गायिका कार्तिकी गायकवाड लवकरचं अडकणार विवाह बंधनात… पहा कोणाशी ठरलं लग्न…

सा रे ग म प लिटल चाम्स या कार्यक्रमातून कार्तिकी गायकवाड हे नाव घराघरात पोहचले. सारेगमप लिटल चाम्स या कार्यक्रमाची कार्तिकी विजयी ठरली होती. कार्तिकी आता वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आलेली आहे. झी24तास च्या रिपोर्ट नुसार कार्तिकी गायकवाड चे लग्न ठरले आहे. नुकताच तिचा बघण्याचा कार्यक्रम पार पडला. येत्या 26 जुलैला तिचा साखरपुडा होणार आहे. आपल्या गायकीच्या जोरावर तिने संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोरोनाच्या च्या पादुर्भाव शासनाचे सर्व नियम पाहून तिचा साखरपुडा घरीच पार होणार आहे. कार्तिकीच्या होणाऱ्या पतीचे नाव रोनिक पिसे आहे.

रोनिक हा मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. रोनिक पिसे पुण्याचा राहणार आहे. रोनित चे कुटुंब कल्याणजी गायकवाड यांच्या मित्र परिवारातील आहे. तिच्या लग्नाची तारीख अद्याप कळू शकली नाही. कार्तिकी चे चाहते ही बातमी ऐकून नक्की खुश होतील.  महत्वाचे म्हणजे रोनितला देखील संगीताची आवड आहे. त्याला उत्तम तबला वाजवता येतो. त्याने तबल्याच्या तीन परीक्षा देखील दिल्या आहेत. त्यामुळे हे कपल दोघे मिळून आता संगीताचा वारसा पुढे नेणार आहेत.

कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांनी मित्रपरिवारात हे लग्न ठरवले आहे. रोनित पिसे हा पुण्याचा राहणारा असून तो इंजिनिअर आहे. लग्नाची तारीख अद्याप काढण्यात आलेली नाही अशी माहिती कार्तिकीने दिली आहे.

सर्वच स्तरावरून तिला शुभेच्छा येत आहे. मात्र तिच्या पुरुष चाहत्यांनी मात्र सोशल मीडियावर निराशा व्यक्त केली आहे. खूप लवकर लग्न करत आहे, असेही त्यांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.