वयाच्या 47 वर्षी लग्न करू इच्छेते तब्बू, फक्त पतीमध्ये असायला हवेत हे गुण…

हल्ली बॉलीवूड मध्ये जिकडे तिकडे सिनेअभिनेत्रींच्या लग्नाची चर्चा आहे. हल्ली हल्लीच एका सुंदर अभिनेत्रीला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला गेला तर तिने असेही काही उत्तर दिले की ते ऐकून तुम्ही आश्चर्य चकित व्हाल. माहीत आहे का ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तब्बूच आहे जिच्याबद्दल आम्ही बोलत आहोत. आत्ताच होऊन गेलेल्या एका समारंभात जेव्हा ती आयुष्मान खुराना बरोबर होती, तेव्हा बोलता बोलता तिने आयुष्मान खुरानाला विचारले की तू आधीच का सांगितले नाहीस की तुझे वडील ज्योतिषी आहेत. तर मी त्यांना तेव्हाच विचारून लग्नाचा विचार केला असता. त्यांना याधीच विचारून मी कधीच लग्नाच्या बेडीत अडकले असते. एवढे दिवस एकटी राहिलेच नसते.

त्यावरून मीडिया ने हा मुद्दा लगेच उचलून धरला. तिला तिच्या लग्नाविषयी विचारणा केली तेव्हा तिने उत्तर दिले की जेव्हा तिला लग्नासाठी चांगला व सुयोग्य मुलगा मिळेल तेव्हा ती नक्की लग्न बंधनात स्वत:ला बांधून घेईल.

ती असेही म्हणाली की मला अशा माणसाची जरूर आहे जो मला समजून घेईल, माझ्या अभिनयाची त्याला योग्य जाणीव असेल व त्याला बघितल्यावर मला असे म्हणता आले पाहिजे की हाच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे. शेवटी तब्बुने याचे उत्तर देताना असेही म्हटले की त्यांच्या लग्नासाठी तिची फक्त एकच अट आहे ती म्हणजे तिचा नवरा सुरेख तर असलाच पाहिजे त्याचबरोबर तो समजुदार आणि उंच पण असला पाहिजे. तरच तो तिला शोभून दिसेल.

तब्बूचे मूळ नाव तबस्सुम फातिमा हासमी असे असून तिचा जन्म ४ नोव्हेंबर १९७१ झाला. तिचे टोपण नाव तब्बू असे पडले. तब्बू १९८३ साली मुंबईला आली आणि तिचे शिक्षण सेंट. झेवियर्स कॉलेजमध्ये २ वर्षे झाले. तीचे मुंबईत नातेवाईक आहेत. ती शबाना आझमीची भाची आहे आणि फराह नाज हिची लहान बहीण आहे. तब्बुची मुंबई व हैदराबाद येथे घरे आहेत.

भारतीय अभिनेत्री तब्बू हिने प्रथम हिन्दी, तेलगू आणि तामिळ या सिनेमातून कामे केली. तिने बाल कलाकार म्हणून देव आनंदच्या “हम नौजवान” या १९८५ साली आलेल्या सिनेमात काम केले. तिची पहिली मुख्य भूमिका तिने तेलगू फिल्म “कुली नंबर १” जो १९९१ मध्ये प्रदर्शित झाला त्यात केली. नंतर तिने अनेक भाषतून कामे केली. जसे हिन्दी, तेलगू, मराठी. १९९४ मध्ये तब्बुला हिंदीतील विजयपथ या सिनेमासाठी “उत्तम पदार्पण” हा पहिला फिल्मफेआर अवॉर्ड मिळाला. ती तिच्याकाळात एक आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आली.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.