जेव्हा एकाच चादरीत झोपले होते – धमेंद्र आणि हेमा मालिनी तेव्हा अचानक….

स्वप्न सुंदरी हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची प्रेमकहाणी आज लाखो युवकांसाठी एक उदाहरण बनली आहे. धर्मेंद्र हेमा मालिनीच्या प्रेमात इतके वेडे झाले होते की त्यांच्यापेक्षा 13 वर्षानी लहान असलेल्या हेमा मालिनीबरोबर त्यांनी धर्म बदलून लग्न केले होते. दोघाची प्रेमकहाणी अत्यंत रोचक आणि रोमहर्षक होती. धर्मेंद्र हे १९५८ सिनेमामध्ये प्रथम आले. अभिनेता धर्मेंद्रचे लग्न सिनेमात येण्यापूर्वी प्रकाश कौर बरोबर झाले होते. धर्मेंद्र आणि त्यांची पत्नी प्रकाश कौर यांचा संसार अतिशय चांगला चालला होता.

साल १९७० मध्ये धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनी प्रथमच एकत्र असे फिल्म “शराफत” आणि “तुम हसी मै जवा” या दोन सिनेमात लागोपाठ काम केले. त्यानंतर त्या दोघांमध्ये जवळीक झाल्याच्या चर्चा कानावर येऊ लागल्या. १९७० नंतर हेमामालिनी व धर्मेंद्र यांनी एकत्र सिनेमात काम केल्यामुळे त्यांचे प्रेमसंबध वाढू लागले व त्यांच्यात अनोखी अशी जवळीक निर्माण झाली. आता धर्मेंद्रपूढे धर्मसंकट हे होते की धर्मेंद्रचे एक लग्न झालेले होते आणि हेमा मालिनी बरोबर दुसरे लग्न कसे करणार हा मोठा पेच होता. ते आपल्या पत्नी प्रकाश कौर हिच्यापासून अलग होऊ इछित नव्हते.

धर्मेंद्राने घातली अशी अट:

धर्मेंद्राने हेमामालिनीला अशी अट घातली की लग्नानंतर ते आपली पहिली पत्नी प्रकाश कौर व मुले आणि आपल्या परिवाराला सोडणार नाहीत. तरच हे लग्न होऊ शकेल. हेमामालिनीने त्यांची ही अट मान्य केली. दुसर्‍या लग्नासाठी त्यांनी आपला धर्म बदलला कारण हिंदू धर्मात एकाच लग्नाला मान्यता आहे. त्यांनी हिंदू धर्म बदलून मुस्लिम धर्म स्वीकारून हेमा मालिनीशी लग्न करण्याचे ठरवले. हेमा मालिनी बरोबर त्यांचे लग्न दिलावर खान या नावाने झाले आहे.

शोलेमध्ये प्रसिद्ध झाली ही जोडी:

१९७५ साली आलेली शोले या सिनेमामुळे त्यांच्या प्रेमाला बहर आला. शोले च्या शुटिंगच्या वेळी धर्मेंद्र व हेमामालिनी चेन्नईच्या एका हॉटेल मध्ये उतरले होते. याच वेळी दिग्दर्शक धर्मेंद्रच्या खोलीचा दरवाजा न वाजवता आत शिरले. आतमध्ये धर्मेंद्र आणि हेमामालिनी एकाच चादरीत झोपले होते. गमती गमतीमध्ये दिग्दर्शकाने धर्मेंद्र व हेमामालिनी यांचे असेही काही फोटो काढले.

हेच फोटो प्रसिद्ध झाले :

हेच फोटो सर्वांसमोर आले व सोशल मीडिया ने याला प्रसिद्धी दिली. धर्मेंद्र आणि हेमामालिनीचे हे प्रेम प्रकरण सर्वांसमोर आले. मीडिया असे ठामपणे म्हणते की हे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतरच धर्मेंद्र आणि हेमामालिनीने लग्न करायचा निर्णय घेतला. १९७९ मध्ये त्या दोघांनी लग्न केले.  २ मे ला त्यांच्या लग्नाला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत व उत्तम रीतीने त्यांनी संसार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.