लक्ष्याच्या डुप्लिकेटला पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, एकाच चेहऱ्याच्या सेम टू सेम दिसणाऱ्या सात व्यक्ती या जगात असतात असे म्हंटले जाते. सेलिब्रेटींची तर अनेक डुप्लिकेट आपण पाहिले आहेत, अशा सेम टू सेम दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये आता लक्ष्मीकांत बेर्डे यांचाही उल्लेख करावा लागणार आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या या डुप्लीकेट चे tiktok वर अकाउंट असून त्याचे हे व्हिडीओ सध्या खूपच व्हाइरल होत आहेत. या व्यक्तीला पाहून लोक गोंधळून जाता आहेत, दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सारखा दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव धर्मराज गुलीय असे आहे. हा व्यक्ती औरंगाबादचा आहे, तो स्वतःला ज्युनियर लक्ष्या आहे असे म्हणतो त्याचे tiktok वर जवळपास 40 लाख फॉलोवर्स आहेत, तर त्याच्या व्हिडिओस ना 5 मिलियन पेक्षाजास्त लाईक्स आहेत. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावरखूपच व्हाइरल होत असतात.

या दरम्यान निकतेच लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी व अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी देखील त्यांचे व्हिडीओ पाहिले आहेत. आणि त्यांचे कौतुक केले आहे. त्यांचा हा व्हिडिओ धर्मराज गुलीयाने tiktok वर टाकला आहे. त्यात प्रिया बेर्डे म्हणाल्या की छान वाटतंय, तुम्ही खूप छान काम करत आहात, बेर्डेना आजही लोक विसलेले नाहीत त्यांच्यावरील प्रेम तुम्ही पुन्हा जागृत करत आहात. त्यासाठी धन्यवाद आणि all the best….

प्रिया बेर्डे यांच्याशी संवाद झाल्यानंतर धर्मराज गुले यांनी tiktok वर ताई साहेब मोठ्या मनाच्या आहेत, प्रिया ताईंचा आज आशीर्वाद मिळाला असे देखील लिहले आहे.

मित्रांनो लक्ष्मीकांत बेर्डे यांचा डुप्लिकेट पाहून तुम्हाला कसे वाटत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.