आपण मुंग्यांना अगदी शूद्र आणि लहान जीव समजतो, आपण चालत असताना जर मुग्या दृष्टीस पडल्या, तर आपण त्यांना न बघितल्यासारखं करतो, व पुढे निघून जातो. परंतु मुंग्या खूप कष्टाळू व हुशार आहे, हे आपल्याला माहीतच नसते, वैज्ञानिकांनी हे सिद्ध केले आहे मुंग्यां त्याच्या वजनापेक्षा शंभर पट वजन उचलू शकतात, तसेच त्या एकजुटीने काम करतात एकमेकींशी संवाद साधतात, त्यांच्या घरामधील पुढील भविष्याचा विचार करून भंडार घर तयार केलेले असते. त्यात ते खाण्याची सामग्री एकत्रित करून ठेवतात, व बिकट परिस्थिती त्यावर उदरनिर्वाह करतात त्यांचे एकमेकींचे नेटवर्क खूप स्ट्रॉंग असते. मुंग्या एकजूट करून डोंगराला ही फोडण्याची ताकत ठेवतात,
मुंग्या आपला आसपासचे बारीक-बारीक कीटक किडे पतंग जर मरून पडले असतील तर त्यांना खाऊन वातावरण स्वच्छ करण्याचे काम करतात. मुंग्या मुळेच आपल्याला धन येण्याचे आणि धन जाण्याचे संकेत मिळतात, रोजच्या जीवनात आपल्याबरोबर कितीतरी लहान मोठ्या गोष्टी घडतात असतात, परंतु आपण त्यांच्यावर लक्ष देत नाही, आपल्याला या गोष्टी द्वारे संदेश देण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपल्या ते लक्षातच येत नाही. मुंग्यांना आपण एक छोटासा जीव मानतो, आपण त्यांना जास्त महत्त्व देत नाही, आपल्या आसपास कितीतरी मुंग्या असतात परंतु आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु नीट लक्ष दिले तर मुंग्या खूप मेहनती व एककटीने राहणारे जीव आहे.
या विश्वावात मुंग्यांच्या अनेक जाती बघितल्या जातात, परंतु आपण शक्यतो लाल मुंग्या काळ्या व मुंग्या यात दोन प्रकारच्या मुंग्यांना ओळखतो, मुंग्या स्वतःच्या वजनाच्या शंभर पट अधिक उचलू शकतात, इतकी क्षमता त्यांच्यामध्ये असते, लहान मुंग्यांना अशुभ तर काळा मुंग्यांना शुभ मानले जाते,
परंतु या दोन्ही प्रकारच्या यांना फार पूर्वीपासून भोजन म्हणून पीठ टाकण्याची परंपरा चालत आली आहे. मुंग्यांना पिठात साखर घालून ते भोजन म्हणून दिल्यास व्यक्ती सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतात, हजारो मुंग्यांना रोज साखर खायला दिल्यास आपल्याला सहस्त्र भोजनाचे पुण्य मिळते, व त्या हजारो मुंग्या आपल्या प्रति कृतज्ञ होतात, आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात. त्यांच्या आशीर्वादाचा परिणाम म्हणून आपले प्रत्येक संकट व बाधे पासून संरक्षण होते. त्यांच्या तोंडात अंडी आहे अशी लाल मुंग्याची रांग बघणे खूप शुभ असते. जे चिमण्यांना दाणे टाकतात, मुंग्यांना पीठ साखर खायला देतात ते परम धम्माची प्राप्ति करतात मुंग्यांना दररोज साखर खायला दिल्यास आपली कर्जापासून मुक्तता होते.
व म्हणून दररोज अंघोळ झाल्यानंतर चहा पिण्या पूर्वी मुंग्यांना साखर टाकावी नंतरच चहा घ्यावा हा रोजचा नियमच करून घ्यावा, जर तुमच्या घरात काळ्या मुंग्या दिसल्या, आणि ते सरळ रेषेत चालत असतील तर समजून जा तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. तुमच्या घरात सुख समृद्धी येईल काळ्या मुंग्या अचानक घरात दिसल्यास एक शुभ संकेत समजला जातो, काळ्या मुंग्या आपल्याबरोबर सकारात्मक ऊर्जा घेऊन येता काळा मुंग्या च्या घरात येण्यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते. या मुग्यांना कधीही मारू नये, परंतु याचा अर्थ असा नाही कि त्यांना घरात तसेच राहू द्यावे तुम्हाला फक्त एक काम करायचे आहे,
एक छोटासा गुळाचा तुकडा घेऊन खडू सारखे त्या गुळाच्या तुकड्याने घराच्या बाहेर एक रेष ओढायची आहे, गुळाच्या वासाने सर्व मुंग्या आपो आप तिकडे जातील व घरातून बाहेर निघतील, जर यावेळी तुम्ही एक लाल कापड अंथरुन देवी लक्ष्मी चे नाव घेता घेता कार्य केले तर देवी लक्ष्मी तुमच्यावर लवकर प्रसन्न होईल. व तुम्हाला शुभ फळ मिळेल. आता बोलूया लाल मुंग्या विषयी मित्रांनो घरात लाल मुंग्या येण्यामुळे नकारात्मकता येते, त्या आपल्यासाठी अशुभ फळ व संकेत घेऊन येतात
लाल मुंग्याचा घरात येण्याचा अर्थ तुम्ही कर्जबाजारी होण्याची ही सुरुवात आहे. तुमच्या व्यापारात नुकसान होऊ शकते, यामुळे घरात अशांतता निर्माण होते, व सुख-समृद्धी घटायला सुरुवात होते. अचानक घरात कोणी आजारीही पडू शकते, परंतु या मुंग्याना ही औषधे विषारी औषधाने मारायचे नाही, तर पिठात थोडी साखर मिसळून ते ऐका कापडात बांधून ते गाठोळी दाराबाहेर ठेवून द्यावि, यामुळे या गाठोडी कडे लाल मुंग्या आकर्षित होतील व घरातून बाहेर जाते लाल मुंग्या घरात असणे,
आपल्यासाठी अशुभ परंतु काळ्या मुंग्या शुभ असल्यामुळे तुम्हाला त्यांना पीठ साखर खाऊ घालायचे आहे, म्हणजे तुम्हाला सहस्त्र भोजनाचे पुण्य मिळेल काळा मुंग्यांना रोज साखर टाकल्याने आपले कर्जही फिटते परत कर्ज घ्यावे लागत नाही. म्हणून आंघोळ झालीकी लगेचच एक चिमूटभर साखर दाराबाहेर मुंग्यांना जरूर टाकावी…
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.