सकाळी उठल्यावर पहिल्या एका तासात, या ४ गोष्टी कधीच करू नका…

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा चार गोष्टी सांगणार आहोत की ज्या सकाळी उठल्यावर पहिल्या एका तासामध्ये केल्या नाही पाहिजे, मित्रांनो आपण आपल्या दिवसाची सुरुवात कशी करतो, त्याचा परिणाम आपल्या पूर्ण दिवसावर होतो. आपल्याला दिवसभरात अनेक घरातली किंवा ऑफिसमधली कामे करावी लागतात, या सर्व कामांवर तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते, यावर खूप काही अवलंबून असते, साधं गणित आहे दिवसाची सुरुवात छान झाली तर, पूर्ण दिवस कितीही कामे केली तरी छान जातो, आणि दिवसाची सुरुवात चिडचिडी ने रागाने संतापाने झाली तर, सुट्टी असली तरी त्या दिवसाचा आपल्याला आनंद घेता येत नाही. म्हणून दिवसाच्या पहिला एका तासांमध्ये या चार गोष्टी करायचे टाळा.

पहिली गोष्ट तुमच्या अलार्मचे snooze बटन दाबून पुन्हा झोपू नका…. मित्रांनो जेव्हा तुम्ही अलार्म लावून झोपता सकाळी आलाराम वाचल्यावर त्याचे snooze बटन दाबून परत कधीही झोपू नका, आपण काय करतो सकाळी आलाराम वाजला कि snooze बटन दाबतो आणि पाच मिनिटे किंवा दहा मिनिटे झोपायचा प्रयत्न करतो ती कृती एकदम छोटी वाटत असली तरी याचा खुप वाईट परिणाम आपल्या दिवसा वरती होतो. पहिला म्हणजे शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केल आहे, आपल्या झोपेच्या वेगवेगळ्या साईकल्स असतात, नव्वद मिनिटे, एकशे दहा मिनिटे, जेव्हा आपण snooze बटन दाबून झोपायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या पाच मिनिटात आपली एवढी काही झोपत होत नाही,

परत आपण एखाद्या झोपीच्या सायकल मध्ये जातो आणि परत पाच मिनिटांनी उठल्यावर सायकल आपली मोडलेली असते, त्यामुळे रात्री कितीही झोपलेले असलो दिवस एकदम आळसामध्ये जातो, आणि आपल्याला वाटते की झोप पूर्ण झाली नाही. दुसरा अजून एक वाईट परिणाम म्हणजे आपण जेव्हा snooze बटन दाबून पाच मिनिटे झोपून उठतो तेव्हा आपल्या सूक्ष्म स्तरावर आपण असाच संदेश देतो. कि मी हारलेलो आहे, मी रात्री ठरवले होते की सकाळी ह्या वेळेस उठणार, मी स्वतःलाच दिलेले वचन पूर्ण करू शकलो नाही. म्हणून सकाळीच आपली सुरवात तुमच्या एखाद्या हरलेल्या व्यक्तीच्या माणसंकतेतून पूर्ण होते, म्हणून एक विजेता म्हणून दिवस जावा असं वाटत असेल तर सकाळी अलार्म वाजल्या वाजल्या उठा.

दुसरी गोष्ट मोबाईल मध्ये सोशल मीडियाचा वापर टाळा, मित्रांनो जसे मी सांगितले सकाळी उठल्यावर आपला एक तास खूप महत्त्वाचा असतो ह्या एका तासामध्ये जेवढे तुम्ही शांत आनंदी राहायचा प्रयत्न कराल, तीच भावना दिवसभर तुमच्याबरोबर राहील, पण आजकाल आपण सकाळी उठलो की लगेच व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वैगेरे चेक करायला सुरुवात करतो हे बघणे वाईट नाही, आपण आपले मित्र-मैत्रिणींचे नातेवाईकांचे ते कुठे फिरायला गेले होते, ते कोणत्या हॉटेलमध्ये एन्जॉय करायला गेले होते,

असे फोटोज किंवा पोस्ट बघतो किंवा आपण स्वतःला अपराधी समजू लागतो अरे ही लोकं किती एन्जॉय करत आहे आणि मी मग तीच अपराधीपणाची भावना घेऊन आपण दिवसाची सुरुवात करतो आणि दिवसभर ती अपराधीपणाची भावना आपल्याबरोबर असते आणि आपल्याला कळत पण नाही म्हणून सकाळी उठल्याबरोबर एक तास तरी सोशल मीडियाचा वापर टाळा, बघायचे झाले युट्यूब वर एखादा मोटिवेशन किंवा पेरणादायी व्हिडिओ बघाच जेणेकरून तुम्हाला तुमची प्रगती जाण्यासाठी मदत होईल.

तिसरी गोष्ट सकाळी टीव्ही बघायचे टाळा, मित्रांनो आपल्याला सवय असते सकाळी टीव्हीवर काय काय महत्त्वाच्या बातम्या ऐकायच्या पर शास्त्रज्ञ म्हणतात. सकाळचा वेळ हा खूप शांत असतो, आणि अशा वेळेस आपल्या शांत मनाने बातम्याचा भरीमान करणे शहाणपणाचे लक्षण नाही.

आज टीव्हीवर चांगल्या बातम्या चे दुष्काळ आहे, त्यामुळे आपण सकाळी सकाळी आपण कोरोना, एकसीडेनच्या, भ्रष्टाचाराच्या चोरीच्या अशा बातम्या बघतो, तेव्हा आपण आपल्या मनाला नकारात्मक खात्री देत असतो, आणि त्यामुळे आपल्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. आणि त्याच भावना घेऊन आपण दिवसाची सुरुवात करतो. त्याचा परिणाम आपल्या कामावर होऊ शकतो म्हणून सुरुवातीचा एक तास टीव्ही बघणे आपण टाळले पाहिजे,

चौथी गोष्ट तुमचे अंथरूण अस्तव्यस्त सोडू नका, मित्रांनो सकाळी उठल्यानंतर तुम्हाला चौथी गोष्ट जी करायची नाही ती म्हणजे तुमचे अंथरूण अस्तव्यस्त सोडू नका, उठल्यानंतर तुम्ही तुमचे अंथरून झटका बेटशीट व्यवस्थित सारखी करून ठेवा, आणि ब्लँकेट ची छान घडी करून ठेवा,शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे. जी लोकही छोटीशी सवय लावून घेतात ते त्यांच्या कामांमध्ये एकदम व्यवस्थित आणि तत्पर असतात, कारण हे एक छोटे काम पूर्ण केल्याने तुमच्या मनाला संदेश जातो कि, तुम्ही एक सकाळचे काम पूर्ण केले आणि आता दिवसभरात राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी तयार झालात काही लोक म्हणतील काय होते. जर आम्ही तसेच ठेवून गेलो तर आम्हाला परत येऊन तिथे झोपाला पण मित्रांनो काय असते.

या छोट्या-छोट्या सवयी तुमच्या अंतरमनाला संदेश पाठवत असतात आणि आपले 95% आयुष्य आपल्या अंतरमनाच्या दळणधरनि वर चाललेले असते. मित्रांनो या चार गोष्टी तुम्ही सकाळी उठून कधीच करू नका, पहिली गोष्ट तुमच्या अलार्मचे snooze बटन दाबून पुन्हा झोपू नका, दुसरी गोष्ट मोबाईल मध्ये सोशल मीडियाचा वापर टाळा, तिसरी गोष्ट सकाळी टीव्ही बघायचे टाळा, चौथी गोष्ट तुमचे अंथरूण अस्ताव्यस्त सोडू नका, मग नंतर उठून सकाळी काय काय केले पाहिजे जेणेकरून तुमचं पूर्ण दिवस एनर्जीने भरलेला आणि आनंदात जाईल याचा विचार करा आणि सुंदर दिवसाची सुरवात करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

2 Comments on “सकाळी उठल्यावर पहिल्या एका तासात, या ४ गोष्टी कधीच करू नका…”

  1. अतिशय सुंदर आणि महत्वाची माहिती, सर्वांना उपयुक्त प्रत्येकानी वाचावी अशी माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार. आपला दिवस आनंदी, भरभराटीचा, उत्साही,आणि समाधानी जाओ.

Leave a Reply

Your email address will not be published.