लग्नाच्या पहिल्याच रात्री बायको नवऱ्याला सांगते, माझे दुसऱ्याबरोबर….

दोन दिवसाचे लग्न, व तिसरा दिवस प्रवासाचा सर्व दमले होते. पाहुणे देखील आपापल्या गावी परतले होते. आणि लग्नानंतरची ती त्याच्या मिलनाची पहिलीच रात्र होती, मनोहर फार आनंदात होता, रात्री तो आपल्या खोलीत गेला. त्याला अपेक्षा होती की, हिंदी चित्रपटाच्या नाइके सारखी त्याची नववधु देखील त्याची वाट बघत त्याच्या पलंगावर बसलेली दिसेल, पण माधुरी तर खुर्चीवर बसली होती. मनोहर तिच्या जवळ आला इथं अशी का बसली आहे, मला काही महत्त्वाचं बोलायच आहे. माधुरी म्हणाली, आजच आत्ताच…. होय, आजच आणि आत्ताच, बर बर बोल काय सांगायचे आहे.

मी लग्नाला तयार नव्हती. मनोहर एकदम दचकला काय म्हणतेस तू वेड लागलय का तुला, अगं परवाच आपल लग्न झाला ना आणि आज तू हे काय म्हणतेस, कुणी काही बोललं का तुला, नाही मग काय झाले, जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगते, हे लग्न मला मान्यच नव्हतं, अग मग हे लग्नाच्या अगोदर नाही सांगायचं इतक्या पुढे आल्यावर आता मागे फिरण….

माझा नाईलाज होता, म्हणजे तुम्हाला हे तर ठाऊकच आहे की, माझे वडील लहानपणीच ऐका अपघातात वारले, काका काकूंनी सांभाळले, माझे काका तसे प्रेमळ होते पण काकूंनी मला खूप छेडले. स्वतःच्या मुलां बरोबर चांगले वागायचे पण माझ्याशी मात्र सावत्र पणे वागायची, घरातली सर्व कामे माझ्याकडून करून घ्यायचे, माझ्या प्रत्येक गरजांसाठी,आवडी निवडीसाठी मला नेहमी मन मारून राहावे लागायचे.

माझ्यामुळे काका-काकू मध्ये सारखे वाद व्हायचे काका, काकूंचे आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, व माझी उत्पन्नाचे काहीच सोय नव्हती. शेवटी काका काकूने जमेल तसं माझे लग्न उरकून स्वतःची मोकळीक करून घेतली. मलाही नाही म्हणायला सोय नव्हती, म्हणून मी ही कंटाळून लग्नाला तयार झाले. शेवटी माझ्या जवळ काही पर्याय नव्हता, माधुरी सांगत होती हालत सोसायचे असेल तर, कुठेही असो काका काकूंकडे कशाला एकदाच त्या नरकातून सुटका होईल. या विचाराने मी लग्नाचा विरोध केला नाही, पण आता तर लग्न झालं ना, मनोहरला काही उलघडा होत नव्हता. होय पण मला तुमच्याशी लग्न करायचं नव्हतं, माधुरी म्हणाली, मग कोणाशी लग्न करायचं होतं, मनोहर आता वैतागला त्याचा आवाज थोडा वाढला होता.

जोराने बोलून तुम्ही मला बोलण्यापासून थांबू शकत नाही, शिवाय शेजारच्या खोलीत सर्वांच्या कानावर सर्व गोष्टी जातील माधुरी शांतपणे म्हणाली, मनोहरला माधुरीच्या व्यवहाराचं फार आश्चर्य वाटत होते. अग पण मी माझ्या आईवडिलांचे एकुलता एक मुलगा, माझ्या बरोबर त्यांची सून म्हणजे तूही आता त्यांच्या जगण्याची आशा आहे. शिवाय नातेवाईक इतर सर्वांना कळलं तर ते सर्व काय म्हणतील, शांतपणे तो माधुरीला म्हणाला, तो तुमचा प्रॉब्लेम आहे.

तितक्यात शांतपणे माधुरी म्हणाली, मनोहर चा पारा परत एकदा वाढला पण त्याने स्वतःला आवरले पहिल्याच रात्री तमाशा नको पण माधुरीच्या असल्या वागण्याने तो दुखावला काय करावे, हेच त्याला समजेना काय बोलावे, हे देखील कळेना तीन दिवसापूर्वी उत्साहाने लग्न झाले. आणि आज त्याची बायको त्याला म्हणते की, हे लग्न मुळात तिला मान्य नाही आणि याहीपेक्षा हे कि तो तिची आवड नाही.

हा अपमानाचा घोट घेत तो पलंगावर बसला हे बघ आता माझे प्रॉब्लेम आणि तुझे प्रॉब्लेम काही वेगवेगळे नाही. बर मला सांग मी तुझी आवड आहे, यांचा काय अर्थ यावा मनोहर नी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, याचं एकच अर्थ माझी आवड तुम्ही नाही. माधुरी शांतपणे म्हणाली, पण माझ्यात काय दोष आहे. तुमच्या गुणदोषांची विवेचना करण्यात मला रस नाही. माधुरी हळूच म्हणाली खर काय ते सांग मनोहर ला आता सहन होतं नव्हते, सांगते ऐका माधुरी बोलू लागली माझं ऐकावर अटूट प्रेम आहे. माझ्यासाठी तो ईश्वरचं  आहे, देव आहे, हो तर देवच समजा मी तर त्याला कधीच विसरू शकत नाही. मी त्याच्या प्रेमात गुंतले आहे, दिवस रात्र त्याचाच विचार करते माझं प्रेम अगदी पवित्र आहे.

जसं राधेचं प्रेम जसं मीरेचं प्रेम पण प्रेम झालं असलं तरी, आम्ही दोघं लग्न करू शकत नाही. काकू माझ्या लग्नाची घाई करत होते म्हणून मी ठरवलं की आमचं प्रेम जगात अमर करायच नावापुरता आपापला संसार वेटावा लागला. तर एक दुसऱ्यांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून जाईच संसाराच्या वेगवेगळ्या बंधनात असलो, तरी एक दुसर्याच्या प्रेमात कमतरता पडू द्यायची नाही. पण ही तर फसवणूक झाली ना कुणाची तुझ्याकडून माझी, तुझ्या प्रियकराकडून तुझी, आणि तुम्हा दोघा करून सर्वांची व समाजाची देखिल समाजाच्या तर कोणी गोष्टीच करणे माधुरी शांत पणे बोलत होती. समाजाने मला काय दिल समाजाने चार-चौघात राहून देखील, मी आज पर्यंत मी एकटीच जगत आहे

माझे आई-वडील गेल्यापासून स्वतःची फसवणूक होत आहे. काकांच्या मुलांमध्ये आणि माझ्यामध्ये कारण नसताना समाजानेच तर भेदभाव केला, असल्या समाजाची मी काळजी कशाला करायची, मला जो मानसिक आणि भावनिक आधार होता तो माझ्या प्रियकराने मला दिला आहे.

माझ्या प्रियकराने कोणाची फसवणूक केलेली नाही, त्याने सर्व नाती गोती केव्हाच मनापासून त्यागलेली आहे खर प्रेम करणारा माझा प्रियकर कोणत्याही बंधनांना मानत नाही. उरला प्रश्न तुमचा माझं स्वतःचं लग्न तुमच्याशी ऐका दडपणाखाली झाल्याने माझ्यासोबत सर्वात मोठी फसवणूक झालेली, असल्याने तुमच्याशी फसवणूक करण्याचा मी मनःस्तिथीत देखील नव्हते. म्हणून मनोहरला बधिर झाल्या सारख वाटत एक नववधू पहिल्याच रात्री तिचे संबंध कोण्या तिसराशी असल्याचे ती चक्क कबुलीत येत होती, नवल म्हणजे यासाठी तिच्यावर कोणतीही खंत नव्हती. याला स्त्री स्वतंत्र म्हणतात, का ? काय करावे हे त्याला समजेनास झाल आई-वडिलांनी त्याच्या लग्नाची स्वप्न बघितली होती.

लग्न ठरल्यापासून घरात नव्या सुनेची सतत चर्चा होती आई-वडील तर नातवंडाचे स्वप्नात देखील रमले होते. आता त्यांना या सर्व प्रकरणाची जराशी कल्पना आली तर त्यांना किती धक्का बसेल, वडिलांचे तर नुकतेच बाई पासचे ऑपरेशन झाले. आहे त्यांना तर हा आगास सहन होणार नाही, आई देखील खचून जाईल चारचौघात तिला समजवता येणार नाही. आज पर्यंत समाजात ताठ मानेने जगणाऱ्या त्याच्या आई-वडिलांचे काय होईल, नवीन नवरी त्याला लगेच सोडून गेल्यावर लोकही त्याच्या बद्दल नाही नाही ते बोलते, या सर्वांना तू कसं काय तोंड देणार आहे. या सर्व विचारांनी मनोहर फारच काळजीत पडला मग आता पुढे काय, मनोहर विचारले त्याच्या आवाजात वेदना होत्या, हे सर्व तुम्हाला सांगितल्यावर मी या खोलीत कशी काय थांबू शकते.

म्हणजे तू जाणार होय, पण कुठे सध्या तर माहीत नाही, थोडा वेळ दोघेही शांतपणे बसले, मनोहर सारखा माधुरी कडे बघत होता. माधुरी ची नजर खालीच होती ती पायाच्या अंगठ्याच्या नखाने जमिनीवर मनातलं काहीतरी कोरीत होती, ती सर्व सांगून मोकळे झाली होती. आता मनोहरची निर्णय घेण्याची वेळ होते काय करावे, हाच विचार त्याला सारखा त्रास देत होता त्याच्यामध्ये लग्नाअगोदर चे काही संबंध असले, तर बहुतेक सर्व मुली ते गुपित ठेवतात व आपल्या संसारात रमतात पुरुषही काही वेगळे वागत नाही. पण इथे तर पहिल्याच रात्री सर्व उघळती झालं होतं, आणि मुख्य म्हणजे त्याची बायको त्याला सोडून जाणार होती.

आणि याची तिला कोणतीही खंत नसल्याचे मनोहरला भासत होते, आयुष्यात येणाऱ्या बऱ्यावाईट गोष्टीची तिला काहीही कल्पना नसली तरी, ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत वाटत नव्हती. मनोहरला मार्ग शोधायचा होता, हे बघ मी तुझ्या प्रियकराला ओळखत नाही. म्हणून मला त्याची बाजू माहीत असणार की नाही, पण त्यांनी जे काय केलं, ते कोणत्याही दृष्टीने योग्य नाही लहान वयाच्या बालिश प्रेमाचा गैरवापर केलाच मला जाणवत आहे. तू वेडी सावध हो त्याचा नाद सोड नाहीतर तुझी वाट सर्वात जास्त खचणार आहे,

प्रेमाच्या वाटेवर किती संकट सहन करण्याची माझी तयारी आहे, आता मनोहर चिडला तुला एकटीला सहन करावा लागणार आहे. जाऊ दे जास्त चर्चा करण्यात काय अर्थ आहे, आता असं कर चार दिवस जाऊदे, माझ्या आई-बाबांना थोडं समाधान वाटू दे मग मी तुला तुझ्या काकांकडे सोडतो स्वतः पोहोचणे मग तुझा निर्णय घेण्यासाठी तु मोकळी राहशील तोपर्यंत कुठेही याबाबतीत वाचता करू नको. आणि काळजी तर मुळीच करू नको, एक नवरा म्हणून तुझ्या मनाविरुद्ध काही वागणार नाही. माझं प्रेम चार दिवसाचे असले तरी ते प्रगल्भ आहे, त्यात बालिशपना नाही, तू पलंगावर शांत झोप मी झोपतो सोप्यावर सकाळी मनोहरची झोप उशिरा उघडले घड्याळात आठ वाजले होते.

हा लेख  नक्की वाचा : शरीरसुख : अभिनव बसवर यांचा एक अप्रतिम लेख.. नक्की वाचा…

माधुरी नव्हती त्याला एकदम माधुरी कोणालाही न सांगता निघून तर गेली. नाही ना या विचाराने तो अस्वस्थ झाला, घाईघाईने तो बाहेर आला आणि पाहू लागला पाहतो, तर काय माधुरीचे स्नान नुकतेच झाले. वाटत होते, अर्धवट पुसलेले ओलसर केस मोकळे होते. बाबा सोप्यावर बसून पूजा करायला माधुरी बाबांनी कडे पूजेची तयारी करत होते. जवळ बसले होते 1, 1 फुल वेचून माळा गुंफत होते, हे सर्व बघून मनोहरला फार आश्चर्य वाटले.

माधुरीच्या चेहर्‍यावर एक वेगळेच तेज होता रात्रीच्या माधुरी पेक्षाही ही माधुरी फार वेगळीच दिसत होती. मनोहरदास स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता राज वेळ तो माधुरीला बघत तसाच उभा राहिला. बाबांचं लक्ष त्याच्याकडे गेला सुनबाई, तुमचे यजमान उठले त्यांच्यासाठी चहा पाण्याचे बघा, बाबा हसत म्हणाले, मनोहर परत आपल्या खोलीत परतला, त्याला काही समजत नाही. थोड्या वेळाने माधुरी चहा घेऊन खोलीत आली, चहा टेबलावर ठेवून ती परत जाऊ लागले.

थांब मनोहर म्हणाला बाबांची पूजा आटोपल्यावर येते म्हणत ती निघून गेली. मनोहरचे स्नान वगैरे आटोपले तो पर्यंत माधुरी खोलीत आलेलीच नव्हती, मला तिला बरंच काही विचारायचं होतं, रात्रीची माधुरी व आताची माधुरी यातला बराच फरक जाणवत होता. थोड्या वेळाने आईनेच त्याला हाक दिली गरमागरम पोहे बनविले आहे, सून बाईने बाहेर ये मनोहर बाहेर आला माधुरीणे त्याच्या हातात, पोह्याची प्लेट दिली काय दादा कुठे घेऊन जाणार आहे. वहिनीला हानीमूनसाठी चुलत बहिणीने त्याला विचारलं, कुठेही नाही का, रे वहिनीला बाहेर नेणार नाही फिरायला बाहेर तर येणार आहे.

पण मनोहर आईकडे वळला उद्या किंवा परवा हिला माहेरी सोडणार आहे, का रे ? त्यांच्याकडून काही निरोप वगैरे आला आहे का, आईने विचारले नाही. माधुरीची जायचे आहे, मनोहर ने काटाक क्षणी माधुरी कडे बघितले व म्हणाला काल रात्री म्हणत होते. काही जरुरी काम आहे, तिला माहेरी जावे लागले, आता सर्व जोरजोराने हसू लागले मनोहरला गोंधळल्यासारखे झाला त्याने माधुरीकडे बघितलं तर ती हसत होती. मला कळलेच ना सर्व का हसत आहे तो रागाने म्हणाला, हसायला काय झालं काल कोणती तारीख होती.

आईने विचारलं एक एप्रिल लगेच मनोहरच्या तोंडून निघाले दादा तू एप्रिल फूल बनला चुलत बहिणीने त्याच्या पाठीवर धप्पा दिला सुनबाई ने सांगितलं सर्व आम्हाला बाबा म्हणाले, मनोहर आता आणखीन चिडला मग तो प्रियकर गोपाळ कृष्ण सोबत आणली आहे. सूनबाईंनी पूजेसाठी ठेवलाय देवाऱ्यात आई हसत म्हणाली.

लेखन – विश्वनाथ शिरढोणकर

मित्रांनो लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. फोटो प्रतिकात्मक आहे आणि तुम्हाला लेख कसा वाटला ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

हा लेख  नक्की वाचा : शरीरसुख : अभिनव बसवर यांचा एक अप्रतिम लेख.. नक्की वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published.