या कारणामुळे तुमच्या घरी पैसा टिकत नाही !

प्रत्येकाचे उत्पन्न व त्यावरून होणारा खर्च याचे योग्य प्यानिंग असणे खूप गरजेचे आहे. ज्यावेळी उत्पन्न कमी व खर्च जास्त होतो तेव्हा सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. की घरात पैसाच टिकत नाही, कितीही कष्ट करून कमवा सर्व कामे संपतेच , पुन्हा महिन्याचा शेवटी बँक अकाऊंट 0 असते हीच अवस्था तुमची देखील असल्यास ही माहिती नक्की वाचा.

घरात पैसा न टिकण्याचे पहिले कारण, लोभी प्रवृत्ती….. अशी वृत्ती सर्वात घातक व पैसा संपवन्यासाठी कारणीभूत असते, तुमचे जवळचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, यापैकी कोणत्याही व्यक्तीसोबत स्वतःची तुलना करणे. त्याने काल फोर व्हीलर विकत घेतली खूप सुंदर व ब्रँडेड आहे, त्याने काल Sony कंपनीचा टीव्ही घेतला, दीड लाख रुपये त्याची किंमत आहे. त्यांचे फर्निचर किती सुंदर आहे, दोन लाख रुपयांचा त्यांचा सोफा सेट आहे ते विकत घेऊ शकतात, तर मग आपण का नाही. त्यांच्या घरी एवढा ऐशोआराम आहे तर मग आपल्या घरी का नाही. आपणही हे सर्व विकत घेऊ शकतो. व घ्यायचेच पण आपल्याकडे एवढी कॅश नाही, प्रॉब्लेम खूप आहेत मग काय करायचे? EMI वर सर्व काही विकत घेऊ, लोन घेऊन सर्व काही मिळवता येते कॅश असायला हवी असे काही नाही. आणि हीच सर्वात मोठी चूक ठरते.

EMI वर घेतलेली प्रत्येक वस्तू तुम्हाला गरीब व भिकारी बनवण्याच्या तयारीत असते, तुम्हाला कधीही श्रीमंत बनू देत नाही. आज पर्यंत तुम्ही काही ना काही EMI द्वारे घेतलेच असणार, आठवा त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे व ज्यावेळी सर्व EMI एकत्रित करून त्याची टोटल करता, तेव्हा त्याची किंमत किती होते. ही टोटल केल्यानंतर समजेल एक लाखाची बाईक दोन किंवा तीन लाखात पडली असणार, म्हणजे एक लाखासाठी तीन लाख रुपये भरावे लागले व ती पुन्हा विकायची म्हंटले तर ती तीस ते पन्नास हजार रुपयांना परत विकली जाते. कर्ज फक्त अशाच गोष्टींसाठी काढा ज्यामधून रिटर्न्स मिळतील. उदारणार्थ एखादी जागा घ्या किंवा फ्लॅट घ्या. कारण त्यातून जास्त रिटर्न्स मिळू शकतात. म्हणून लोभी प्रवृत्ती सोढा तरच घरामध्ये पैसा टिकेल.

दुसरे कारण ठरू शकते, पती पत्नीमध्ये सतत होणारे वाद. छोट्या छोट्या कारणावरून पती पत्नीमध्ये सतत वाद होणे हे हे सुद्धा तुमच्या गरिबीचे मूळ कारण बनू शकते. सतत होणाऱ्या वादामुळे भांडणामुळे कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. काम करायचे तर कोणासाठी पैसा कमवायचा तर कोणासाठी घरी काहीच सुख नाही, तर एकट्याने का झटत राहायचे. अशी भावना तयार होऊ लागते, पत्नीला पती काहीच ऐकत नाही, असे वाटायला लागते. पत्नीच्या मनात एकच गोंधळ उढतो की, पती आपली कोणतीच गोष्ट पूर्ण करू शकत नाही. व पतीला वाटू लागते की पत्नी आपल्याला सपोर्ट करत नाही, परिस्थिती गरीब असूनही ही खूप अपेक्षा ठेवते. खर्चावर नियंत्रण ठेवत नाही, पैसा कसाही खर्च करत जाते त्यामुळेच आपण गरीब होत चाललोय. याच मुळे सर्वांचे मानसिक संतुलन बिघडते, शाररिक स्वस्त ही बिघडत जाते, कामावर मन लागत नाही, परिणामी पैशाची टंचाई सतत मागे लागते म्हणून पती पत्नीने एकमेकांना विश्वासात घेऊन काम करत राहायला हवे, खर्च करण्यासाठी योग्य वेळ आल्याशिवाय खर्च करू नये.

तिसरे कारण आहे पैशाचे अयोग्य नियोजन… प्रत्येक महिन्याला पैसा तर मिळतो, ठराविक रक्कम हातात तर येते मात्र त्याचे व्यवस्थापन, त्या पैशाचे योग्य नियोजन, कसे करायचे याची जाणीव 90 टक्के लोकांना नसते. पैसा मिळवायचा कसा याचे नियोजन मात्र अनेक लोक करतात, व त्यांचा प्लॅन हि ते सांगू शकतात पण मिळलेल्या पैशाचे योग्य व्यवस्थापन हे देखील महत्वाची गोष्ट आहे. पैसा मिळवणे या जगात एवढी अवघड गोष्ट नाही पण पैशाचे योग्य नियोजन व योग्य ठिकाणी त्याची गुंतवणूक करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे.

मित्रांनो तुम्हाला ही महिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.