या अभिनेत्रीने दिला होता रेकॉर्ड ब्रेक किसिंग सिन ज्याला पाहून लोक…

बॉलीवूड सिनेमामध्ये एक अशी वेळ होती की, जेव्हा काही काही दृश्यांना चित्रित करणे मोठे काम मानले जात होते. तेव्हा कॅमेरामनना सुद्धा अशी दृश्ये चित्रित करणे कठीण जात असे. अभिनेत्री अशी दृश्ये करायला बिलकुल तयार होत नसत, अर्थात अभिनेता सुद्धा. एकमेकांना एकदम अनोळखी असेलेली दोन माणसे अशी दृश्ये करायला तयार नसत. तेव्हा समाजाचा, त्यातील चालीरितींचा पण पगडा अभिनेत्रींवर असायचा. कितीतरी अभिनेत्रीनबरोबर त्यांच्या आईसुद्धाहि चित्रीकरनाच्या ठिकाणी येत असत. त्यामुळे एक प्रकारचे दडपण सगळ्यांनाच येत असे.

परंतु आता काळ खूपच बदलला आहे. आधुनिकीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. त्यानुसार सगळेच बदलत चालले आहे. मग काळानुसार बॉलीवूडचे चित्रच बदलून गेले नाही तर काय नवल? आजच्या काळात बॉलीवूड सिनेमामध्ये ओठांचे चुंबनदृश्य ही अतिशय सामान्य अशी गोष्ट झाली आहे॰ या प्रसिद्धीच्या जगात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी काहीही करायची तयारी ठेवावी लागते. मग ते फक्त चुंबनदृश्य असो किंवा बेडरूम मधील एखादा प्रसंग असो.

बॉलीवूडमध्ये सर्वात हुबेहूब खरे वाटावे असे चुंबनदृश्य देणारा अभिनेता म्हणून इमरान हाशमी यांचे नाव पुढे येते. पण याला अपवाद आहे सलमान खान. एवढा आघाडीचा व प्रसिद्ध अभिनेता सलमान खानने मात्र आत्तापर्यंत कोणत्याही सिनेमात चुंबनदृश्य दिलेले नाही.

हॉलीवूड असुदे नाहीतर बॉलीवूड, चुंबनदृश्य हे आजकाल अगदी सर्वसाधारण गोष्ट झालेली आहे, परंतु आज पण पडद्यावरचे खरे दीर्घ चुंबनदृश्य जे आहे, ज्याचा विक्रम ८५ वर्षांनंतरही कोणीही मोडू शकलेले नाही. ते दृश्य होते “कर्मा” या सिनेमातील.

१९३३ मध्ये हिमांशु राय यांच्या निर्मितीत बनलेला सिनेमा “कर्मा” मधील हे दृश्य होते. ज्यात देविका रानी आणि हिमांशु राय हे दोघे अभिनेत्री व अभिनेता होते. एका प्रणयाच्या प्रसंगात यांचे दीर्घ असे चुंबनदृश्य चित्रित केले गेले होते. हे त्या दोघांनी खरोखरच घेतलेले चुंबनदृश्य होते. त्या चुंबनदृश्याशी तुलना करता आजच्या सिनेमात केलेली चुंबनदृश्ये अगदीच फिकी वाटतात.

असे सांगितले जाते, की देविका रानी आणि हिमांशु राय यांनी या चित्रपटात पूर्ण ४ मिनिटांचे चुंबन घेतले होते. त्यावेळी अश्याप्रकारची चुंबनदृश्य देणे म्हणजे धाडसाचे एक मोठे पाऊल होते. हे दृश्य जेव्हा दाखवले गेले, तेव्हा तर लोक आश्चर्यचकित झाले. कारण की, तोपर्यंत असे कोणतेही चुंबनदृश्य प्रेक्षकांसमोर आले नव्हते. त्यावेळचे सिनेमे अगदीच साधे व लोकांना रुचणारे होते. अशावेळी अशा प्रकारचे धाडस करणे सोपे नव्हते. पण देविका रानी व हिमांशु राय यांनी ते करून दाखवले.

Leave a Reply

Your email address will not be published.