नाही.

तुम्ही पाहिले असेल की काही घरामध्ये तुळशीचे रोपटे सोखु लागते जरी तुम्ही त्याची खूप काळजी घेत असला तरी देखील हे रोपटे सोखू लागते, आणि यामागचे कारण हेच आहे कि, अशा तुळशीच्या रोपट्यामधून माता तुळशी निघून जाते आणि मग ते रोपटं सुखू लागत. म्हणून आम्ही आज तुम्हाला हे जे काही सांगत आहे या गोष्टींचे तुम्ही नक्की पालन करा, पुढची गोष्ट आहे… बरेचजण आपले कपडे धुतल्यानंतर त्या ठिकाणी सुखायला, कपडे वळायला टाकतात. मित्रानो तुम्ही जे कपडे वाळायला घालत ते कपडे चुकूनही माता तुळशीजवळ जाणार नाही याची काळजी घ्या, किंवा तुळशीजवळ हे कपडे वाळायला घालू नका.

बऱ्याच ठिकाणी असे देखील होते कि या कपड्यांचे पाणी त्या तुळशीवरती पडत असते किंवा या कपड्याची सावली देखील आपल्या तुळशीच्या रोपट्यावर पडत असते तर मित्रांनो अशा प्रकारच्या चुका अजिबात करू नका. त्यामुळे मोठया प्रमाणात नकारात्मक ऊर्जेची निर्मिति होते. पुढची गोष्ट आपली पाण्याची टाकी… बरेचजण दारासमोर जागा नसते, अंगण नसत, ज्यांचा फ्लॅट वगैरे आहे किंवा जे बंगल्यामध्ये राहतात त्यांच्या घरासमोर जागा असते आणि जर असा प्रॉब्लेम असेल तर आपल्या घरामध्ये किंवा आपले जे छत असते त्या छतावरती तुळस लावली जाते किंवा जे आपले टेरेस ची जागा असते किंवा बरेचजण बाल्कनी चा आधार घेतात, बाल्कनी मध्ये सुद्धा रोपटं लावतात.

मित्रांनो काहीही अडचण नाही तुम्ही कुठेही हे शास्त्रानुसार हे रोपटे लावू शकता आणि जर अंगणामध्ये लावले तर सर्वात चांगले आहे, कारण मुख्य प्रवेशाच्या समोर आपल तुळशीचं रोपटं असायला हवं मात्र तुमचा नाईलाज असेल तर तुम्ही इतर ठिकाणी देखील ते रोपटं लावू शकता. शक्यतो मित्रांनो आपली जी उत्तर आणि पूर्व दिशा आहे त्या ठिकाणी हे रोपटं लावण्याचा प्रयत्न करा, तुम्ही तुमचे जे छत आहे त्यावरती जर तुळशीचं रोपटं लावल असेल आणि त्याच्याजवळ जर पाण्याची टाकी असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा पाण्याच्या टाकीपासून आपलं रोपटं हे कमीत कमी चार ते पाच हात लांब असावं याची काळजी नक्की घ्या किंवा या पाण्याच्या टाकीची सावली सुद्धा आपल्या तुळशीच्या रोपट्यावरती पडू देऊ नका.

कारण याचे अत्यंत नकारात्मक परिणाम घडत असतात. मित्रांनो बऱ्याचश्या ठिकाणी पाहतो कि स्त्रिया आपले केस आणि भांग पडताना केस वाऱ्यांनी इकडे तिकडे उडतात किंवा काही स्त्रिया आपले केस ऐकत्र करून तेथे ठेवतात, तर हे केस ठेवताना तुळशीजवळ ठेऊ नका किंवा आपले जे केस इकडे तिकडे उडतात ते उडून वाऱ्यांनी तुळशीच्या रोपट्याजवळ जाऊन पडतात किंवा बरेचदा तुळशीच्या रोपट्यामध्ये जाऊन फसतात तर ही एक अत्यंत अशुभ प्रकाची घटना आहे. आपले केस माता तुळशी जवळ जाता कामा नये. मित्रांनो आपल्या मृत केसांना अत्यंत अशुभ समजलं जात आणि म्हणून असे हे मृत केस तुळशीजवळ जाणार नाहीत याची आपण काळजी घ्यायला हवी.

बऱ्याच ठिकाणी देवपूजा करताना जी घंटी वापरली जाते किंवा पाणी घालताना जो तांब्या वापरतात तर तुळशीला पाणी घालतात तो तांब्या त्याच ठिकाणी त्या रोपट्याजवळ ठेवला जातो, किंवा वृंदावनामध्ये घंटी आणि तांब्या ठेवला जातो मित्रांनो असे करू नका घंटी आणि तांब्या त्या ठिकाणी ठेऊ नका, त्यासाठी आपण वेगळी जागा करावी कारण धर्मशास्त्रानुसार हे अमान्य आहे. शेवटची गोष्ट चपला किंवा बूट… त्तुळशी वृंदावना जवळ चपला ठेवतात तर असे करू नका. कारण ती एक पवित्र जागा आहे म्हणून अशा ठिकाणी चपला किंवा बूट ठेवणे टाळा तर मित्रांनो अशा या गोष्टीची काळजी घ्या माता लक्ष्मी आणि माता तुळशी व भगवान विष्णू आपल्यावरती नक्की प्रसन्न होतीत.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.