या 3 कारणामुळे पती पत्नीचा आदर करत नाही, सुखी संसारासाठी हे 3 नियम लक्षात ठेवा…

पती-पत्नीच्या नात्यामध्ये आदरयुक्त भावना, प्रेम, सन्मान असायला हवा, परंतु स्त्रियांच्या खूप साऱ्या कंप्लेंट असतात. की तो मला वेळ देत नाही, माझ्याकडे लक्ष देत नाही, माझा आदर सन्मान करतही नाही, नातं एक तडजोड म्हणून राहिला आहे. याची तीन कारणे आज आपण पाहणार आहोत. जी पाहून शंभर टक्के खात्री देतो की, तुमच्या नात्यामधील दुरावा गायब होईल.

पहिला पॉईंट पतीच्या कामाचा आदर करा, सर्वात कॉमन आणि शंभर टक्के महिलांची हीच तक्रार आहे कि, नवरा मला वेळ देत नाही, कायम कामच करत असतो. सिम्पल गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर चांगली लाइफ स्टाईल हवी असेल, सुख- सोयी हव्या असतील, तर त्यासाठी पैसा हा लागणारच, व पैसे कमवण्यासाठी काम हे करावेच लागणार. तो काम फक्त स्वतःसाठी नाही, तर कुटुंबासाठी करत असतो. दहा-बारा तास काम करण्याची त्याला काय हाऊस नसते. त्याला वारंवार विरोध करण्यापेक्षा त्यांच्या कामाचा सन्मान करा, शक्य तेवढी त्याला कामांमध्ये मदत करण्याचा प्रयत्न करा. जर मदत करू शकत नसाल, किमान अडथळा घालण्याचे बंद करा, जेवढा त्याला विरोध कराल, तेवढा जास्त रागाने तो काम करेल. तेवढीच जास्त तो घरी वेळाने येईल, तेवढा वेळ तुम्हाला कमी देईल, किंबवना थोडाही वेळ तुम्हाला देणार नाही. गरज आहे परिस्थिती समजून घेण्याची तुमच्या कुटुंबाच्या सर्व गरजा त्या नोकरीमुळे पूर्ण होतात. याची जाणीव ठेवण्याची.

दुसरा पॉईंट परिवार पती होण्याआधी तो एक मुलगा आहे, भाऊ आहे, पुतण्या आहे, किंवा नातू आहे, याची जाणीव ठेवा, म्हणजे काय जेव्हा तुम्ही पतीच्या घरी जाता व अपेक्षा ठेवता, या घरात दुसरं कोणीही मला नको, तेव्हा मात्र संसारात प्रॉब्लेम सुरू होतात. ज्या पतीला पंचवीस वर्षात तीस वर्ष त्याच्या कुटुंबाने सांभाळलं त्याला त्याच्या माणसापासून दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न करता, किंवा त्याचा कुटूंबियांसह तुम्ही चांगली वर्तणूक ठेवत नाही. तर त्याचे खुप वाईट परिणाम तुमच्या नात्यावर होणार, जी पत्नी माझ्या घरच्यांचा आदर करत नाही, ती पुढे जाऊन माझं काय करणार ही भावना पतीच्या मनामध्ये बळावत जाते. म्हणून लक्षात ठेवा त्याच्या कुटुंबियांसंघे तुम्ही जेवढे चांगले वागालं त्या पेक्षा जास्त तुमचा पती तुमच्यासंगे चांगलं वागेल.

तिसरा पॉईट आहे पैसा, सर्व स्त्रियांना नाही, पण बऱ्याच स्त्रियांना पैशाची हाव असते सॉरी पण हे सत्य आहे. दुसऱ्यांच्यासोबत स्वतःच्या घराला कंपीयर करतात. त्याच्याकडे एवढी संपत्ती आहे, मोठी कार आहे, सोन आहे आणि बंगला आहे, कार आहे, आपण मात्र एवढे श्रीमंत नाही. आपल्याकडे त्याच्यापेक्षा कमी संपत्ती आहे, सतत अपेक्षा मिळणाऱ्या गोष्टीमध्ये असमाधानी ही प्रयुक्ती खूप सारे प्रॉब्लम निर्माण करते, जे आहे त्यामध्ये कसे राहता येईल याचा विचार करा. खरोखऱ पैशाची गरज असेल तर दोघे मिळून शांतपणे विचार करा, कशाप्रकारे अजून कमाई होईल, अजून कोणता साईटबीजनेस करत येईल, जर दोघे ही कमवत असाल तर माझं तुझं वरून भांडण्यात काही अर्थ नाही. पत्नी म्हणेल माझ्या पगार मी देणार नाही किंवा पतीही असं म्हणत असेल तर वाद हा होणारच नात्यांमध्ये कधीही पैशाला आणू नका संसार पैशावर नाही तर प्रेमावर चालतो. गरज असते समजावून घेण्याची या दिलेल्या तीन टिप्स फॉलो करा. 90% पेक्षा जास्त किटुबांमध्ये या वरूनच वाद होतात थोडी माघार घ्यायला शिका, एक पाऊल मागे घ्यायला शिका, माघार घेतल्याने नुकसान नाही मोठेपणा मिळते समोरची वेक्ती तुमचा आदर करायला लागते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला माहिती कशी वाली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.