तुमच्या पायाचे दुसरे बोट अंगठ्यापेक्षा मोठे असेल तर आजच जाणून घ्या या रहस्यमय गोष्टी….

तुम्ही बर्‍याच लोकांच्या पायाचे निरीक्षण केले असेल, आणि जर तुम्ही विशेष लक्ष दिले असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की काही लोकांच्या अंगठ्याच्या बाजूचे बोट हे अंगठ्यापेक्षा मोठे असते. अशा वेळी अंगठ्याच्या बाजूचे बोट मोठे असण्यावरून काही निष्कर्ष लोकांनी मान्य केले आहेत. असे म्हटले जाते की, ज्यांच्या अंगठ्याच्या बाजूचे बोट मोठे असते, ते लोक खूप भाग्यशाली असतात. परंतु आज आम्ही आपणास याच्या शिवाय काही वेगळे सांगणार आहोत, कारण बहुतेक या गोष्टी बर्‍याच कमी लोकांना माहीत आहेत, जर आपल्या पायाचे बोट अंगठ्यापेक्षा मोठे असेल तर आपणही या गोष्टी माहिती करून घेणे आवश्यक आहे.

आपल्या पायाच्या दुसर्‍या बोटात दडली आहेत काही गुपिते :

ज्या लोकांच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचे बोट मोठे असते, ते दिसायला अतिशय सुंदर असतात. अशा वेळी भले ते दिसायला सावळे किवा काळे असले तरीही त्यांचे चेहरे दिसायला खूप सुंदर असतात आणि याच कारणामुळे त्यांच्याकडे दुसर्‍यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा गुण असतो आणि मनात नसूनसुद्धा लोक या लोकांकडे आकर्षित होतात. तरीही आपण अशा लोकांना बघितले असेल जे खूप गोरे असतात परंतु त्यांचा चेहरा कुरूप असतो.

जर एखाद्या महिलेच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचे बोट मोठे असेल, तर ती आपल्या पतीवर खूप प्रेम करते परंतु आपले प्रेम कधीही व्यक्त करीत नाही, म्हणजेच तिला आपले प्रेम जाहीर करण्यात संकोच वाटतो. म्हणूनच पतीवर खूप प्रेम असूनही ती आपले प्रेम व्यक्त करत नाही. कारण भारतीय मुलींमध्ये लोक-लाज व लाज अशा दोन प्रवृती आहेत त्यामुळे त्या आपल्या प्रेमाची जाहीर वाच्यता करू शकत नाहीत कारण की तिला असे वाटते की आपण आपले प्रेम व्यक्त केले तर तिच्या पतीचा तिच्याबद्दल चुकीचा ग्रह निर्माण होऊ शकतो, यामुळे मनात असूनही ती आपले प्रेम मोकळेपणी व्यक्त करू शकत नाही.

 

ज्यांच्या पायाचे दुसरे बोट मोठे असते, ते अतिशय रागीट स्वभावाचे असतात, परंतु त्यांचा रागीट स्वभाव हा वरवरचा असून खरे तर हे लोक आतून अतिशय शांत स्वभावाचे असतात व मनाने चांगले असतात. परंतु हे लोक आपल्या आंतरिक भावना खुलेपणी दाखवू इछित नसतात म्हणून ते दुसर्‍यांवर राग दाखवतात कारण ह्या लोकांची इछा नसते की त्यांच्यातील सुप्त गुणांचा इतर कोणी फायदा घेऊ नये म्हणूनच ते लोक हा गुण लपवून ठेवून वरवर राग दाखवतात.

ज्या लोकांच्या पायाच्या अंगठ्याजवळील बोट मोठे असते, त्यांच्या आयुष्यात थोड्या प्रमाणात त्रास संभवतो, परंतु काही काळानंतर असे लोक आपल्या जीवनात खूप यशस्वी होतात कारण सुरुवातीच्या काळात या लोकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागते परंतु खूप मेहनतीने हे लोक जीवनात सफल होतात. परंतु प्रत्येकाला मेहनतीशिवाय यश मिळत नाही. म्हणूनच जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनतीला पर्याय नाही कारण यश मिळवण्याचा कोणताही झटपट पर्याय अस्तीत्वात नाही त्यासाठी रात्रीचा दिवस करावाच लागतो. कठोर परिश्रमाला पर्याय नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.