तसे तर प्रत्येक मुलगी ही सौभाग्यशाली आणि लक्ष्मीचे रूप असते परंतु समुद्रशास्त्रानुसार शरीरावर असलेल्या काही खास निशाण / जन्मखुणा किंवा कोणतेही चिन्ह ज्या मुलींच्या शरीरावर असते त्या भाग्यशाली मानल्या जातात. असे मानले जाते की अशा मुलींबरोबर लग्न करणारे पुरुष नेहमी खुश राहतात. त्याचबरोबर त्या घर परिवाराचे नाव उज्जवल करतात. चला, आज आम्ही तुम्हाला मुलींच्या शरीरावरील जन्मखुणा किवा चिन्हांची ओळख करून देतो ज्याने तुम्हाला समजेल की त्या तुमच्यासाठि व परिवारसाठी भाग्यशाली आहेत की नाही॰
नाकावर तीळ असणे हे भाग्याची निशाणी : ज्या मुलींच्या नाकाच्या आसपास तीळ असतो, त्या सर्व सुख प्राप्त करणार्या असतात. हे तिळाचे निशाण धन संपन्न जीवनाची निशाणी मानले जाते. हाताच्या तळव्यावर चक्र किंवा शंख: काही मुलींच्या पायाच्या तळव्याखाली कमळ, चक्र, आणि शंख अशी चिन्ह असतात. परंतु, असे बर्याच मुलींच्या बाबतीत होते परंतु त्यांना भाग्यशाली मानले जाते. याशिवाय या मुली घराचे व परिवाराचे नाव उज्ज्वल करतात.
बेंबीच्या खाली तीळ किंवा मस : समुद्रशास्त्रानुसार, ज्या महिलांच्या नाभी खाली तीळ किंवा मस असतो त्या महिला घरासाठी व परिवारसाठी खूपच भाग्यशाली मानल्या जातात. तसेच महिलांच्या नाभीच्या खाली तीळ किंवा मस असणे हे सुख, संपन्नता याचे प्रतीक आहे. कपाळावर तीळ: ज्या स्त्रीच्या कपाळावर मधोमध तीळ असतो ती खूपच भाग्यशाली असते. अशा महिलांशी लग्न झालेले पुरुष सुद्धा आयुष्यभर सुखात राहतात.
त्रिकोणाचे निशाण : ज्या मुलींच्या पायाच्या तळव्यावर त्रिकोणाचे निशाण असते, त्या खूपच बुददिमान व सारासार विचार करणार्या असतात. त्या आपल्या समजदारीने फक्त परिवारालाच खुश ठेवत नाहीत तर त्यांची प्रत्येक अडचणीच्या वेळी मदत करतात. नाभी खाली तीळ : समुद्रशास्त्रानुसार, ज्या महिलांच्या नाभी च्या खाली तीळ किंवा मस असतो त्या घरासाठी व परिवारासाठी खूपच भाग्यशाली मानल्या जातात. त्याचबरोबर महिलांच्या नाभी च्या खाली तीळ किंवा मस असणे हे सुख, संपन्नता याचे प्रतीक आहे.
उजव्या गालावर तीळ : उजव्या गालावर तीळ असणारया महिलेला खाण्याची खूप आवड असते व सर्व प्रकारच्या जेवणाचा व पदार्थांचा ती उत्तमरीत्या आस्वाद घेणारी असते. तसेच ती जेवण बनवण्यात तरबेज असते सुगरण असते , त्यामुळे परिवार तिच्यावर खुश असतो. शरीरावर तीळ : ज्या महिलेच्या शरीराच्या उजव्या बाजूस जास्त तीळ किंवा मस असतात त्या महिला परिवारासाठी खूप भाग्यशाली असतात व आपल्या पतीला पण खुश ठेवतात. भुवयांच्या मध्ये तीळ : भुवयांच्या मध्य तीळ असणे भाग्यशाली मानले जाते व त्या महिला खूप समजुदार असतात.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.