किन्नराना आपण सर्वांनीच पाहिले आहे. आपण हे सुद्धा जाणतो की त्यांचे जीवन आपल्यासारखे सामान्य नाही. त्यांचे जीवन जगण्याची व राहणीमान अगदी वेगळे असते. आपल्या समाजात त्यांना तृतीयपंथी असा दर्जा दिला गेला आहे. त्यांचा स्वत:चा असा एक वेगळा समाज असतो आणि हे लोक त्याच समाजात राहतात. जसे प्रत्येक समाजाचे आपले आपले असे काही रिती रिवाज असतात, तसेच किन्नरांच्या समाजाचे आपले असे काही वेगळे रिवाज असतात. जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांचे असे वेगवेगळे नियम आहेत. कधी तुम्ही कोणत्याही किन्नराची शवयात्रा पाहिली आहे का, नाही ना. असे का आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो. किन्नरांच्या शवयात्रेबाबत काही रहस्य लपलेली आहेत.
कोणत्याही घरात नवीन लग्न असुदे किंवा कोणत्याही बाळाचा जन्म झालेला असुदे, तिथे किन्नराना नाचता गाताना व पैसे मागताना आपण पाहिले असेल. थोडेसे पैसे घेऊन खूप सारे आशीर्वाद हे किन्नर देऊन जातात. पण तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा यापैकी कोणी किन्नराचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्यांचे शव सगळ्यांपासून लपवून ठेवले जाते. बरोबर, जिथे जास्त करून शवयात्रा दिवसा काढली जाते, तिथे किन्नरांची शवयात्रा मात्र रात्रीच काढली जाते. रात्री किन्नरांची शवयात्रा काढण्यामागचे कारण हे आहे, की कोणी माणसांनी यांची शवयात्रा पाहू नये. अशी यांची पद्धत आहे, की या शवयात्रेत त्यांच्या समुदाया व्यतिरिक्त दुसर्या समुदायाचे किन्नर सुद्धा हजर राहू शकत नाहीत. एवढी जास्त गुप्त असते किन्नरांची शवयात्रा.
किन्नर समाजाची सगळ्यात मोठी विशेषता ही आहे की सर्वसाधारण माणसानंप्रमाणे कोणाच्या मृत्यूसमयी हे लोक रडत नाहीत. किन्नर समाजात कोणाच्या मृत्युसाठी शोक केला जात नाही, कारण त्यांची अशी समजूत आहे की मेल्यानंतर त्या किन्नराला नर्कसमान असलेल्या जीवनापासून मुक्ति मिळते, आणि पुढील जन्मी देव त्यांना चांगले जीवन देतो. म्हणून हे लोक कितीही दुख: झाले तरी कोणी आपले गेले तरी, कोणाचाही मृत्यू झाल्यावर आनंद साजरा करतात. हे लोक या खुशीत पैशाचे दान करतात.
किन्नरांच्या समाजात कोणाचाही मृत्यू झाल्यावर सगळ्यात वेगळा असा रिवाज आहे, तो असा आहे की हे लोक अंतिम संस्कारापूर्वी शवाला चप्पल व बुटाने मारतात. असे म्हणतात की यामुळे या जन्मी त्याने केलेल्या पापाचे प्रायश्चित होते. तसे पहिले तर, किन्नर हिंदू धर्माला मानतात, परंतु हे लोक शवाला जाळत नाहीत तर त्याचे दफन करतात.
किन्नरांबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. हे तर तुम्हाला माहीतच असेल की काही लोक जन्मापासूनच किन्नर असतात, परंतु काही लोक आपल्या मर्जीनुसार किन्नर बनतात तर काही वेळा त्यांना जबरदस्तीने किन्नर बनवले जाते. किन्नराचे आराध्य देव अरावन आहे. भगवान अरावनच्या बरोबर किन्नर वर्षात एकदा लग्न करतात. हे लग्न केवळ एक दिवसासाठी असते. असे मानले जाते की पुढील दिवशीच त्यांच्या आराध्य दैवताचा मृत्यू होतो ज्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन त्याच दिवशी संपते.