से-क्स तिचीही गरज पण……. Ramesh Mangeni यांचा एक अप्रतिम लेख….

मनात खूप दिवसापासून वाटायचं आपली पण एखादी मैत्रीण असावी म्हणून मी त्या विचाराने वागू लागलो. नंतर काही दिवसांनी मैत्रीण सुद्धा मिळाली आयुष्य एकदम आनंदात चालू  होतं. भेटणं, फिरणं , खाणं, शॉपिंग करणं, बऱ्याच ठिकाणी फिरायला गेलो सगळं एकदम आनंदात चालू होतं; माझा तिच्यावर विश्वास होता पण तिचा माझ्यावर आहे की नाही; हे नवीन असल्यामुळ कळून येत न्हवतं. तरीपण ती मला आवडायची. थोड्याच दिवसात ती जणु काही माझं आयुष्य होऊन बसली होती. ती जे मागायची मी तिला सर्व द्यायचो. अगदी तिच्या घरातील अडचण सुद्धा सोडवायचो. तिच्या आईने पैसे मागितले, उसने पैसे द्यायचो, मला वाटायचं ही आपलीच बनून राहावी . हिला आपण कधी सोडायचं किंवा गमवायच नाही. मी माझ्या घरातलं आणि मनातलं सगळं खरं सांगायचो. ती हि सांगायची पण ती सांगत होती ते मला पुढे जाऊन कळालं की मैत्रीनीच नाव पुढं करून तिच्या घरातील ती प्रॉब्लेम सांगायची मला ते खरं वाटायचं पण ते तिचेच प्रॉब्लेम असायचे. मी तिच्या वर पूर्ण मनाने विश्वास ठेवला होता, वाटायचं ही आपल्याला साथ कडे पर्यन्त देईल.

अधुन मधुन भांडणं व्हायचं मग पाच -सहा दिवस बोलण सोडुन द्यायचं मग मीच तिला परत कॉल करून सॉरी म्हणून बोलायचं . मला आठवतंय की तिने एकदाच मला सॉरी म्हणून परत फ़ोन केला होता . परंतु त्यानंतर जेवढ्या वेळा आमची भांडणे झाले तेवढ्या वेळा मीच आणि मलाच गरज असल्यासारखे तिला फोन करायचो. यामुळे मला पण खूप वाईट वाटायचं कारण मीच प्रत्येक वेळेला नमतं घ्यायच; तिला गरज नाही का माझी पण असुदे म्हणून मी हा विषय तिच्यासमोर फ़ारसा कधी काढायचो नाही . आमच्यात बरच काही पुढं पुढं चाललं होतं पण मलाच याची भीती वाटायची, कारण कोणत्या मुलीच आयुष्य कधीही बरबाद व्हायला नाय पाहिजे असं वाटायचं. ती मला म्हणायची तू मला I love you का म्हणत नाहीस ? मी तुला किती वेळेस म्हटले आहे. मी जर तस म्हटलो तर, मला भीती वाटायची कारण मी जर हिची जबाबदारी पूर्ण करू शकलो नाही, तर ती आपल्या सोबत आयुष्यभर दुःखी राहील आणि आपल्याला कोणालाही दुःखी ठेवण्याचा अधिकार नाही. आमच्यात जवळीकता फार दिवस लांब राहू शकली नाही. आणि आम्ही सगळी हद्द पार केली.

काही दिवसानंतर ती मला म्हणू लागली की तू मला आता सोडून तर जाणार नाहीस ना मग मी म्हटलो अस का विचारत आहेस. ती म्हटली अरे बरीच मुलं ही मुलांना एकदा का त्याना जे मुलीकडून हवं असत ते मिळालं की; सोडुन जातात मग मी म्हटलो त्या बऱ्याच मधला मी नाही फक्त तू सोडून जाऊ नको. आयुष्यभर मला तुझा कंटाळा येणार नाही. तिला पाणीपुरी आवडायची मग आम्ही दोघ कधी कधी खायचो. मला तिच्या शिवाय काहीच कळायचं नाही जॉब करून रोज संध्याकाळी तिला भेटायला जायचो. जेव्हा जेव्हा आम्ही जवळ अगदी जवळ यायचो. तेव्हा तेव्हा ती मांसाहारी खाण्याची इच्छा व्यक्त करायची मग मी तिला ते द्यायचो. तिला सांस्कृतिक वादनात रस होता ती एका पथकात जात होती. मला ही सुरुवातीला तिचा छंद आवडायचा. असच एक दिवस तिने मला वादणाचा कार्यक्रम बघण्यासाठी बोलावले परंतु मला छान वाटले. वर्षातील काही दिवस हा कार्यक्रम तिचा असायचा. असाच एक दिवस ती त्या कार्यक्रम ला जाण्यासाठी त्या पथकातील मुलाच्या गाडीवर जाताना दिसली. आणि ते मला आवडलं नाही मी तिला दुसऱ्याच दिवशी सांगून टाकलं, तुझं अस एखाद्याच्या गाडीवर बसून जाणं मला बिलकुल आवडलं नाही. त्यामुळे तू येथून पुढे जाताना त्या मुलाच्या गाडीवर दिसता कामा नये , आणि तिने सुध्दा सॉरी म्हणून मला नाही जात असे सांगितले. मग मी थोडासा काही शांत झालो.

ती मला म्हणायची तू लग्न कोणासोबत करणार आहेस मी तिला सहज म्हणायचो तुला सोडून दुसऱ्या मुलीसोबत मग ती ही ठीक आहे म्हणायची. मी तिच्यात खूप गुंतलो होतो. एकदा का आमच्यात मोठे भांडण झालं त्यावेळेस मी तिला म्हटलो मला नाही तुझ्यासोबत रहायचं. त्यावर ती रडली खूप मला सोडून जाऊ नको म्हणून. नंतर तिने मला तिची जादू वापरून शेवटी मनवल. माझा तिच्यावर जीव लावणं, दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ देणं, तिज्या प्रत्येक गोष्टीला मान्य करण, या सगळ्यात मी माझा राहिलो नव्हतो. हे तिला माहीत होतं. माझा सेल्फरेस्पेक्ट मी हरवून बसलो होतो. आणि ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक होती. मी खरं तिच्यावर जीव लावला होता . मला काही गोष्टी तिच्या बदल चुकीच्या वाटत होत्या त्या मी तिला सांगत होतो. उशीर पर्यंतबाहेर फिरू नको, मुलांमध्ये फिरु नको, पण ती हो म्हणायची आणि जसेच्या तसे चालू असायचे. एक दिवस परत एकदा ती मला वादनाला जाताना मुलांच्या गाडीवर जाताना दिसली मला राग आला. मी मुदामहून खात्री करण्यासाठी तिला विचारले तू काल वादनाला जाताना कशी गेलीस, त्यावर ती म्हणाली रिक्षाने. मला खर माहिती होत मी तिला बोलून दाखवल. तिने कारण सांगितलं मग मी परत तिला सांगितलं. आता परत अस करू नकोस आणि तिने ते मान्य केलं. या सगळ्यात आम्ही दोघ खूप वेळ एकत्र घालवत होतो. कारण ती आणि मी एका ठिकाणी जॉब करत होतो. यामुळे मी तिला खूप ओळखू लागलो . नंतर नंतर तिने सांगितलेल्या काही गोष्टी खोटया आहेत असं समजून येऊ लागलं. त्यावेळी मला तिच्या वर विश्वास ठेवण अवघड बनत चाललं होतं. तरी देखील मी तिला आपलंसं समजत होतो. परंतु तिची तिला जाणीव नव्हती.

या सर्व गोष्टी मुळे मला त्रास होऊ लागला. मनात विचार येत होता की आपण किती जीव लावलं होत. आणि आपल्या सोबत काय होतंय हे. ती मला सारखं सारखं लग्नाविषयीं विचारायची. एक दिवस तिला मी विचारले तुझ्या साठी काय महत्वाच आहे मी का ते तुझं वादन ? ती कशाचाही विचार न करता म्हणायची तू, मग मी तिला म्हटले मी एक गोष्ट तुला आज मागणार आहे दिलीस तर तेवढाच आनंद आहे आणि नाही दिलीस तरी तेवढाच आनंद असेल. आज पर्यंत तुला मी काही मागितलं नाही किंवा काही बंधनं घातली नाहीत, तुझी प्रत्येक गोष्ट मान्य केली आहे आणि इतुन पुढे पण करीन तुला कधीच अंतर देणार नाही फक्त एक मागणं माझं मान्य कर आणि हे आपल्या दोघांच्या आयुष्यासाठी खूप चांगले आहे. मला वाटतं तू माझी च बनून रहावी तुला जर मी हवा असेन तर आणखी लक्षात ठेव, तुझ्या मनाची यात कुठे कुचंबणा होत असेल तर स्पष्ट सांग काही हरकत नाही माझी. मी तुला आवडत नसेल तर तस सांग, तुला दुसरा कोणी आवडत असेल तर बिनधास्त सांग, मी तुझ्या वाटेतून हसत निघून जाईन तूझी काहीही अडचण सांग किंवा तुझ्या भुतकाळात काही झाले असेल, तुझं ब्रेकअप झाले असेल, आता या पुढे जाऊन तुला विचारतोय तुझे शारीरिक संबंध झाले असतील तरी देखील मी तुला पूर्ण मनाने स्वीकारायला तयार आहे. तूला फक्त ते वादन सोडावं लागेल, तुला माझ्यासाठी कारण त्या ठिकाणी येणारी काही मुले मला बरोबर वाटत नाहीत आणि अशा ठिकाणी मला तुला पाठवायचं नाही. तिने थोडा वेळ मागितला मी दिला तिने मान्य केलं की मी वादन सोडते म्हणून.

त्यावेळेस गणपतीचा सिजन होता तिने मला हट्ट केला की मला फक्त याच वर्षी तेवढं वाजवू दे मी म्हटलं तू अगोदर मला शब्द दिला आहेस, परंतु तुझा एवढया दिवसाचा छंद आहे तर फक्त गणपती च्या नव्या दिवशी पर्यंत वाजव वादन पण त्यानंतर नाही. हे मी तुझ्यासाठि करतोय कारण मला तू महत्वाची आहेस. एक दिवस तिला मी गाडीवर लांब घेऊन गेलो आणि स्पष्ट विचारले तुझ्या मनात माझ्या विषयी काय आहे ते स्पष्ट सांग हो असेल तर हो नाही असेल तर नाही. मी तुझ्यावर कोणताच दबाव आणलेला नाही आणि आनणार सुद्धा नाही. तिने मला होकार दिला माझ्यासाठी वादन सोडलं अस सांगितलं. मी तिज्या वर विश्वास ठेवला परंतु तिने तिचा शब्द दिलेला पाळला नाही. आज मी तिच्यापासून लांब आहे. मुलींना देखील सेक्सची गरज असते मान्य आहे मला काहीच प्रॉब्लेम नव्हता तिला सगळ्या गोष्टी ची परवानगी होती,ती नाही सुध्दा म्हणू शकली असती पण तिने तस केलं नाही. याच उत्तर आज पर्यंत मला नाही समजलं.

वास्तविकता:- आज तरुण मुलां मुलीपुढे अनेक प्रश्न उभे आहेत. माझ्या आयुष्यात येणारा मुलगा किंवा मुलगी कशी असेल, त्याचे किंवा तिचे संबंध झाले तर नसतील ना? मग तो किंवा ती व्हर्जिन आहे का? नसेल तर मग काय तो किंवा ती निरोगी असेल ना? ती किंवा तो पूर्वीच्या संबंधातुन भावनिक आणि मानसिक रित्या पूर्ण बाहेर पडलेला असेल ना? तो किंवा ती मला पूर्ण मनाने स्वीकारेल काय? मुलगा व मुलगी यांचे शारीरिक ,भावनिक व मानसिक आरोग्य कसे असेल? त्या मुलीचा किंवा मुलाचा परत त्रास होईल काय? समजा त्याने किंवा तिने ब्रेकअप विषयीं लपलेले असेल तर नंतर समजल्यावर होणारे परिणाम काय असेल? पण मुलींनो तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्यावेळी संबंध ठेवताय त्यावेळी ते संबंध एका व्यक्तीशीच प्रामाणिक आणि एकनिष्ठ आहे का ? नक्की पहा. तुमची रीस्पेक्ट तुम्हीच ठेवा आणि वाढवा मग घरातले काय म्हणतील समाज काय म्हणेल याचा विचार करू नका, स्वतःचा वापर कधीच होऊ देऊ नका. कारण कोणत्याच आईवडिलांना वाटणार नाही, आपली मुलगी आपला मुलगा यांचा वापर व्हावा अस.

पालकांनी गर्वाने सांगितलं पाहिजे माझ्या मुलीने प्रेमविवाह केला आहे. यामुळे तुमच आणि कुटुंबाच मानसिक, शारीरिक, भावनिक, सामाजिक वातावरण चांगले राहील. आणि मुलींनो प्रत्येक मुलगा तुम्हाला वर दिलेल्या लेखा सारख च भेटेल असा नाही. त्याने त्या मुलीला बरीच मोकळीक दिली होती कारण I love you म्हणणारीच खरे प्रेम करतात असे नाही. मी माझ्या वरील लेखात प्रेम शब्दाचा वापर न करताच त्या मुलीविषयी त्या मुलाच्या मनात किती सुंदर भावना आहेत हे व्यक्त केले आहे

लेख- वास्तविक आहे की काल्पनिक आहे या पेक्षा सद्यकाळातील मुलामुलींसाठी किती महत्वाचा आहे हे बघणे गरजेचे आहे

मित्रांनो लेख आवडला असेल तर आवर्जुन शेयर करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *