मोबाईल चार्जिंग करताना या पाच चूका करू नका….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, पाच ते सहा महिन्यांपूर्वी मी एक नवा कोरा मोबाईल विकत घेतला, आणि आज आपण त्या मोबाईलच्या बॅटरीची अवस्था अशी आहे की, मी मोबाईल चार्जिंग करायला लागलो तर चार ते पाच तास चार्जिंग करण्यास लागतात, आणि बॅटरी फुल चार्ज झाली की अर्धा ते पाऊण तासात ही बॅटरी पूर्णपणे उतरते. असे नेमके का होते हे ज्यावेळी मी कस्टमर केअर कडे गेलो आणि त्यांना विचारले त्यावेळी त्यांनी हात वर केले, म्हंटले बॅटरीला कोणतीही वॉरंटी गॅरंटी येत नाही, सहा महिन्यांची वॉरंटी असते तुम्हाला सहा महिने आणि वरती काही दिवस झाले आहेत.

तुम्हाला तर माहीतच आहे की, बॅटरी तीन ते चार वर्षे तरी टिकायला हवी, मात्र पाच ते सहा महिन्यांत बॅटरी कशी काय बर खराब झाली? तर असा मी विचार करू लागलो व मी इंटरनेट वरती सर्च केले आणि त्यावेळी मला जी माहिती समजली ती आपण चार्जिंग करताना कोणत्या चूका करतो, तर ही महत्वाची माहिती मला वाटले तुमच्या पर्यंत मी शेअर करायला हवी जेणे करून आपले हे जे नुकसान आहे ते टाळता येईल.

बऱ्याचदा आपण मोबाईल विकत तर घेतो मात्र त्यामध्ये जे मॅन्युअल असते ते वाचत नाही, या माहिती पुस्तकेत संपूर्ण माहिती दिलेली असते. मात्र आपण चार्जिंग करताना ज्या चुका करतो त्यामुळे आपली बॅटरी लवकर उतरते व कधी कधी बॅटरी फुगते देखील, तर काही जणांचा मोबाईल गरम होतो वापर करताना किंवा चार्जिंग करताना देखील गरम होतो. तर हे सुद्धा चार्जिंग करताना जी आपण चूक करतो त्यामुळेच होते. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहोत की जर या पाच गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा मोबाईल चांगला राहील व तुमची बॅटरी देखील दीर्घकाळ टिकेल. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

पहिली गोष्ट म्हणजे, ज्यावेळी तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावता त्यावेळी तुमच्या मोबाईलचा मागचा कव्हर काढून मोबाईल चार्जिंगला लावा. तुम्हाला वाटेल असे का करायचे तर याचे कारण असे आहे की, हे जे कव्हर असते हे बॅटरीला मिळणारा हवेचा पुरवठा थांबवतो, थोडक्यात बॅटरीला हवा मिळत नाही, आणि परिणामी मोबाईल गरम होऊ लागतो आणि ज्यावेळी मोबाईल गरम होतो त्यावेळी आपोआपच बॅटरीवरती त्याचा खूप निगेटिव्ह इफेक्ट् पडतो, ज्यामुळे बॅटरी लवकर खराब होते….

दुसरी गोष्ट, तुम्हाला कंपनीने जो चार्जर दिला आहे तोच चार्जर तुम्ही मोबाईल चार्ज करताना वापरा. तुम्ही जर कोणताही चार्जर वापरू लागलात, उदाहरणार्थ तुमचा जर Samsung चा मोबाईल असेल आणि त्याला चार्ज करायला Oppoचा चार्जर वापरत असाल तर त्यामुळे देखील तुमची बॅटरी लवकर खराब होते, कारण प्रत्येक कंपनीने त्यांच्या मोबाईलला त्यांच्या चार्जरचे MAH म्हणजेच किती अँपिअर करंट वापरायचा हे ठरलेले असते तर तोच चार्जर आपण वापरा….

तिसरी गोष्ट, मोबाईलला चार्जिंग करताना मोबाईल नेहमी switch off करावा, जर तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर कमीत कमी flight mode वर तरी टाकावा. जर तुम्ही तसाच मोबाईल चार्जिंगला लावत असाल तर त्यामुळे एक बाजूला चार्जिंग चालू राहते आणि दुसऱ्या बाजूला मोबाईलचे नेटवर्क चालू राहत, म्हणजे मोबाईल कामही करतोय आणि इकडे चार्जिंग देखील चालू आहे, थोडक्यात तुम्ही जॉबवर देखील गेलाय आणि काम करता करता जेवण पण करताय… तर अशी परिस्थिती होते, त्यामुळे मोबाईल चार्जिंग होण्यास फक्त दीड ते दोन तास लागतात फक्त एवढाच वेळ तुम्ही तुमचा मोबाईल switch off करून ठेवा…

चौथी गोष्ट, आपली बॅटरी किती टक्के पर्यंत चार्ज करायची हे अनेकांना समजलेले नाही, त्यामुळे काही लोक 100 टक्के पर्यंत चार्ज करतात, आणि बरेच लोक असे आहेत की जे मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावतात…. कंपनीचे मॅन्युअल असे सांगते की, बॅटरी 90% ते 95% पर्यंत चार्जिंग करा, आणि 100 पर्यंत चार्जिंग करू नका. जे लोक हा नियम पळत माहीत त्यांचे मोबाईल लवकर खराब होतात व बॅटरी देखील फुगते आणि ओव्हर हीटिंगचा प्रॉब्लेम 100 टक्के होतो…..

पाचवी गोष्ट, ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा कंप्युटर्स वगैरे आहे, ते त्याला USB केबल जोडतात आणि मग त्याला मोबाईल 24 तास मोबाईल लावून ठेवतात. तुम्हाला सांगू इच्छितो की त्या USB मधून तुमच्या मोबाईलची चार्जिंग तर चालू असते मात्र त्याला जो करंट मिळतो, जे MAH मिळते ते अतिशय कमी मिळते, त्यामुळे मोबाईल खूप हळू चार्ज होतो त्यामुळे देखील मोबाईल खराब होतो करण USB केबलचे काम तुमच्या मोबाईल मधील डाटा कम्प्युटर मध्ये घेणे किंवा कम्प्युटर कडून घेणे हे आहे. म्हणून तुम्ही USB ने मोबाईल चार्जिंग कधीही लावू नका…..

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

One thought on “मोबाईल चार्जिंग करताना या पाच चूका करू नका….

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.