‘याद पिया की आने लगी’ सारखी गाणी गाऊन प्रसिद्धी मिळवलेली ही अभिनेत्री 22 वर्षांनंतर दिसते अशी….

९०च्या दशकात प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी गायिका फाल्गुनी पाठक सर्वांना परिचित आहेच. फाल्गुनी पाठक आज आपला ५६ वा जन्मदिन साजरा करीत आहे. फाल्गुनी पाठकला दांडिया आणि गरबा क्वीन असेही संबोधले जाते. तिच्या अल्बमनी एक काळ खूपच गाजवला होता. जास्त करून तरुणाई तिच्या गाण्यावर दांडिया व गरबा बेभानपणे खेळते.

९०च्या दशकात फाल्गुनीच्या “ मैने पायल है छनकाई, अब तो आजा तू हरजाई” या अल्बम गाण्याने खूपच प्रसिद्धी मिळवली होती. ९०चे दशक हे संगीत क्षेत्रामध्ये एक असा सोनेरी काळ मानला गेला, जेव्हा अल्बमच्या गाण्यांनी युवा पिढीला वेड लावले होते. युवा पिढीने नवरात्रिमध्ये त्या गाण्यावर ठेका ठरला होता.

आज फिल्म जगतातील लोक फाल्गुनीला विसरले आहेत. पण गुजराती समाजात तिची खूपच चांगली गायिका म्हणून ओळख तिने निर्माण केली आहे. बॉयकट केलेली ही गायिका आता फक्त नवरात्रि उत्सवातच गाणे म्हणताना दिसते. वाढदिवसाच्या या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला गायिका फाल्गुनीचे कधी न ऐकलेले किस्से सांगणार आहोत. फाल्गुनी एका गुजराती परिवरातील आहे आणि तिने अजूनही लग्न केलेले नाही. फाल्गुनी गुजराती समाजात खूपच प्रसिद्ध आहे.

फाल्गुनी जरी सिनेमात गाणी म्हणत नसेल, तरी ती पुष्कळ स्टेजशो करते. नवरात्रीचे नऊ दिवस तिची दिनचर्या खूपच व्यस्त असते. लोक तिला गरबा गाणी गाण्यासाठी आमंत्रित करतात व त्यासाठी आणि लोक तिचे गाणे ऐकण्यासाठी रांगा लावतात, परंतु ती सहज उपलब्ध नसते. नवरात्रीत तिला अनेक ठिकाणी बोलवलेले असते. त्याचबरोबर एका शोसाठी ते बरेच मानधन घेते. एका माहितीनुसार, फाल्गुनी नवरात्रीच्या एका रात्रीच्या गाण्यासाठी २० लाख रुपये मानधन घेते.

 

फाल्गुनीने तिच्या करियरची सुरुवात १९९८ मध्ये एका आपल्या अल्बमने केली होती. त्यांची गाणी “चुडी जो खनकी” “ मैने पायल है छनकाई, अब तो आजा तू हरजाई” आणि “ मेरी चुनरी उड उड जाये” खूपच प्रसिद्ध झाली. एका मुलाखतीत फाल्गुनीने सांगितले, की ती लहानपासूनच स्टेज शो करीत आली आहे.

संगीत तिचे जीवन आहे. फाल्गुनीला कितीतरी बॉलीवूड सिनेमात गाण्याची संधी मिळाली होती, पण तिने आपल्याच अल्बमवर काम करायचे ठरवले. फाल्गुनी तिच्या पेहेरावाबाबत अत्यंत प्रसिद्ध आहे. फाल्गुनी कायमच मुलांसारखे कपडे परिधान करते. या बाबतीत फाल्गुनीने सांगितले की, मी फक्त शाळेतच स्कर्ट अथवा ड्रेस परिधान केला आहे, ज्यात मला वावरणे सोयीस्कर पडत नाही. पॅंट मला खूप सोयीची पडते व मला आवडते.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.