30 वर्षानी मोठ्या असलेल्या डान्सर बरोबर केले होते पहिले लग्न, वाचा सरोज खानचा थक्क करणारा जीवनप्रवास….

प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खानची तब्येत बिघडल्यावर त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले, परंतु आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. बॉलीवूड ची प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान हिने आपल्या करियर ची सुरुवात ती फक्त 3 वर्षाची असताना केली. सगळ्यात पहिले ती “नजराणा” या सिनेमात दिसली होती. नंतर मात्र त्यांनी सर्व प्रसिद्ध अभिनेत्रींना कोरिओग्राफ केले होते अनेक सिंनेमांमधून. त्यांच्या कोरिओग्राफीने आताची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित आपणा सर्वांना माहीतच आहे. अतिशय चांगली कोरिओग्राफर म्हणून सरोज खान प्रसिद्ध आहेतच पण एक चांगल्या व्यक्ति म्हणून त्या नावाजलेल्या आहेत. त्यांनी अनेक अभिनेत्रींना त्यांच्या डांस कौशल्यात तरबेज केले आहे.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की फक्त 13 वर्षाच्या सरोज खानने तिच्या पेक्षा 30 वर्षानी मोठे असलेले सोहनलाल यांच्याशी विवाह केला होता. सरोज त्यावेळी शाळेत शिकत होती. काही कळण्याचे त्यांचे वय नव्हते. सोहनलालचे पहिले लग्न झालेले होते आणि त्यांना चार मुले होती हे सुद्धा त्यांना खूप वर्षानी कळले. पण सोहनलाल यांनी या गोष्टीचा सरोज खानला पत्ता नाही लागू दिला.

जेव्हा सरोज खानने पहिला मुलगा (राजू खान) याला जन्म दिला तेव्हा त्यांना सोहनलाल यांचे पहिले लग्न झाले आहे असे कळले परंतु सोहनलालनी सरोज खानच्या मुलांना आपले नाव लावू देण्यास नकार दिला ज्यामुळे त्या दोघांच्या नात्यामध्ये दूरी निर्माण झाली. ते दोघे वेगळे झाले॰

इथे वाचा काही आश्चर्यकारक गोष्टी :

असे मानले जाते की सरोज खानच्या जीवनाला काही वर्षानी कलाटणी मिळाली आणि परत सोहनलाल आणि सरोज खान यांनी कुकु नावाच्या त्यांच्या मुलीला जन्म दिला. पण असेही म्हटले जाते की सरोज खानने आपल्या मुलांचा सांभाळ एकटीने केला आहे. असे म्हटले जाते, की सरोजने सोहनलाल पासून वेगळे झाल्यावर सरदार रोशन खान यांच्याबरोबर लग्न केले होते.

रमो डिसोझा म्हणतात की सरोज खानने आतापर्यंत कमीत कमी २००० पेक्षा जास्त गाण्यांना कोरिओग्राफ केले आहे. त्यांच्या कष्टाचे चीज तेव्हा झाले जेव्हा त्यांना २००२ मध्ये आलेल्या देवदास या सिनेमासाठी २००६ मध्ये आलेल्या श्रुंगारम, व २००७ मध्ये आलेली जब वी मेट या सिनेमाच्या अतिशय उत्तम कोरिओग्राफिसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. त्याचबरोबर लगान या सिनेमासाठी त्यांना अमेरिकी कोरिओग्राफी अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे. अशा प्रसिद्ध व्यक्ती आपल्या कायम स्मरणात राहातात.

Leave a Reply

Your email address will not be published.