कोणतीच स्त्री चारित्र्यहीन नसते जोपर्यंत ती…

सामाजिक रितीरिवाज आणि लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतींने महिलांच्या चारित्र्यावर नेहमीच शिंतोडे उडवले जातात, जरि त्यात त्या महिलेची काहीही चूक नसेल तरीही. काही व्यक्ति महिलांवर दबाव टाकण्यासाठी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतात, आणि तिच्याबद्दल एकमेकांमध्ये वाईट बोलतात, परंतु एक महिला कधीही चारित्र्याहीन नसते. तिला चारित्र्यहीन बनवण्यात पुरुषांचा मोठा वाटा आहे.

समाजात अनेक गोष्टींबाबत चांगले वाईट बोलले जाते, तशी माणसांना सवयच असते. परंतु या सर्व गोष्टी करण्यात पुरुषांची भूमिका महत्वाची असते. पुरुषांच्या सहभागाशिवाय स्त्री चारित्र्यहीन होऊ शकत नाही. चूक पुरुषांचीच असते, पण सर्व दोष स्त्रीलाच दिला जातो. पुरुष, जे आपल्या घरातील स्त्रीचा योग्य मान न राखता अन्य महिलांशी गैरवर्तन करतात, तिच्याशी अंनैतिक संबंध ठेवतात, त्यांना दोष लागत नाही. पण स्त्री मात्र आरोपीच्या पिंजर्‍यात उभी केली जाते. पण महिला कोणाही बरोबर दुष्कृत्य करत नाहीत, पण पुरुष मात्र असे करून नामानिराळे राहतात.

स्त्री सारखे या जगात दुसरे कोणी असूच शकत नाही. ती कोणाची तरी माता होते, भगिनी होते व पत्नी होते. ती अनेक नाती निभावते, जपते. जी समाज व पुरुषांनी दिलेला त्रास सहन करून मनापासून परिवाराचे पालनपोषण करते व प्रत्येकाला यशस्वी करण्याचा प्रयत्न करते. पण या सर्वाचा समाज योग्य विचार करत नाही व तिला योग्य सन्मान देत नाही.

स्त्री नेहमीच वडील व पती यांच्या दबावाखाली असते, परंतु पुरूषांना मात्र सर्व बाबतीत स्वातंत्र्याचा अधिकार असतो. म्हणूनच स्त्री कधीही चारित्र्यहीन असू शकत नाही.

जिच्यामुळे आपण ह्या जगात आलो, ती एक स्त्रीच असते, ती आपली माता असते. “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” हे अगदी खरे आहे. पण आपल्या समाजाची मानसिकता बघा, त्याच स्त्रीला लोक चारित्र्यहीन संबोधतात. काही लोकांचे विचार असे असतात, की स्त्री ही त्यांच्यापेक्षा वरचढ न होता त्यांच्या हाताखाली काम करेल, महिलांना तो सन्मान कधीच मिळत नाही ज्याच्यावर त्यांचा हक्क असतो. नेहमीच महिलांबरोबर घरच्या नौकरानीप्रमाणे वर्तन केले जाते. महिलांबरोबर असे वर्तन करणे अजिबात योग्य नाही.

खरे तर महिलांना लक्ष्मीचा सन्मान दिला गेला आहे. एखाद्या घरी मुलगी जन्माला आली तर “ लक्ष्मी” आली घरात असे म्हणतात. तसेच लग्न होऊन जेव्हा नवी नवरी घरात येते, तेव्हा ती लक्ष्मीच्या पाउलाने आली आहे असे म्हणतात. परंतु आजच्या काळात कोणीही मनापासून महिलांना लक्ष्मी मनात नाहीत.

आमचे हे विचार कोणत्याही एका व्यक्तिविषयी नाहीत, तर महिलांना त्यांचे अधिकार व सन्मान दिला जावा हाच आमचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *