या कारणामुळे बाथरूममध्ये लपून, चेकअप न करता विमानतळामधून पळून गेली होती कनिका कपूर ?

बॉलिवूड गायिका कनिका कपूरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या बातमीने देशभरात खळबळ उडाली आहे. लखनऊमध्ये कनिका कपूरमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे, आणि यामुळे संपूर्ण शहरच नाही तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर कनिका कपूरबाबत विविध दावे केले जात आहेत.

सोशल मीडियावर असे बोलले जात आहे की, लंडन वरून कनिका लखनवच्या विमानतळावर आली आणि तेथील अधिकाऱ्यांशी बोलून ती तेथून तपासणी न करता घरी निघून गेली. परंतु कनिका तिची बाजू मांडत अशी बोलत आहे की, विमानतळावरून घरी येण्यापूर्ण मी तपासणी करून गेली होती, परंतु त्यावेळी माझ्या तपासणीमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली न्हवती.

एका ट्वीटर युजरने ट्विट केले आहे की, “माझ्या सहकाऱ्याला असे समजले की, लखनव विमानतळावर कनिका कपूर अधिकाऱ्यांशी बोलून, वॉशरूम मधून लपून-छपून स्क्रिनिंगमधून वाचली. व या सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे. ”दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की,“ लंडनहून परत लखनौला आली, विमानतळाच्या बाथरूममध्ये लपली आणि कोणालाही न समजत हळूच निघून गेली. त्यानंतर 100 लोकांना डिनर पार्टी दिली. आता तिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तिला अटक केली पाहिजे.

कनिकाच्या वतीने असा दावा केला जात आहे की लखनौव विमानतळावरील स्क्रीनिंग दरम्यान तिला कोरोना विषाणूची लक्षणे नव्हती. एका वृत्तवाहिनीशी बोलताना कनिका म्हणाली की, मी खूप सुशिक्षित आणि हुशार आहे. हे सर्व खोटे आरोप आहेत. मी विमानतळावर माझे चेकअप केले होते.

गायिका कनिका कपूर 12 आणि 13 मार्च रोजी कानपुरमध्ये थांबल्याचं सांगितलं जात आहे. कानपूरमधील एका पार्टीत ती सामील झाली. कनिकाचे वडील राजीव कपूर यांनी माध्यमांना सांगितले की लंडनहून परत आल्यानंतर तिने तीन-चार पार्टीत भाग घेतला होता. यावेळी तिने सुमारे 300-400 लोकांना भेटली. मात्र, कनिकाने तिच्या वडिलांची चर्चा नाकारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.